India Covid Update 24th June । मुंबई : देशात कोरोना व्हायरस (Coronavirus) पुन्हा एकदा आपले पाय पसरवत आहे. मागील २४ तासांत कोविड-१९ चे १७,३३६ नवे रूग्ण आढळले आहेत. यादरम्यान कोरोनामुळे १३ लोकांचा यामुळे मृत्यू देखील झाला आहे. तसेच देशात कोविडच्या सक्रिय रूग्णांची संख्या ८८,२८४ एवढी झाली आहे. (For the first time in 4 months, more than 17,000 patients were found in the country).
अधिक वाचा : नवरदेवाने केलेल्या अंधाधुंद फायरिंगमध्ये जवानाचा मृत्यू
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, देशात आतापर्यंत एकूण ४,३३,६२,२९४ लोकांना कोविडची लागण झाली आहे. काल म्हणजेच गुरुवारी देशात कोरोनाचे १३,३१३ नवे रुग्ण आढळले आहेत. कालच्या तुलनेत कोविडच्या प्रकरणांमध्ये ३०.२ टक्क्यांनी वाढ झाली आहे. आतापर्यंत देशात कोविडमुळे एकूण ५ लाख २४ हजार ९५४ लोकांचा मृत्यू झाला आहे. कोविडमुळे मृत्यू होण्याचे प्रमाणही आता १.२१ टक्क्यांवर पोहोचले आहे.
आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुासर, मागील २४ तासांत देशभरात एकूण १३,०२९ रुग्ण बरे झाले आहेत. सध्या देशात रिकव्हरी रेट ९८.५९ टक्के नोंदवला गेला आहे. देशातील डेलीचा पॉझिटीव्ह दर आता ४.३२ टक्के एवढा झाला आहे, तर आठवड्याचा पॉझिटीव्ह होण्याचा दर ३.०७ टक्के झाला आहे.
लक्षणीय बाब म्हणजे देशात सर्वाधिक कोविड रुग्ण महाराष्ट्रातून येत आहेत. गुरुवारी महाराष्ट्रात कोरोना विषाणू संसर्गाची ५,२१८ नवीन प्रकरणे नोंदली गेली आहेत. तर आणखी एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यात आतापर्यंत कोविड-१९ ची लागण झालेल्या रुग्णांची संख्या ७९,५०,२४० झाली असून एकूण मृतांची संख्या १,४७,८९३ वर पोहोचली आहे.
तसेच देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत गुरुवारी कोविड-१९ चे १,९३४ नवीन रुग्ण आढळले आणि संसर्गाचा दर ८.१० टक्के राहिला. यादरम्यान दिल्लीत महासाथीमुळे कोणाचाही मृत्यू झाला नाही. लक्षणीय बाब म्हणजे काल नोंदवलेली नवीन प्रकरणे ४ फेब्रुवारीनंतरची एका दिवसात आढलेली सर्वाधिक प्रकरणे आहेत.