Flight Delayed : प्रेमी युगुलातील ‘मोबाईल चॅट’मुळे विमानाला सहा तास उशीर, अगोदर टेन्शन मग ‘फुस्स’!

आपल्या शेजारी बसलेल्या तरुणाच्या मोबाईलवर एक संशयास्पद मेसेज आल्याचं त्याच्या शेजारी बसलेल्या महिलेनं पाहिलं आणि तिला संशय आला. तिने तक्रार केली आणि पुढं जे व्हायचं तेच झालं.

Flight Delayed
प्रेमी युगुलातील ‘मोबाईल चॅट’मुळे विमानाला सहा तास उशीर  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • महिलेने वाचला शेजारच्या प्रवाशाच्या मोबाईलमधील मेसेज
  • केबिन क्रूकडे नोंदवली तक्रार
  • तपासणीअंती समजले सत्य

Flight Delayed : मेंगलोरवरून मुंबईकडे (Menglore - Mumbai Flight) यायला निघालेलं एक विमान एका मोबाईल चॅटमुळे 6 तास उशीरा निघाल्याची (Delayed) घटना नुकतीच समोर आली आहे. या विमानाने टेक-ऑफ करण्याची सगळी तयारी केली होती. प्रवासी विमानात बसले होते. सिट बेट कसा लावावा वगैरे सूचना सुरू झाल्या होत्या. मात्र तेवढ्यात एका महिलेनं तिच्या शेजारी बसलेल्या एका व्यक्तीच्या मोबाईलवर आलेला मेसेज (Message on mobile) चुकून पाहिला. तो मेसेज वाचून ती चांगलीच घाबरली. आपण ज्या विमानाने प्रवास करत आहोत, त्या विमानात काहीतरी दगाफटका होण्याची शक्यता आहे, असं तिच्या लक्षात आल्यावर तिने तातडीने ही बाब केबिन क्रूच्या कानावर घातली. त्यानंतर विमानाचं टेक-ऑफ (Take off) काही मिनिटांसाठी पुढे ढकलण्यात आलं आणि या महिलेला केबिनमध्ये बोलावण्यात आलं. आपल्या शेजारी बसलेल्या एका तरुणाच्या मोबाईलवर विमानाच्या सुरक्षेसंबंधी एक मेसेज आल्याचं पाहिलं होतं. 

प्रवाशांच्या साहित्याची तपासणी

महिलेनं शंका उपस्थि केल्यानंतर अगोदर त्या तरुणाच्या सर्व साहित्याची तपासणी करण्यात आली. त्यात काहीही संशयास्पद आढळून आलं नाही. त्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून त्या तरुणाला खाली उतरवण्यात आलं आणि त्याची चौकशी कऱण्यात आली. या दरम्यान विमानातील सर्व साहित्याची तपासणीही करण्यात आली. मात्र कुठेच काही संशयास्पद आढळलं नाही. 

काय होता प्रकार?

हा तरुण त्याच्या गर्लफ्रेंडसोबत मोबाईलवर चॅटिंग करत होता. मेंगलोर विमानतळावरून हे दोघंही एकाच वेळी वेगवेगळ्या विमानाने वेगवेगळ्या शहरांत चालले होते. तरुण मुंबईला चालला होता तर त्याची गर्लफ्रेंड दुसऱ्या विमानाने बंगळुरूला चालली होती. तरुणाला खाली उतरवून त्याची चौकशी करत असताना त्याला ज्या मोबाईलवरून हा मेसेज आला, त्याच्याशी संपर्क साधून खातरजमा करण्याचा प्रयत्न पोलीस करत होते. मात्र तोपर्यंत बंगळुरूला जाणारं ते विमान हवेत झेपावलं होतं आणि तिचा फोन बंद झाला होता. त्यानंतर विमान बंगळुरूत लँड होईपर्यंत त्या तरुणाला बसवून ठेवण्यात आलं आणि त्याच्याकडून अनेक प्रश्नांची उत्तरं घेण्यात आली. 

अधिक वाचा - Independence Day 2022 : भारताप्रमाणेच15 ऑगस्टला स्वतंत्र झाले हे पाच देश, वाचा सविस्तर

सहा तासांनी उडालं विमान

हा केवळ दोन व्यक्तींमधल्या मजेशीर गप्पांचा भाग होता, हे तपासाअंती स्पष्ट झालं. सुरक्षा व्यवस्था या विषयावर ते दोघं बोलत होते आणि त्याबाबतच्या वेगवेगळ्या शक्यतांवर चर्चा करत होते. मात्र ते मेसेज वाचल्यामुळे तरुणाच्या शेजारी बसलेल्या महिलेचा गैरसमज झाला आणि तिने केबिन क्रूकडे तक्रार केली. त्यानंतर पुढचे सहा तास या सगळ्या प्रकाराची चौकशी चालली आणि त्यानंतर विमान हवेत झेपावले. 

अधिक वाचा - Arvind Kejriwal: या दोन गोष्टींवर लक्ष द्या; आपल्या देशही अमेरिका, फान्स, इटलीसारखा होईल, केजरीवाल यांचा सरकारला सल्ला

पोलीस तक्रार नाही

तरुणाने काहीही गुन्हा केला नसल्यामुळे या प्रकरणाची कुठलीही तक्रार नोंदवण्यात आली नाही. मात्र त्यामुळे प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी