गर्भवती तरुणीवर दारुड्यांनी केला सामूहिक बलात्कार, धक्का सहन न झाल्याने तरुणीच्या प्रियकराची आत्महत्या

लोकल ते ग्लोबल
Updated Aug 13, 2019 | 17:40 IST | टाइम्स नाऊ मराठी

Gang Raped on Pregnant Young Lady: एका १९ वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्काराची घटना जयपूरमध्ये घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी सर्व आरोपींना अटक केली आहे.

rape case
गर्भवती तरुणीवर दारुड्यांनी केला सामूहिक बलात्कार  |  फोटो सौजन्य: Representative Image

थोडं पण कामाचं

  • २ महिन्यांच्या गर्भवती तरुणीवर ५ जणांचा सामूहिक बालत्कार
  • प्रेयसीवरील बलात्कारच्या धक्क्याने प्रियकारने केली आत्महत्या
  • पोलिसांनी शिताफिने पकडलं सर्व आरोपींना

जयपूर: महिलांवर होणारे अत्याचार दिवसेंदिवस वाढतच चालले आहेत. गुन्हेगार कायद्याला अजिबात न भिता महिलांना आपल्या वासनेची शिकार बनवत आहे. अशीच एक धक्कदायक घटना जयपूरमधील बांसवाडा येथे समोर आली आहे. जिथे एका गर्भवती  तरुणीसोबत ५ जणांनी सामूहिक बलात्कार करुन तिला रस्त्याच्या बाजूला फेकून दिलं होतं. तर पीडितेच्या प्रियकराला हा धक्का सहन झाल्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. मिळालेल्या माहितीनुसार, तरुणी दोन महिन्यांची गर्भवती होती. पण या सामूहिक बलात्कारानंतर तिचा गर्भ देखील निकामी झाला आहे. दरम्यान, या भीषण गुन्ह्याप्रकरणी पोलीस आता गुन्हेगारांचा शोध घेत आहेत. 

मीडिया रिपोर्टनुसार, १९ वर्षीय तरुणी ही दोन महिन्यांची गर्भवती होती. ती आपल्या प्रियकरासोबत बांसवाडामधील आपल्या गावी जात होती. याच दरम्यान, रात्री जवळजवळ ८ वाजेच्या दरम्यान, सुनील, विकास आणि जितेंद्र या तीन वासनांध आरोपींनी त्यांची बाइक थांबवून पीडिता आणि तिच्या प्रियकराला लोखंडी रॉडने मारहाण केली. यानंतर त्या तिघांनीही प्रियकराला तिथून जाण्यास सांगितलं. प्रियकर गावात येताच त्याने एका झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. 

पोलिसांच्या मते, ही घटना १३ जुलैला रात्री झाली होती. तीनही आरोपी हे दारुच्या नशेत होते. त्यांनी पीडित तरुणीला निर्जन स्थळी नेऊन तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. यानंतर ते पीडितेला आरोपी सुनीलच्या गावी घेऊन गेले. जिथे त्यांनी नरेश आणि विजय या आपल्या आणखी दोन मित्रांनाही बोलावलं. या दोघांनीही नंतर पीडितवर पुन्हा बलात्कार केला. 

याबाबत आणखी माहिती देताना एका पोलीस अधिकाऱ्याने अशी माहिती दिली की, सामूहिक बलात्कारानंतर आरोपींनी पीडित तरुणीला १४ जुलै रोजी पहाटे चार वाजता रस्त्याच्या बाजूला फेकून दिलं. दरम्यान, या सर्व प्रकारानंतरही पीडित तरुणीने घडल्या प्रकाराबाबत कुणालाच सांगितलं नव्हतं. जेव्हा पोलीस पीडित तरुणीच्या प्रियकराच्या मृत्यूचा तपास करत होते तेव्हा त्यांनी त्या दरम्यान आरोपी जितेंद्र याला अटक केली होती. त्याचवेळी त्याने या सामूहिक बलात्काराबाबत पोलिसांना सांगितलं.

जितेंद्रने पीडित तरुणीच्या प्रियकराचा मोबाइल त्याच्याकडून हिसकावून घेतला होता. त्यानंतर त्याने तो फोन आपल्या पत्नीला दिला होता. जेव्हा हा फोन सुरु करण्यात आला त्यावेळी पोलिसांना जितेंद्रच्या लोकेशनबद्दल माहिती मिळाली. त्यामुळे पोलिसांनी तात्काळ जितेंद्रला अटक केली. 

दरम्यान, पीडित तरुणीवर सध्या उपचार सुरु आहेत. तिने पोलिसांसमोर संपूर्ण घटनेबाबत माहिती दिली आहे. यानंतर पोलिसांनी पीडित तरुणीची तक्रार देखील नोंदवून घेतली. त्यानंतर सर्व आरोपींना अटकही केली. यापैकी ४ आरोपींना कोर्टात हजर करण्यात आलं होतं. या संपूर्ण प्रकारामुळे पीडित तरुणीला खूप मोठा मानसिक धक्का बसला आहे. एकीकडे स्वत:वर झालेला आघात आणि दुसरीकडे प्रियकराला गमावल्याचं दु:ख यामुळे पीडित तरुणी पूर्णत: कोलमडून गेली आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
गर्भवती तरुणीवर दारुड्यांनी केला सामूहिक बलात्कार, धक्का सहन न झाल्याने तरुणीच्या प्रियकराची आत्महत्या Description: Gang Raped on Pregnant Young Lady: एका १९ वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्काराची घटना जयपूरमध्ये घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी सर्व आरोपींना अटक केली आहे.
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola
Recommended Articles
INX Media case: काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय अर्थमंत्री पी चिदंबरम यांना अटक
INX Media case: काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय अर्थमंत्री पी चिदंबरम यांना अटक
पाकिस्तानला मोठा झटका देण्यासाठी मोदी सरकारने केला 'हा' सर्वात मोठा प्लान
पाकिस्तानला मोठा झटका देण्यासाठी मोदी सरकारने केला 'हा' सर्वात मोठा प्लान
जीएसटीने केला घोळ; पार्ले कंपनी दहा हजार कामगारांना काढून टाकणार
जीएसटीने केला घोळ; पार्ले कंपनी दहा हजार कामगारांना काढून टाकणार
P Chidambaram INX Media case: चिदंबरम यांच्या अडचणींमध्ये वाढ; सर्वोच्च न्यायलयाकडूनही अद्याप दिलासा नाही
P Chidambaram INX Media case: चिदंबरम यांच्या अडचणींमध्ये वाढ; सर्वोच्च न्यायलयाकडूनही अद्याप दिलासा नाही
पंतप्रधान मोदींच्या न्यू यॉर्क भेटीत अडचण आणण्यासाठी हा प्लान करत आहे पाकिस्तान 
पंतप्रधान मोदींच्या न्यू यॉर्क भेटीत अडचण आणण्यासाठी हा प्लान करत आहे पाकिस्तान 
ज्या इमारतीचं उद्घाटन केलं तिथेच आरोपी म्हणून आले चिदंबरम! 
ज्या इमारतीचं उद्घाटन केलं तिथेच आरोपी म्हणून आले चिदंबरम! 
Donald Trump On Kashmir: काश्मीर प्रश्नावर डोनाल्ड ट्रम्प यांना चिंता; मध्यस्थीची तयारी
Donald Trump On Kashmir: काश्मीर प्रश्नावर डोनाल्ड ट्रम्प यांना चिंता; मध्यस्थीची तयारी
उत्तराखंड :  पूरग्रस्त भागात मदत सामुग्री घेऊन जाणाऱ्या हेलिकॉप्टरला अपघात, २ जण ठार 
उत्तराखंड :  पूरग्रस्त भागात मदत सामुग्री घेऊन जाणाऱ्या हेलिकॉप्टरला अपघात, २ जण ठार