भारतातील पहिला मंकीपॉक्सचा रुग्ण केरळमध्ये

first monkeypox case in India confirmed in Kerala : मंकीपॉक्स या आजाराचा भारतातील पहिला रुग्ण केरळमध्ये आढळला आहे. हा रुग्ण विमानाने मंगळवार १२ जुलै २०२२ रोजी यूएई येथून तिरुअनंतपूरम येथे परतला होता.

first monkeypox case in India confirmed in Kerala
भारतातील पहिला मंकीपॉक्सचा रुग्ण केरळमध्ये  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • भारतातील पहिला मंकीपॉक्सचा रुग्ण केरळमध्ये
  • रुग्ण विमानाने मंगळवार १२ जुलै २०२२ रोजी यूएई येथून तिरुअनंतपूरम येथे परतला होता
  • रुग्णाची प्रकृती सध्या स्थिर

first monkeypox case in India confirmed in Kerala : मंकीपॉक्स या आजाराचा भारतातील पहिला रुग्ण केरळमध्ये आढळला आहे. हा रुग्ण विमानाने मंगळवार १२ जुलै २०२२ रोजी यूएई येथून तिरुअनंतपूरम येथे परतला होता. रुग्णाची प्रकृती सध्या स्थिर आहे. वैद्यकीय पथक त्याच्यावर उपचार करत आहे. केंद्र सरकारची एक टीम केरळला रवाना झाली आहे. परिस्थितीचा आढावा घेऊन ही टीम केंद्रीय आरोग्य मंत्रालयाला एक अहवाल सादर करणार आहे.

ज्या व्यक्तीला मंकीपॉक्स झाला आहे त्या व्यक्तीचे आईवडील, एक टॅक्सी चालक, एक ऑटो चालक, विमानात संबंधित व्यक्तीच्या आसपास बसलेले ११ प्रवासी एवढ्या नागरिकांच्या तब्येत बारकाईन लक्ष ठेवले जात आहे. ज्यांच्या तब्येतील लक्ष ठेवले जात आहे त्यांच्यापैकी कोणीही तब्येत बिघडल्याची तक्रार अद्याप केलेली नाही. 

केरळ सरकारने दिलेल्या माहितीनुसार पहिला मंकीपॉक्सचा रुग्ण कोल्लम जिल्ह्यातील रहिवासी आहे. या व्यक्तीला मंकीपॉक्सची बाधा झाल्याची माहिती जागतिक आरोग्य संघटनेना देण्यात आली आहे. जागतिक आरोग्य संघटना आणि भारत सरकारने मंकीपॉक्स संदर्भात मार्गदर्शन करणाऱ्या सूचना आधीच दिल्या आहेत. या सूचनांचे पालन करून आवश्यक ती खबरदारी घेत असल्याचे केरळ सरकारने सांगितले.

मंकीपॉक्स म्हणजे काय?, मंकीपॉक्सच्या रुग्णावर कसे करावे उपचार?, मंकीपॉक्सच्या रुग्णाने कोणती खबरदारी घ्यावी?

कोरोना प्रमाणे मंकीपॉक्स प्रकरणी आरोग्य आणीबाणी जाहीर करावी की करू नये याबाबत जागतिक आरोग्य संघटनेने अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. संघटनेच्या आगामी बैठकीत मंकीपॉक्सचे जगात आढळलेले रुग्ण आणि त्यांच्यावर सुरू असलेले उपचार तसेच घेतली जात असलेली खबरदारी याचा आढावा घेतला जाईल. 

मंकीपॉक्स आजाराची लक्षणे कांजिण्या (कांजण्या) या आजारासारखी पण सौम्य स्वरुपाची असतात. मंकीपॉक्स झाल्यावर त्वचेवर लालसर रंगाचे फोड येतात. हे फोड आल्यावर खाजवले तर फोड फुटून त्यातून बाहेर पडणारा द्राव संसर्ग पसरवू शकतो. यामुळे मंकीपॉक्स झालेल्या व्यक्तीला वैद्यकीय सल्ल्याने स्वतंत्र खोलीत राहून उपचार घेण्याचा सल्ला डॉक्टर देतात. मंकीपॉक्स हा दोन ते चार आठवड्यात बरा होणारा आजार आहे. पण सध्या या आजारावर ठोस उपचार पद्धती अस्तित्वात आलेली नाही. अनेक डॉक्टर कांजिण्या (कांजण्या) या आजारावर करतात तशा स्वरुपाचे उपचार करून आणि विशिष्ट औषधे लागू पडली नाही तर रुग्णाच्या तब्येतीचा अंदाज घेऊन अनुभवाने औषधे बदलून उपचार करत आहेत. यामुळे सध्या मंकीपॉक्सचा मृत्यूदर ३-६ टक्के आहे. 

मंकीपॉक्स हा आजार १९५८ मध्ये पहिल्यांदा माकडांमध्ये आढळला आणि १९७० मध्ये तो माणसाला झाल्याचे पहिले उदाहरण सापडले. हा आजार प्रामुख्याने आफ्रिका खंडातील मध्य आणि पश्चिम भागातील देशांमध्ये मोठ्या प्रमाणावर आढळतो. इतर देशांमध्ये मंकीपॉक्सचे रुग्ण अधूनमधूनच आढळले आहेत. 

जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या माहितीनुसार, मंकीपॉक्स झाल्यास ताप येणे, त्वचा लालसर दिसणे, त्वचेवर लालसर रंगाचे फोड येणे, अंगदुखी अशा स्वरुपाची लक्षणे आढळतात.

मंकीपॉक्स झालेल्या व्यक्तीने आदर्श स्थिती स्वतंत्र खोलीत राहून स्वच्छतेचे नियम पाळून वैद्यकीय उपचार घ्यावे. वैद्यकीय सल्ल्याने पथ्ये आणि औषधोपचार यांचे पालन करावे. मंकीपॉक्स झालेल्या व्यक्तीच्या वस्तू वापरणे संबंधित व्यक्ती बरी होईपर्यंत टाळावे. मंकीपॉक्स झाल्यावर त्वचेवर लालसर रंगाचे फोड येतात. हे फोड आल्यावर खाजवले तर फोड फुटून त्यातून बाहेर पडणारा द्राव संसर्ग पसरवू शकतो. सर्वांनी ही बाब लक्षात घ्यावी आणि मंकीपॉक्स झालेल्या व्यक्तीच्या शरीरावर आलेले लालसर फोड खाजवून फोडू नये. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी