नेपाळने सोडले पाणी, नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी, रेड अलर्ट जारी

लोकल ते ग्लोबल
Updated Jun 17, 2021 | 19:24 IST | टाइम्स नाऊ मराठी

गंडक नदी वेगाने धोक्याची पातळी ओलांडत आहे. हे पाहता सिंचन विभागाने रेड अलर्ट जारी केला आहे. 

rain
नेपाळने सोडले पाणी, नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी 

थोडं पण कामाचं

  • गंडक नदी वेगाने धोक्याची पातळी ओलांडण्याच्या दिशेने जात आहे.
  • मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात आल्याने यूपी-बिहारमधील अनेक जिल्ह्यांमध्ये पुराची स्थिती निर्माण झाली आहे.
  • अनेक जिल्ह्यांमध्ये प्रशासनानने रेड अलर्ट जारी केला आहे.

मुंबई: मुसळधार पावसानंतर नेपाळकडून(nepal) मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात आल्याने यूपी-बिहारमधील अनेक जिल्ह्यांमध्ये पुराची स्थिती निर्माण झाली आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये प्रशासनानने रेड अलर्ट(red alert)  जारी केला आहे. यूपीच्या महराजगंजमध्ये गेल्या तीन दिवसांासून मान्सून पावसाममुळे जिल्ह्यात पुरस्थिती निर्माण केली आहे. यातच नेपाळने बुधवारी बडी गंडक नदीतून ४ लाख १२ हजार क्युसेक पाणी सोडले. याच कारणामुळे वाल्मिकीनगर येथील गंडक नदीवर बनवण्यात आलेले बॅरेजचे सर्व ३६ फाटक खोलावे लागले. flood situation in up bihar

गंडक नदी वेगाने धोक्याची पातळी ओलांडण्याच्या दिशेने जात आहे. हे पाहता सिंचन विभागाने येथील भागाला हाय अलर्टचा इशारा दिला आहे. नेपाळहून निघणारी रोहीन नदीने बुधवारी धोक्याची पातळी ओलांडली. चंदन नदी, प्यास नदी आणि पहाडी नाला महावही धोक्याची पातळी ओलांडून वाहत आहे.. महाव आणि झराव नदीत आलेल्या पाण्याने ४-४ स्थानांवर तटबंध तोडले. यामुळे सीमावर्ती भागातील अनेक गावांमध्ये पाणी घुसले आहे. 

धोक्याची पातळी ओलांडली या नद्यांनी

तिबेटच्या धौलागिरीमधून निघणारी गंडक नदी नेपाळच्या त्रिवेणीहून भारतीय सीमा यूपीच्या महराजगंजमध्ये प्रवेश केल्यानंतर बिहारला जाते. ही नदी धोक्याच्या पातळीपासून ३६५.३० फूटावर आहे. बुधवाी बडी गंडचा जलस्तर ३६०.६० फूट इतका रेकॉर्ड करण्यात आला. राप्ती नदीनेही धोक्याच्या पातळीपासून दोन मीटर खाली आहे. बुधवारी बेलसड-रिगौली बांधावर राप्ती नदीमध्येय ७८.३० मीटर पाण्याची पातळी होती. 

रोहिन नदी त्रिमुहनी घाटाववर धोक्याच्या पातळीपासून आठ सेंटीमीटर वर वाहत आहे. याची धोक्याची पातळी ८२.४४ मीटर इतकी आहे. बुधवारी रोहिन नदीमध्ये ८२.५२ मीटर पाणी रेकॉर्ड केले. चंदन नदीही धोक्याच्या पातळीपासून वर ४५ मीटर वाहत आहे. प्यास नदीनेही धोक्याची पातळी ओलांडली आहे. 

नेपाळची झरही नदीचे नाव भारतीय क्षेत्रात येताच चंदन नदी होते. बुधवारी या नदीने धोक्याचे लाल रंगाचे निशाण पार केले. याने ठुठीबारी क्षेत्राच्या राजाबारी, पजरफोरवा,दोमुहान गावाच्या जवळ यांचा बांध ४ ठिकाणी तुटला होता. 
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी