Monkeypox : भारतात मंकीपॉक्सचा पहिला बळी; युएईहून केरळमध्ये परतलेल्या एका रुग्णाचा मृत्यू

केरळमध्ये (Kerala ) मंकीपॉक्स (Monkeypox ) सदृश्य लक्षणं असलेल्या एका रुग्णाचा मृत्यू झाल्याने या आजाराविषयी (disease) भिती नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे. मृत पावलेला व्यक्ती हा संयुक्त अरब अमिरातीहून (UAE) केरळमध्ये परतलेला होता. या रुग्णामध्ये मंकीपॉक्स विषाणू (virus) सदृश्य लक्षणे आढळली होती. केरळच्या (Kerala ) आरोग्य मंत्री (Health Minister) वीना जॉर्ज (Veena George) यांनी रविवारी याविषयीची अधिकची माहिती दिली.

Monkeypox Suspected Dies in Kerala
Monkeypox : भारतात मंकीपॉक्सचा पहिला बळी   |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • युएईहून परतलेल्या 22 वर्षीय तरुणाचा मृत्यू
  • या रुग्णाचा मृत्यू मंकीपॉक्समुळे झाल्याचा संशय
  • मंकीपॉक्स हा संसर्गजन्य रोग आहे, मात्र याचा संसर्ग कोरोनाप्रमाणे अधिक स्तरावर होत नाही.

Monkeypox Suspected Dies in Kerala : केरळमध्ये (Kerala ) मंकीपॉक्स (Monkeypox ) सदृश्य लक्षणं असलेल्या एका रुग्णाचा मृत्यू झाल्याने या आजाराविषयी (disease) भिती नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे. मृत पावलेला व्यक्ती हा संयुक्त अरब अमिरातीहून (UAE) केरळमध्ये परतलेला होता. या रुग्णामध्ये मंकीपॉक्स विषाणू (virus) सदृश्य लक्षणे आढळली होती. केरळच्या (Kerala ) आरोग्य मंत्री (Health Minister) वीना जॉर्ज (Veena George) यांनी रविवारी याविषयीची अधिकची माहिती दिली.

युएईहून परतलेल्या 22 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. या रुग्णामध्ये मंकीपॉक्स विषाणू सदृश्य लक्षणे आढळली होती. या रुग्णाचा मृत्यू मंकीपॉक्समुळे झाल्याचा संशय आहे. या रुग्णाला इतर कोणताही आजार नव्हता. रुग्णाचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले असून आरोग्य विभाग तरुणाच्या मृत्यूचं कारण शोधण्याचा प्रयत्न करत असल्याचं आरोग्य मंत्री वीना जॉर्ज यांनी सांगितलं.

Read Also : संकेतला CWG मध्ये गोल्ड मेडलं गमवल्याचं दु:ख, पण...

कोरोनाप्रमाणे अधिक प्रमाणात पसरत नाही

आरोग्य मंत्री वीना जॉर्ज यांनी सांगितलं आहे की, 'हा तरुण 21 जुलै रोजी यूएईहून परतला होता, पण त्याला रुग्णालयात दाखल करण्यात उशीर का झाला, याची चौकशी करण्यात येईल. आरोग्य मंत्र्यांनी पुढे सांगितलं की, मंकीपॉक्स हा संसर्गजन्य रोग आहे, मात्र याचा संसर्ग कोरोनाप्रमाणे अधिक स्तरावर होत नाही. कोरोनाच्या तुलनेनं मंकीपॉक्समुळे मृत्यू होण्याचे प्रमाण कमी आहे. दरम्यान 22 वर्षीय तरुणाचा मृत्यू कशामुळे झाला याचा अधिक तपास सुरु आहे.'
मंकीपॉक्स आजार पसरत असल्याने याचा प्रसार रोखण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात आल्याची माहिती आरोग्य मंत्र्यांनी दिली आहे. या आजाराबाबत अधिक माहिती उपलब्ध होण्यासाठी केरळमध्ये यावर संशोधन सुरू आहे. 

Read Also : ऑगस्टमध्ये सणांची रेलचेल, पाहा बॅंकेच्या सुट्ट्यांची यादी

मंकीपॉक्सचा व्हायरस कसा पसरतो?

हा व्हायरल प्राण्यांमार्फत पसरतो. हा व्हायरस शरीरात असणारे प्राणी दुसऱ्या प्राण्यांकडे हा व्हायरस संक्रमित करतात. माणसाच्या शरीरातही हा व्हायरस प्रवेश करू शकतो. कुठल्याही प्रकारे या व्हायरसच्या संपर्कात आल्याने किवा संक्रमित व्यक्तीसोबतच्या लैंगिक संबंधांमुळेही हा व्हायरस पसरण्याची शक्यता असते.

Read Also : वजन कमी करताना टाळा या चुका...

काय आहेत उपाय?

या व्हायरसवर अद्याप कुठलंही रामबाण औषध आलेलं नाही. सध्या बाजारात असं कुठलंही औषध उपलब्ध नाही, जे या व्हायरसला मारू शकेल. याचा सिंड्रोमिक इलाज करण्यात येतो. जर या काळात ताप आला, तर तापाचं औषध, जर घाम येत असेल तर डिहायड्रेशनवरचा उपाय करून या आजाराचा सामना केला जातो. हा आपोआप बरा होणारा आजार आहे. काही दिवसांत शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती या व्हायरसवर मात करते. मात्र त्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती शरीरात चांगल्या स्वरुपात असणं गरजेचं असतं. 

मंकीपॉक्सच्या आजाराची लक्षणे 


ताप, लसिका ग्रंथींना (कानामागील, काखेतील, जांघेतील लसिका ग्रंथ) सूज येणे, डोकेदुखी, अंगदुखी, थंडी वाजणे, घाम येणे, घसा खवखवणे आणि खोकला या प्रकारची लक्षणे रुग्णात आढळतात. कुपोषण, कमी प्रादुर्भाव आणि प्रतिकारक शक्ती कमी असलेल्या समूदायामध्ये मंकीपॉक्स गंभीर स्वरुप धारण करु शकतो.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी