काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी हॉस्पिटलमध्ये

Former Congress president Sonia Gandhi admitted in hospital : काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी फुफ्फुसांमध्ये संसर्ग झाल्यामुळे सर गंगाराम हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्या आहेत.

Former Congress president Sonia Gandhi admitted in hospital
काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी हॉस्पिटलमध्ये  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी हॉस्पिटलमध्ये
  • श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्यामुळे सोनिया गांधींना हॉस्पिटलमध्ये
  • सोनिया गांधींना कालपासूनच (मंगळवार 3 जानेवारी 2023) बरे वाटत नव्हते

Former Congress president Sonia Gandhi admitted in hospital : काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी फुफ्फुसांमध्ये संसर्ग झाल्यामुळे सर गंगाराम हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्या आहेत. सोनिया यांना हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले त्यावेळी त्यांच्यासोबत कन्या प्रियांका गांधी वाड्रा होत्या. 

श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्यामुळे सोनिया गांधींना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याचा निर्णय झाला. याआधी पण सोनिया गांधी यांनी सर गंगाराम हॉस्पिटलमध्ये उपचार घेतले आहेत. यामुळे यावेळी श्वास घेण्यास त्रास होऊ लागताच सोनिया गांधींना पुन्हा एकदा सर गंगाराम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

सोनिया गांधींना कालपासूनच (मंगळवार 3 जानेवारी 2023) बरे वाटत नव्हते. तब्येत आणखी ढासळल्यामुळे त्यांना आज (बुधवार 4 जानेवारी 2023) हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. याआधी जून 2022 मध्ये सोनिया गांधींनी सर गंगाराम हॉस्पिटलमध्ये उपचार घेतले होते. 

काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी 24 डिसेंबर 2022 रोजी दिल्लीत खासदार राहुल गांधी यांच्यासोबत भारत जोडो यात्रेत सहभागी झाल्या होत्या. थोडा वेळ राहुल यांच्यासोबत सोनिया गांधी चालल्या होत्या. याआधी ऑक्टोबर 2022 मध्ये भारत जोडो यात्रा कर्नाटकमध्ये असताना सोनिया गांधी यात्रेत थोड्या वेळासाठी सहभागी झाल्या होत्या. 

Paush Purnima : कधी आहे नव्या वर्षातील पहिली पौर्णिमा? जाणून घ्या पौर्णिमेचे व्रत आणि उपाय

January 2023 : जानेवारी 2023 मधील व्रत, सण, जयंती, पुण्यतिथी, महत्त्वाचे दिवस

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी