लडाखजवळ LACवर गोळीबार, भारत-चीन तणावात वाढ

Firing in eastern ladakh near lac प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर ४५ वर्षांनंतर पहिल्यांदाच गोळीबार झाल्याचे वृत्त आहे. या गोळीबारामुळे भारत आणि चीन यांच्यातील तणाव आणखी वाढला आहे.

Firing in eastern ladakh near lac
LACवर ४५ वर्षांनंतर गोळीबार, भारत-चीन तणावात वाढ  |  फोटो सौजन्य: AP, File Image

थोडं पण कामाचं

  • LACवर ४५ वर्षांनंतर गोळीबार, भारत-चीन तणावात वाढ
  • भारत आणि चीन यांच्यात १९७५ नंतर पहिल्यांदाच गोळीबार
  • प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर दोन्ही बाजूला सैन्य 'हाय अलर्ट'वर

लडाख: लडाखजवळील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (Line of Actual Control - LAC) ४५ वर्षांनंतर पहिल्यांदाच गोळीबार (Firing in eastern ladakh near lac) झाल्याचे वृत्त आहे. या गोळीबारामुळे भारत आणि चीन यांच्यातील तणाव (India-China Standoff) आणखी वाढला आहे.

भारत आणि चीन यांच्यात १९७५ नंतर पहिल्यांदाच गोळीबार

भारत आणि चीन यांच्यात १९७५ नंतर पहिल्यांदाच गोळीबार झाल्याचे वृत्त आहे. चिनी सैन्याने गोळीबार केला. या गोळीबाराला उत्तर म्हणून भारतीय सैन्याने गोळीबार केला. या गोळीबारामुळे तणाव वाढला. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर दोन्ही बाजूला सैन्याला 'हाय अलर्ट'वर ठेवण्यात आले आहे. भारताचे लष्कर, हवाई दल आणि नौदल कोणत्याही परिस्थितीत देशाच्या सार्वभौमत्वाचे रक्षण करण्यासाठी सज्ज आहेत. 

प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर दोन्ही बाजूला सैन्य 'हाय अलर्ट'वर

पँगाँग त्सो लेक (Pangong Tso Lake) (पँगाँग सो  लेक किंवा पँगाँग लेक) या ठिकाणाच्या आसपासच्या सर्व उंच डोंगरांवर भारताच्या स्पेशल फ्रंटिअर फोर्सचे जवान सक्रीय आहे. याच जवानांनी २९-३० ऑगस्ट दरम्यान घुसखोरीचा प्रयत्न करणाऱ्या चिनी सैनिकांना हुसकावून लावले होते. अनेक डोंगरांवर भारताने खांद्यावरुन क्षेपणास्त्र हल्ला करणाऱ्या प्रशिक्षित सैनिकांना नियुक्त केले आहे. तोफा, क्षेपणास्त्र, क्षेपणास्त्र विरोधी क्षेपणास्त्र, आधुनिक शस्त्र यांच्यासह सैनिक चिनी आव्हानाचा मुकाबला करण्यासाठी सज्ज आहेत. 

लढाऊ विमानांद्वारे दर तासाला हवाई टेहळणी

हवाई दलाची लढाऊ विमानं दर तासाला लडाख आणि भोवतालच्या परिसराची हवाई टेहळणी (air surveillance) करत आहेत. रडार आणि उपग्रह यांच्या मदतीने चिनी सैन्याच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवले जात आहे. बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनने (Border Roads Organisation - BRO) प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ रस्त्यांच्या कामाला वेग दिला आहे. भारताची एक युद्धनौका दक्षिण चीन समुद्रात दाखल झाली आहे. अमेरिकेच्या युद्धनौकांशी समन्वय ठेवून ही युद्धनौका युद्धसज्ज स्थितीत आहे. अमेरिकेसह जगातील अनेक देशांनी चीनवरील दबाव वाढवण्यास सुरुवात केली आहे. 

ऐन कोरोना संकटात चीनची विस्तारवादासाठी धडपड

जग कोरोना संकटाचा मुकाबला करत असताना चीनला  (China) विस्तारवादाच्या खुमखुमीने पछाडले आहे. आपल्या सर्व शेजारी देशांचे जमतील तेवढे भूभाग बळकावण्याचा तसेच दक्षिण चीन समुद्रात (South China Sea) दादागिरी करण्याचा चीनचा प्रयत्न सुरू आहे. लडाखमध्ये (Ladakh)  प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या जवळ युद्धसदृश स्थितीसाठी सैनिकांची मोठ्या प्रमाणावर नियुक्ती करुन तसेच वारंवार भारतात घुसखोरीचा प्रयत्न करुन चीनने मे महिन्यापासूनच तणाव वाढवला आहे. गलवान (galwan valley) आणि पँगाँग लेक परिसरात भारताकडून (India) मार खाऊनही चीनची (China) विस्तारवादाची खुमखुमी कमी झालेली नाही. चीन वारंवार पँगाँग लेक जवळच्या डोंगरांवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. चिनी सैनिकांनी हा ताबा मिळवणे कठीण जात असल्यामुळेच भारतीय सैन्यावर गोळीबार केला. या गोळीबारामुळे परिस्थिती तणावपूर्ण असली तरी नियंत्रणात आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी