National Security Advisor Twitter : ट्विटरवर अजित डोभाल यांना फॉलो करताय?; मग तुम्ही धोक्यात आहात, MEA ने जारी केला अलर्ट

National Security Advisor Twitter : बहुतेकांचे ट्विटर अकाउंट (Twitter Account) आहेत, प्रसिद्ध व्यक्तींची मते जाणून घेण्यासाठी नवीन घडामोडींविषयी जाणून घेण्याविषयी आपण त्या प्रसिद्ध व्यक्तींना फॉलो करत असतो.

Follow Ajit Doval on Twitter Then you are in danger, MEA issued an alert
ट्विटरवर अजित डोभाल यांना फॉलो करताय?  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • अजित डोवाल हे १९६८ च्या आयपीएस केडरचे अधिकारी आहेत.
  • २००५ साली इंटेलिजेंस ब्युरोच्या प्रमुख पदावरून निवृत्त झाले होते.
  • २०१४ सालच्या निवडणुकांदरम्यान त्यांची भारताच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार पदी नेमणूक करण्यात आली.

National Security Advisor Twitter : नवी दिल्ली : बहुतेकांचे ट्विटर अकाउंट (Twitter Account) आहेत, प्रसिद्ध व्यक्तींची मते जाणून घेण्यासाठी नवीन घडामोडींविषयी जाणून घेण्याविषयी आपण त्या प्रसिद्ध व्यक्तींना फॉलो करत असतो. पंतप्रधानांपासून ते आमदारापर्यंत सर्वजण ट्विटर आहेत. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA) अजित डोभाल (Ajit Doval) यांचेही ट्विटर अंकाउंट आहे. परंतु याच्या अकाउंटविषयी परराष्ट्र मंत्रालयाने (Ministry of Foreign Affairs) नागरिकांना ताकीद दिली आहे. जर तुम्ही राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA) अजित डोभाल यांना ट्विटरवर फॉलो करीत असाल, तर सावधान! असा अलर्ट परराष्ट्र मंत्रालयाने नागरिकांना दिला आहे. डोभाल यांच्या अकाउंटविषयी, असा प्रश्न सर्वांना पडला असेल. 

अजित डोवाल हे १९६८ च्या आयपीएस केडरचे अधिकारी आहेत. सैन्याकडून देण्यात येणार्‍या किर्ती चक्राने सन्मानित करण्यात आलेले ते पहिले पोलिस अधिकारी आहेत. २००५ साली इंटेलिजेंस ब्युरोच्या प्रमुख पदावरून निवृत्त झाले होते. २०१४ सालच्या निवडणुकांदरम्यान त्यांची भारताच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार पदी नेमणूक करण्यात आली होती. अशा भारदस्त व्यक्तींच्या अकाउंटविषयी परराष्ट्र मंत्रालायाने अलर्ट का दिला असेल बरं, त्याच कारण आहे.  कारण NSA डोभाल यांचे ट्विटरवर हॅंडल नाहीत. परराष्ट्र मंत्रालयनेही म्हटले आहे की, अजित डोभाल यांचे कोणतेही अधिकृत ट्विटर हॅंडल नाही. याचाच अर्थ सोशल मीडिया साईट्सवर अजित डोभाल यांचे असणारे अकाऊंट बनावट आहे. त्या अकाऊंटपासून आपण सावध राहायला हवे.

बनावट अकाऊंटवर फॉलोवर्स

परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता अरिंदम बागची यांनी म्हटले की, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल ट्विटरवर नाहीत. तेथे त्यांच्या नावाने जे अकाऊंट सुरू आहेत. ते सर्व बनावट आहेत. अशातच त्यांच्या नावाने सुरू असलेल्या बनावट अकाऊंटपासून नेटकऱ्यांनी सावध राहण्याचा सल्ला देखील बागची यांनी दिला आहे.

भारताचे जेम्स बॉण्ड आहेत डोभाल 

राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांनी आपल्या कार्यशैलीमुळे वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांना लाइमलाइटमध्ये राहण्याची हौस नाही. त्यांच्या जबाबदार स्वभावामुळे ते नको तिथे वक्तव्य करीत नाहीत. त्यांच्या जबरदस्त व्यक्तिमत्वाचे भारतीय चाहते आहेत. त्यामुळे त्यांच्या बनावट अकाऊंटवर फॉलोवर्सची संख्या देखील अधिक आहेत. गृप्तहेर म्हणून ते पाकिस्तानमध्ये ७ वर्ष राहिेले आहेत. २००५ साली इंटेलिजेंस ब्युरोच्या प्रमुख पदावरून निवृत्त झाले होते. १९९९ साली कंधारमध्ये इंडियन एअरलाइनचे आयसी ८१४ विमान अपहरणकर्त्यांकडून अपहरण करण्यात आले होते.

त्यावेळी अपहरणकर्त्यांबरोबर वाटाघाटी करण्यात त्यांचा महत्वाचा वाटा होता. १९८४ मध्ये खलिस्तानी आतंकवादीविरोधात चालवण्यात आलेल्या ऑपरेशन ब्ल्यु स्टारमध्ये देखील त्यांनी महत्वाची भूमिका निभावली, यात ते सीक्रेट एजेंट बनून रिक्षावाल्याच्या पेहराव करून सुवर्ण मंदिरात गेले होते. उरी हल्ल्यानंतर सर्जिकल स्ट्राईकचे नियोजन आणि धोरण ठरवण्यात त्यांचा महत्वाचा वाटा होता. इंटेलिजन्स ब्युरोमध्ये तब्बल ३३ वर्ष अधिकारी पदावर जम्मू कश्मीर, पंजाब येथे काम केले आहे. २०१४ पासून ते प्रमुख राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून काम पाहत आहेत.


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी