Omicron first death : देशात ओमिक्रॉनचा पहिला बळी, राजस्थानमध्ये ७३ वर्षीय रुग्णाचा ओमिक्रॉनमुळे मृत्यू

Omicron first death राजस्थानमध्ये एका ७३ वर्षीय व्यक्तीचा ओमिक्रॉनमुळे मृत्यू झाला आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने या माहितीला दुजोरा दिला आहे. १५ डिसेंबर रोजी या रुग्णाला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. 

Multibagger Stock
थोडं पण कामाचं
  • देशात ओमिक्रॉनचा पहिला बळी
  • ७३ वर्षाच्या रुग्णाचा ओमिक्रॉनमुळे मृत्यू झाला आहे.
  • डिसेंबर महिन्यात या रुग्णाची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह

Omicron first death : जयपूर :  देशात कोरोनाचे (coron) संकट वाढत असताना ओमिक्रॉनचा (omicron) पहिला मृत्यू झाला आहे. राजस्थानमध्ये (rajsthan) एका ७३ वर्षाच्या रुग्णाचा ओमिक्रॉनमुळे मृत्यू झाला आहे. डिसेंबर महिन्यात या रुग्णाची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली होती. तेव्हा या रुग्णाला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

ओमिक्रॉनचा पहिला बळी

राजस्थानच्या उदयपूरमध्ये एका ७३ वर्षीय व्यक्तीचा ओमिक्रॉनमुळे मृत्यू झाला आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने या माहितीला दुजोरा दिला आहे. १५ डिसेंबर रोजी या रुग्णाला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. 


मधुमेह आणि इतर आजार

डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार या रुग्णाला आधी मधुमेह, उच्च रक्तदाब असे आजार होते. २१ डिसेंबर रोजी या रुग्णाची कोविड टेस्ट निगेटिव्ह आली होती.


२५ डिसेंबरला ओमिक्रॉनची लागण

या ७३ वर्षीय रुग्णाला ओमिक्रॉनची लागण झाल्याचे २५ डिसेंबरला स्पष्ट झाले. त्यानंतर ३१ डिसेंबर रोजी पहाटे साडे तीनच्या सुमारास त्यांचे निधन झाले. या रुग्णाने कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतले होते. 


पोस्ट कोविड न्युमोनियामुळे मृत्यू

२१ आणि २२ डिसेंबर रोजी या रुग्णाची कोविड टेस्ट निगेटिव्ह आली होती. रुग्णाचा मृत्यू पोस्ट कोविड न्युमोनियामुळे झाल्याचे आधी सांगण्यात आले होते.  या रुग्णाचा कुठलीही ट्रॅव्हेल हिस्ट्री आढळली नाही. या रुग्णाला मधुमेह, हायपरटेन्शन आणि हाइपोथॉइरोडिज्म  सारखे आजार असल्याने ओमिक्रॉनने त्यांच्या शरीरावर आघात केले आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला. 

राज्यात ७५ रुग्ण

मंगळवारी राज्यात ७५ ओमिक्रॉनचे रुग्ण आढळले आहेत. सध्या महाराष्ट्रात ६५३ ओमिक्रॉनचे रुग्ण आहेत. दिल्लीत ४६४ रुग्ण असून देशात एकूण ओमिक्रॉन रुग्णांची संख्या २ हजार १३५ वर पोहोचली आहे. 

राज्यात आणि देशात कोरोनाचे संकट पुन्हा वाढत आहे. दिवसेंविस कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. कोरोनाचे संकट असतना नवा व्हेरियंट ओमिक्रॉनने राज्याची डोकेदुखी वाढली आहे. गेल्या २४ तासांत राज्यात ओमिक्रॉनचे ७५ रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी निर्बंध लादण्यात आले आहे. लसीकरणाचा वेग वाढवण्यात आला असून सार्वजनिक ठिकाणी लस न घेतल्याला नागरिकांना मज्जाव करण्यात आला आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी