sonia gandhi: फडकवण्याआधीच सोनिया गांधींच्या हातातून पडला झेंडा, एक क्षणासाठी कावऱ्याबावऱ्या झाल्या अध्यक्ष

लोकल ते ग्लोबल
Updated Dec 28, 2021 | 14:54 IST | टाइम्स नाऊ मराठी

congress foundation day: काँग्रेस स्थापना  दिवस निमित्त ध्वजारोहण करताना काँग्रेसचा झेंडा खाली पडला. 

sonia gandhi
congress: फडकवण्याआधीच सोनिया गांधींच्या हातातून पडला झेंडा 
थोडं पण कामाचं
  • काँग्रेस पक्ष स्थापनेच्या निमित्ताने ध्ववजारोहण
  • ध्वजारोहण करताना सोनिया गांधींच्या हातून पडला झेंडा
  • व्हिडिओ आला समोर

मुंबई: काँग्रेसच्या १३७व्या स्थापना दिवसानिमित्त(congress foundation day) अजब घटना समोर आली. खरंतर, पक्ष कायालयाच्या स्थापना दिवसाच्या समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या समारंभात काँग्रेसच्या मोठ्या नेत्यांसह कार्यकर्तेही सामील होते. समारंभादरम्यान जेव्हा काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी(congress interim president sonia gandhi) जेव्हा ध्वजारोहण करत होत्या तेव्हा काँग्रेसचा झेंडाच खाली पडला. या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे हा व्हिडिओ एएनआयने ट्वीट केला आहे. flag fall down from sonia gandhi hand during flag hoisting

पक्षात पुन्हा प्राण ओतण्याचा प्रयत्न

सलग दोन लोकसभा निवडणुकीत आणि राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या पराभवाने पक्षात मरगळ आली आहे.या स्थापना दिवसाच्या निमित्ताने पक्षामध्ये नव्याने प्राण ओतण्याचा प्रयत्न केला जात आहे. स्थापना दिवसाच्या निमित्ताने नेता आणि कार्यकर्ते आंदोलन आणि प्रदर्शनाच्या रणनितीवर पुढे जाण्याचा संकल्प करतील. काँग्रेस आता बेरोजगारी आणि सरकारी कंपन्यांचे खाजगीकरण या मुद्द्यांवर हल्लाबोल करणार आहे. 

काँग्रेसचे ट्रेनिंग अभियान

समितीच्या सदस्यांच्या माहितीनुसार पक्ष देशभरातील जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी एक ट्रेनिंग अभियान घेत आहे. जिल्हा आणि ब्लॉक स्तरावर साधारण ५५०० ट्रेनर तयार केले जात आहेत. 

गांधीजींचा अपमान, कालीचरण महाजारांविरोधात गुन्हा दाखल

छत्तीसगडची राजधानी रायपूरमध्ये धर्मसंसदेचे आयोजन करण्यात आले होते. तेव्हा महाराष्ट्रातील कालीचरण महाराजही या धर्मसंसदेत सामील झाले होते. तेव्हा कालीचरण यांनी चिथावणीखोर भाषण दिले. कालीचरण म्हणाले की इस्लामला राजकारणाच्या माध्यमातून देशावर कब्जा करायचे आहे. आपल्याच डोळ्यांसमोर त्यांनी १९४७ साली आपल्या देशावर ताबा मिळवला होता. त्यापूर्वी त्यांनी इराण, इराक आणि अफगाणिस्तानवर ताबा मिळवला होता. राजकारणाच्या माध्यमातूनच मुस्लिमांनी बांग्लादेश आणि पाकिस्तानवर ताबा मिळवला. गांधीना मारणार्‍या नथुराम गोडसेला मी नमन करतो असेही कालीचरण म्हणाले.कालीचरण यांचा हा वादग्रस्त व्हिडीओ व्हायरल झाला आहे.  मिळालेल्या माहितीनुसार महात्मा गांधींविरोधात अपशब्द काढणार्‍या कालीचरणविरोधात्र छत्तीसगडमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील कारवाई सुरू आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी