First prize to Maharashtra : दिल्लीत आंतरराज्यीय सांस्कृतिक स्पर्धेत महाराष्ट्राला प्रथम पारितोषिक

First prize to Maharashtra in Inter-State Cultural Competition in Delhi : दिल्ली येथे आंतरराज्यीय सांस्कृतिक कार्यक्रमाच्या स्पर्धेमध्ये महाराष्ट्राला प्रथम पारितोषिक मिळाले. पंधरा संघ सहभागी असणाऱ्या या स्पर्धेत, महाराष्ट्राने गोंधळ या लोककला प्रकाराचे अप्रतिम सादरीकरण करून प्रथम क्रमांक पटकावला.

First prize to Maharashtra in Inter-State Cultural Competition in Delhi
दिल्लीत आंतरराज्यीय सांस्कृतिक स्पर्धेत महाराष्ट्राला प्रथम पारितोषिक 
थोडं पण कामाचं
  • दिल्लीत आंतरराज्यीय सांस्कृतिक स्पर्धेत महाराष्ट्राला प्रथम पारितोषिक
  • पंधरा संघ सहभागी असणाऱ्या या स्पर्धेत महाराष्ट्राने मारली बाजी
  • महाराष्ट्राने गोंधळ या लोककला प्रकाराचे अप्रतिम सादरीकरण केले

First prize to Maharashtra in Inter-State Cultural Competition in Delhi : नवी दिल्ली : दिल्ली येथे आंतरराज्यीय सांस्कृतिक कार्यक्रमाच्या स्पर्धेमध्ये महाराष्ट्राला प्रथम पारितोषिक मिळाले. पंधरा संघ सहभागी असणाऱ्या या स्पर्धेत, महाराष्ट्राने गोंधळ या लोककला प्रकाराचे अप्रतिम सादरीकरण करून प्रथम क्रमांक पटकावला.

प्रजासत्ताक दिनी महाराष्ट्राचा चित्ररथ राजपथावरील संचलनात सहभागी होणार आहे. 'महाराष्ट्रातील जैवविविधता व जैव मानके' या विषयावर महाराष्ट्राने चित्ररथ तयार केला आहे. चित्ररथ संचलनात सहभागी झालेल्या राज्यांना प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याआधी दिल्लीत होणाऱ्या आंतरराज्यीय सांस्कृतिक कार्यक्रमाच्या स्पर्धेत सहभागी होण्याची संधी मिळते. यंदाच्या (२०२२) स्पर्धेत १५ सांस्कृतिक कार्यक्रम सादर झाले. विविध राज्यांनी तसेच केंद्र सरकारच्या विभागांनी लोककला व इतर सांस्कृतिक कार्यक्रमांचे या स्पर्धेमध्ये सादरीकरण केले होते.

महाराष्ट्राकडून भैरी भवानी परफॉरमिंग आर्टस्  या लोककला समूहाने गोंधळ या लोककला प्रकाराचे अप्रतिम सादरीकरण केले. या सादरीकरणात एकूण १४ कलाकारांनी भाग घेतला. या सादरीकरणाचे कौतुक झाले तसेच स्पर्धेअंती महाराष्ट्राला प्रथम क्रमांकाचे पारितोषिक देण्यात आले. चषकाच्या स्वरूपातील हे पारितोषिक, महाराष्ट्रातील जनता व कलेस समर्पित केल्याची भावना अमेय पाटील यांनी व्यक्त केली. 

कला सादरीकरणामध्ये अमेय पाटील, भावना चौधरी, संजय बलसाने, शिल्पेश तांबे, सुशांत पवार, पारस बारी, हरिश्चंद्र कोटीयन, अशोक जिंका, हिमानी दळवी, प्राजक्ता गवळी, तेजस गुरव, विशाखा मोरे, वैदेही मोहिते, निधीशा सॅलियन, किरण जुवळे, अंकिता पाटलेकर या कलाकारांनी भाग घेतला. पुरस्कार मिळाल्याचे कळताच राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख, सांस्कृतिक राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर, सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव सौरभ विजय व संचालक विभीषण चवरे यांनी महाराष्ट्राच्यावतीने स्पर्धेत सहभागी झालेल्या पथकाचे अभिनंदन केले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी