शूटआऊट इन मेक्सिको ! चकमकीत 10 गुन्हेगार ठार, 3 पोलीस जखमी

Mexico Shootout:मेक्सिकोमधील टेक्सकल्टीटलानमध्ये एका कारवाईदरम्यान एका मोठ्या सशस्त्र गटाने सुरक्षा दलांवर हल्ला केला. यात तीन सुरक्षा कर्मचारी गंभीर जखमी झाले आहेत. दरम्यान, 10 संशयित गुन्हेगार ठार झाले, तर सात जणांना अटक करण्यात आली आहे.

Firing in Mexico: Gunmen opened fire on security forces; 10 criminals killed, 3 policemen also injured
शूटआऊट इन मेक्सिको ! चकमकीत 10 गुन्हेगार ठार, 3 पोलीस जखमी ।   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • मेक्सिको सिटीत झालेल्या गोळीबारात 10 संशयित गुन्हेगार मारले गेले. मेक्सिको राज्याच्या अधिकाऱ्यांनी मंगळवारी ही माहिती दिली. या हिंसाचारामुळे
  • तीन सुरक्षा कर्मचारी जखमी झाले.
  • राष्ट्राध्यक्ष आंद्रेस मॅन्युएल लोपेझ ओब्राडोर यांच्या सरकारची चिंता वाढली आहे.

shoot out in Mexico : मेक्सिकोमधील टेक्सकल्टिटलान येथे मंगळवारी पोलीस आणि बंदूकधाऱ्यांमध्ये चकमक उडाली. यामध्ये 10 बंदुकधारी ठार तर 4 जखमी झाले. यावेळी ३ पोलीस जखमी झाले. या घटनेत सहभागी 7 जणांना पोलिसांनी अटक केली आहे. मेक्सिको सिटीच्या नैऋत्येला सुमारे 130 किमी अंतरावर असलेल्या टेक्सकाल्टिटलान शहरात गोळीबार झाला. (Firing in Mexico: Gunmen opened fire on security forces; 10 criminals killed, 3 policemen also injured)

अधिक वाचा : 

'त्यांची' सहमती असल्यास शरद पवार राष्ट्रपती पदाचे उमेदवार, ममता बॅनर्जींच्या बैठकीला 17 पक्षांची हजेरी

पोलिसांनी घटनास्थळावरून शस्त्रे जप्त 

पोलिसांनी घटनास्थळावरून 20 रायफल, पिस्तूल, हँडगन, काडतुसे, पाच वाहने, लष्करी गणवेश आणि बुलेटप्रूफ जॅकेट जप्त केले आहेत. मेक्सिकोमध्ये ज्या भागात गोळीबार झाला तो भाग ड्रग डीलर आणि टोळीयुद्धांच्या दहशतीने पछाडलेला आहे. या घटनेची माहिती मेक्सिकोच्या सरकारी वकील कार्यालयाने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून दिली.

अधिक वाचा : 

Lawrence Bishnoi: डी कंपनीसारखा बिश्नोई गँगला मुंबईत सुरू करायचा होता खंडणीचा धंदा - महाराष्ट्र गृह मंत्रालयाचा खुलासा

हिंसाचारामुळे सरकार त्रस्त

राष्ट्राध्यक्ष आंद्रेस मॅन्युएल लोपेझ ओब्राडोर यांचे सरकार या हिंसाचारामुळे हैराण झाले आहे. नुकतेच मेक्सिकोची राजधानी मेक्सिको सिटीमध्ये सुरक्षित रस्त्यांच्या मागणीसाठी लोकांनी निदर्शने केली. मॅन्युएल लोपेझ सरकारने आश्वासन दिले होते की हिंसा आणि गुन्हेगारीला आळा बसेल. आता मंगळवारी सुरक्षा दलांवर झालेल्या गोळीबारामुळे सरकारची चिंता वाढली आहे.

अधिक वाचा : 

Nupur Sharma Controversy: खासदार गौतम गंभीरवर स्वरा भास्करनं वाढवला 'स्वर', म्हणाली त्यांना बुलडोझरचा आवाज नाही येत पण..

2007 पासून मेक्सिकोमधील सर्वात वाईट परिस्थिती

2007 पासून मेक्सिकोमध्ये हिंसाचार आणि टोळीयुद्धासारखे गुन्हे वाढले आहेत. 2007 मध्ये माजी राष्ट्राध्यक्ष फेलिप कॅल्डेरॉन यांनी ड्रग्ज माफियांशी लढण्यासाठी लष्कराला काढून टाकले. तेव्हापासून मेक्सिकोतील हिंसाचार तीव्र झाला होता, जो अजूनही थांबण्याचे नाव घेत नाही आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी