परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांचं पाकिस्तानी लोकांसमोर इमरान खानकडून कौतुक; राज ठाकरेंची वापरली स्टाईल

पाकिस्तानचे (Pakistan) माजी पंतप्रधान इमरान खान  (Former Prime Minister Imran Khan) आपल्या रॅलींमध्ये विरोधकांना लक्ष्य करत भारताचे (India) कौतुक करत आहेत. सत्ता गेल्याचे पाहून इमरान खान यांनी भारताच्या परराष्ट्र धोरणाचे (foreign policy) चाहते झाले असून पुन्हा एकदा इमरान खानने लाखो लोकांसमोर भारताचे गुणगान केले आहे.

 External Affairs Minister S Jaishankar praised by Imran Khan
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांचं इमरान खानकडून कौतुक  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • सभेत नागरिकांना संबोधित करताना ट्विटरवर शेअर केलेला व्हिडिओ दाखवला
  • इमरान खान यांनी स्वतंत्र देशाचे परराष्ट्र मंत्री कसे असतात हे व्हिडिओतून दाखवलं
  • इमरान खान भारतीय परराष्ट्र धोरणाचे चाहते झाले असून त्यांनी परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांचे कौतुक केले.

इस्लामाबाद : पाकिस्तानचे (Pakistan) माजी पंतप्रधान इमरान खान  (Former Prime Minister Imran Khan) आपल्या रॅलींमध्ये विरोधकांना लक्ष्य करत भारताचे (India) कौतुक करत आहेत. सत्ता गेल्याचे पाहून इमरान खान यांनी भारताच्या परराष्ट्र धोरणाचे (foreign policy) चाहते झाले असून पुन्हा एकदा इमरान खानने लाखो लोकांसमोर भारताचे गुणगान केले आहे. शनिवारी एका रॅलीत त्यांनी राज ठाकरेंची स्टाईल वापरत भरसभेत व्हिडिओ लावत भारतीय परराष्ट्र मंत्री (Foreign Minister of India) एस जयशंकर (S Jaishankar) यांचं कौतुक केलं. 

 एस शंकर यांचा व्हिडिओ दाखवत इमरान म्हणाले की, 'हा एक स्वतंत्र देश आहे'. इमरान खान अमेरिकेसह शाहबाज सरकारवर सतत आरोप करत आहे. शनिवारी त्यांनी पुन्हा शाहबाज शरीफ यांच्या आघाडी सरकारला 'इम्पोर्टेड सरकार' म्हटले. सभेत नागरिकांना संबोधित करताना ट्विटरवर शेअर केलेला व्हिडिओ दाखवला आणि म्हणाले की, 'आता मला तुम्हाला दोन देशांचे परराष्ट्र मंत्री दाखवायचे आहेत. आधी भारताचे परराष्ट्रमंत्री पाहू,  (यूएसए) ने भारताला  आदेश दिला की तुम्ही रशियाकडून तेल खरेदी करू नका. लक्षपूर्वक ऐका, भारत हा अमेरिकेचा परराष्ट्र धोरणाचा मित्र आहे. आपली अमेरिकेशी युती नाही. जेव्हा अमेरिकेने भारताला रशियाकडून तेल विकत घेऊ नये असे सांगितले, तेव्हा त्यांचे परराष्ट्र मंत्री काय म्हणाले. 

Read Also : मेटेंच्या अपघातासाठी कारचालकाची डुलकी कारणीभूत- अजित पवार

लाखो पाकिस्तानींना दाखवले जयशंकर यांनी अमेरिकेला दिलेले चोख प्रत्युत्तर

खान एस. जयशंकर यांचा व्हिडिओ प्ले केला. जेव्हा जयशंकर यांना त्यांच्या युरोप भेटीदरम्यान विचारण्यात आले, 'तुम्ही या युद्धात देशहितासाठी पैसे गुंतवत आहात का?' जयशंकर यांनी उत्तर दिले, 'रशियाकडून इंधन विकत घेणे म्हणजे युद्धात पैसे गुंतवणे आहे का? केवळ भारताचा पैसा आणि भारतात येणारे तेल हे युद्धाला दिला जाणार निधी आहे का, युरोपात जाणारे इंधन हे युद्धाचे निधी नाही का? 
जर युरोपीय आणि पाश्चात्य देशांना आणि अमेरिकेची एवढी चिंता असेल तर ते इराणी आणि व्हेनेझुएलाच्या तेलाला बाजारात का येऊ देत नाहीत?  ते आमचे तेलाचे इतर सर्व स्त्रोत बंद करतात आणि मग म्हणतात की तुम्ही बाजारात जाणार नाहीत आणि तुम्ही स्वस्त डिल करू शकत नाहीत.'

Read Also : ऑलिम्पिकमधील पराभवानंतर विनेश सोडणार होती कुस्ती

'हा मुक्त देश आहे'

व्हिडिओ संपल्यानंतर इमरान खान म्हणाला, 'ऐकलं? ज्यांना समजत नाही त्यांना मी समजावून सांगतो. रशियाकडून तेल खरेदी करू नका, असं अमेरिकेने भारताला सांगितले तर तेव्हा परराष्ट्रमंत्र्यांना सांगितले, तुम्ही कोण आहात आम्हाला सांगणारे? युरोप रशियाकडून तेल खरेदी करत आहे. आमच्या लोकांना गरज आहे, आम्ही खरेदी करू. हा आहे स्वतंत्र देश आहे. इमरान खान म्हणाले की, आम्हीही रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याबाबत बोललो होतो, पण या आयात सरकारने हिंमत दाखवली नाही.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी