चेतन चौहान सिरियस, मेदांतामध्ये कोरोनावर उपचार सुरू

Former Cricketer UP Minister Chetan Chauhan Health Update उत्तर प्रदेश सरकारचे मंत्री आणि माजी क्रिकेटपटू चेतन चौहान (७२) यांची प्रकृती गंभीर आहे.

Chetan Chauhan Health Update
चेतन चौहान यांची तब्येत खालावली 

थोडं पण कामाचं

  • चेतन चौहान सिरियस, मेदांतामध्ये कोरोनावर उपचार सुरू
  • उत्तर प्रदेश सरकारच्या नऊ मंत्र्यांना कोरोना
  • उत्तर प्रदेशमध्ये ५० हजारपेक्षा जास्त कोरोना रुग्णांवर उपचार सुरू

गुरुग्राम: उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) सरकारचे मंत्री आणि माजी क्रिकेटपटू चेतन चौहान (७२) यांची प्रकृती गंभीर आहे. कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यामुळे त्यांच्यावर गुरुग्राम (Gurugram) येथील मेदांता हॉस्पिटलमध्ये (Medanta Hospital) उपचार सुरू आहेत. चेतन चौहान (Chetan Chauhan) यांना शुक्रवारपासून किडनी आणि रक्तदाबाशी संबंधित त्रास जाणूव लागला आहे. (Former Cricketer UP Minister Chetan Chauhan Health Update From Medanta Gurugram)

चेतन चौहान यांची तब्येत खालावली

चौहान यांच्याकडे उत्तर प्रदेश सरकारचे सैनिक कल्याण, होमगार्ड, पीआरडी आणि नागरिक सुरक्षा मंत्रालय आहे. त्यांना १९ जुलै रोजी कोरोना झाल्याचे लक्षात आले. कोरोना झाल्यामुळे त्यांना संजय गांधी पोस्टग्रॅज्युएट इन्स्टिट्युट ऑफ मेडिकल सायन्स (एसजीपीजीआय) येथे ठेवले होते. तब्येत खालावल्यामुळे चौहान यांना गुरुग्राम येथील मेदांता हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. तिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मात्र चौहान यांची प्रकृती गंभीर आहे. सध्या ते व्हेंटिलेटरवर आहेत. 

चेतन चौहान आधी भाजपच्या तिकिटावर लोकसभेत खासदार म्हणून निवडून आले होते. मागच्यावर्षी पर्यंत ते उत्तर प्रदेश सरकारमध्ये क्रीडामंत्री होते. वयोमान आणि कोरोना तसेच किडनी आणि रक्तदाबाच्या त्रासामुळे त्यांची तब्येत एकदम खालावली आहे.

काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेश सरकारचे कायदामंत्री ब्रजेश पाठक यांना कोरोनाची बाधा झाली. त्यांच्यावर एसजीपीजीआयच्या आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. त्यांना ऑक्सिजन सपोर्ट देण्यात आला आहे. ब्रजेश पाठक यांच्या पत्नी नम्रता पाठक यांना किरकोळ स्वरुपाचा कोरोना झाला आहे. सध्या त्या होम आयसोलेशनमध्ये आहेत आणि वैद्यकीय सल्ला घेत आहेत. याआधी उत्तर प्रदेश सरकारच्या शिक्षणमंत्री कमल रानी यांचा कोरोनामुळे २ ऑगस्टला मृत्यू झाला. त्यांनाही कोरोना झाल्यानंतर एसजीपीजीआय येथे दाखल केले होते.

उत्तर प्रदेश सरकारच्या नऊ मंत्र्यांना कोरोना

उत्तर प्रदेश सरकारच्या नऊ मंत्र्यांना आतापर्यंत कोरोना झाला. यापैकी कमल रानी यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. चेतन चौहान, ब्रजेश सिंह यांच्यावर उपचार सुरू आहेत. क्रीडामंत्री उपेंद्र तिवारी, जेलमंत्री जय प्रताप सिंह, राजेंद्र प्रताप सिंह, धर्म  सिंह सैनी, कॅबिनेट मंत्री मोती सिंह आणि महेंद्र सिंह यांनाही कोरोनाची बाधा झाली. मात्र वेळेवर उपचार मिळाल्यामुळे हे सर्वजण बरे झाले. या व्यतिरिक्त भाजपचे प्रदेशाध्यक्ष स्वतंत्र देव सिंह यांनाही काही दिवसांपूर्वी कोरोना झाला.

उत्तर प्रदेशमध्ये ५० हजारपेक्षा जास्त कोरोना रुग्णांवर उपचार सुरू

उत्तर प्रदेशमध्ये ५० हजार ४२६ कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. राज्यातील कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या ९२ हजार ५२६ झाली आहे. राज्यात कोरोनामुळे २ हजार ३३५ जणांचा मृत्यू झाला आहे. देशात सर्वाधिक कोरोनाबाधीत रुग्ण असलेल्या राज्यांमध्ये उत्तर प्रदेश सहाव्या स्थानावर आहे.

भारतात ६ लाख ७१ हजारांपेक्षा जास्त कोरोना रुग्णांवर उपचार सुरू

भारतात आतापर्यंत २५ लाख ३० हजार ९४३ जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. यापैकी ६ लाख ७१ हजार ६९३ कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. कोरोना झालेल्यांपैकी १८ लाख १० हजार ७९ जण बरे झाले आहेत. देशात कोरोनामुळे ४९ हजार १७१ जणांचा मृत्यू झाला आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी