Conversion of a Muslim leader : शिया सेंट्रल वक्फ बोर्डाच्या माजी अध्यक्षाचं गाझियाबादच्या मंदिरात धर्मांतर, वसीम रिझवींचे झाले हरबीर नारायण सिंह त्यागी

लोकल ते ग्लोबल
Updated Dec 06, 2021 | 13:49 IST | टाइम्स नाऊ मराठी

Wasim Rizvi becomes Harbir Narayan Singh Tyagi : वादग्रस्त विधाने करणाऱ्या वसीम रिझवीने इस्लाम सोडून हिंदू धर्म स्वीकारला आहे. वसीम रिझवीने उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथील दसना देवी मंदिराचे महंत यती नरसिंहानंद गिरी यांच्याकडून धर्म बदलला.

Former chairman of Shia Central Waqf Board converts to Ghaziabad temple, Wasim Rizvi becomes Harbir Narayan Singh Tyagi
Conversion of a Muslim leader : शिया सेंट्रल वक्फ बोर्डाच्या माजी अध्यक्षाचं गाझियाबादच्या मंदिरात धर्मांतर, वसीम रिझवींचे झाले हरबीर नारायण सिंह त्यागी   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • शिया सेंट्रल वक्फ बोर्डाचे माजी अध्यक्ष वसीम रिझवी यांचे गाझियाबादच्या डासना मंदिरात धर्मांतर
  • इस्लामच्या विरोधात बोलून नेहमी चर्चेत होते.
  • वसीम रिझवी यांनी आपले नाव बदलून हरबीर नारायण सिंह त्यागी केले

Conversion of a Muslim leader, गाझियाबाद : इस्लामच्या विरोधात वादग्रस्त विधाने करुन नेहमी चर्चेत राहणारे वसीम रिझवी यांनी इस्लाम सोडून हिंदू धर्म स्वीकारला आहे. त्यांनी सोमवारी उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथील दसना देवी मंदिरात धर्म परिवर्तन केले. यावेळी मंदिराचे महंत यती नरसिंहानंद गिरी यांनी विविध धार्मिक विधी केले. ते आता वसीम रिझवी नसू हरबीर नारायण सिंह त्यागी बनले आहेत. (Former chairman of Shia Central Waqf Board converts to Ghaziabad temple, Wasim Rizvi becomes Harbir Narayan Singh Tyagi)

कोण आहेत वसीम रिझवी

उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये जन्मलेले वसीम रिझवी हे स्वतः शिया मुस्लिम आहेत. सामान्य कुटुंबातील वसीम रिझवी 2000 मध्ये जुन्या लखनऊच्या काश्मिरी मोहल्ला वॉर्डमधून समाजवादी पक्षाचे (एसपी) नगरसेवक म्हणून निवडून आले होते. 2008 मध्ये शिया केंद्रीय वक्फ बोर्डाचे सदस्य झाले. 2012 मध्ये, शिया वक्फ बोर्डाच्या मालमत्तेत फेरफार केल्याचा आरोप झाल्यानंतर सपाने त्यांची सहा वर्षांसाठी पक्षातून हकालपट्टी केली. त्यांनी न्यायालयात याचिका दाखल केली आणि तेथून त्यांना दिलासा मिळाला. त्यानंतर ते अध्यक्षपदी विराजमान झाले. सुमारे दहा वर्षे ते बोर्डावर होते. रिझवी अनेकदा आपल्या वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. त्याच्यावर इस्लामविरोधी असल्याचा आरोपही करण्यात आला होता. इस्लामिक इमामांनीही इस्लाममधून हकालपट्टीची घोषणा केली.

रिझवींची घरवापसी

वसीम रिझवी यांनी सनातन धर्म स्वीकारण्याच्या घोषणेनंतर राजकारणात खळबळ उडाली आहे. ते घरी परतत असल्याचे सांगितले जात आहेत. स्वतः वसीम रिझवी यांनी याला घरवापसी म्हटले आहे. आज उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथील दसना देवी मंदिरात धर्म परिवर्तन केले.

हिंदुत्वासाठीच काम करणार

धर्मांतरानंतर वसीम रिझवी यांनी आजपासून हिंदुत्वासाठीच काम करणार असल्याचे सांगितले. ते म्हणाले की, मुस्लिमांचे मत कोणत्याही राजकीय पक्षाला जात नाही. मुस्लिम मते हिंदुत्वाच्या विरोधात आणि हिंदूंना पराभूत करण्यासाठी वापर केला जातो.  वसीम रिझवी उर्फ ​​हरबीर नारायण सिंह त्यागी म्हणाले की, मुघलांनी नेहमीच हिंदूंना पराभूत करण्याची परंपरा दिली. हिंदूंचा पराभव करणाऱ्या पक्षाला मुस्लिम एकजुटीने मतदान करतात. 

नरसिंहानंद यांच्याशी १५ दिवसांपूर्वी बोलणे झाले

रिझवीचे धर्मांतर करणाऱ्या नरसिंहानंद गिरी यांनी सांगितले की, १५ दिवसांपूर्वी त्यांना वसीम रिझवीचा फोन आला होता. मुस्लिमांशी संपर्क नसल्यामुळे एक मुस्लिम त्यांच्याशी बोलावतोय याचे त्याला आश्चर्य वाटले. वसीमशी बोलणे त्याला आवडले आणि मग त्याला कळले की वसीम किती मानवतावादी आणि धैर्यवान आहे. हिंदूंनी वसीम रिझवी यांना तन, मन आणि धनाने साथ द्यावी, असे ते म्हणाले.

 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी