कोरोनाचा प्रभाव कमी करणारी अँटी व्हायरल गोळी

First pill to treat Covid gets approval in UK कोरोना या संसर्गजन्य आजाराचा प्रभाव कमी करणाऱ्या जगातील पहिल्या अँटी व्हायरल गोळीला आपत्कालीन वापराची मंजुरी इंग्लंडने दिली. या गोळीचे नाव मोल्नुपिराविर आहे.

First pill to treat Covid gets approval in UK
कोरोनाचा प्रभाव कमी करणारी अँटी व्हायरल गोळी 
थोडं पण कामाचं
  • कोरोनाचा प्रभाव कमी करणारी अँटी व्हायरल गोळी
  • इंग्लंड वगळता जगातील कोणत्याही देशाने अद्याप मंजुरी दिलेली नाही
  • कोरोनाची सौम्य लक्षणे आढळलेल्यांवर अँटी व्हायरल गोळीद्वारे उपचार

First pill to treat Covid gets approval in UK । लंडन: कोरोना या संसर्गजन्य आजाराचा प्रभाव कमी करणाऱ्या जगातील पहिल्या अँटी व्हायरल गोळीला आपत्कालीन वापराची मंजुरी इंग्लंडने दिली. या गोळीचे नाव मोल्नुपिराविर आहे. कोरोनाची सौम्य लक्षणे ज्या रुग्णांमध्ये आढळतील त्यांना दिवसातून दोन वेळा ही गोळी घ्यावी लागेल. या गोळीमुळे कोरोनाचा प्रभाव लवकर कमी होईल आणि तब्येत सुधारण्याचा वेग वाढेल.

इंग्लंड वगळता जगातील कोणत्याही देशाने अद्याप कोरोनाचा प्रभाव कमी करणाऱ्या मोल्नुपिराविर या अँटी व्हायरल गोळीला मंजुरी दिलेली नाही. पण ही गोळी तसेच आणखी काही कोरोना प्रतिबंधक औषधे विकसित करुन बाजारात आणण्यात यश मिळाले तर कोरोना संकटावर मात करणे आणखी सोपे होईल.

इंग्लंड सरकारच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार मोल्नुपिराविर या अँटी व्हायरल गोळीचा साठा त्यांच्याकडे उपलब्ध आहे. ऑक्टोबर २०२१ मध्येच इंग्लंडच्या आरोग्य विभागाने ४ लाख ८० हजार गोळ्यांचा साठा केला होता. या साठ्यात वाढ केली जात आहे. 

देशातील कोरोनाची सौम्य लक्षणे आढळलेल्या अनेक रुग्णांवर मोल्नुपिराविर या अँटी व्हायरल गोळीद्वारे उपचार करण्याची इंग्लंड सरकारची योजना आहे. यासाठी नियोजन सुरू आहे.

 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी