Jaitley's Health Deteriorates: माजी अर्थमंत्री अरूण जेटली यांची प्रकृती खालावली

लोकल ते ग्लोबल
Pooja Vichare
Updated Aug 24, 2019 | 08:53 IST

माजी अर्थमंत्री अरूण जेटली यांनी प्रकृती आणखीन खालावली असल्याची माहिती समोर येत आहे.रूग्णालयातील सुत्रांनी यासंदर्भातली माहिती दिली आहे. गेल्या दोन आठवड्यांपासून त्यांच्यावर एम्स रूग्णालयात उपचार सुरू आहे.

former finance minister arun jaitley
माजी अर्थमंत्री अरूण जेटली यांची प्रकृती खालावली 
थोडं पण कामाचं
  •  माजी केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांची प्रकृती आणखीन खालावली असल्याची माहिती समोर आली आहे.
  • अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (एम्स) मध्ये सध्या अरूण जेटलींवर उपचार सुरू आहेत.
  • शुक्रवारी रात्री त्यांची प्रकृती आणखी चिंताजनक झाली.
  • रूग्णालयातील सुत्रांनी यासंदर्भातली माहिती दिली आहे.

Former Finance Minister Arun Jaitley Health Deteriorates: माजी केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांची प्रकृती आणखीन खालावली असल्याची माहिती समोर आली आहे. अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (एम्स) मध्ये सध्या अरूण जेटलींवर उपचार सुरू आहेत. शुक्रवारी रात्री त्यांची प्रकृती आणखी चिंताजनक झाली. रूग्णालयातील सुत्रांनी यासंदर्भातली माहिती दिली आहे. माजी केंद्रीय उमा भारती यांनी रूग्णालयात जाऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली आहे. 

भाजपचे वरिष्ठ एल. के. अडवाणी, उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत, उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल, बिहारचे उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी, दिल्लीचे उपराज्यपाल अनिल बैजल आणि भाजप खासदार मेनका गांधी यांनी सोमवारी रूग्णालयात जाऊन जेटलींची भेट घेतली. 

६६ वर्षीय जेटली यांना श्वास घेण्यास त्रास झाल्यानं ९ ऑगस्टला एम्समध्ये दाखल करण्यात आलं होतं. एम्सनं १० ऑगस्टनंतर जेटली यांच्या प्रकृतीवर कोणतंही बुलेटीन जारी केलं नाही आहे. अरुण जेटली यांच्या प्रकृतीवर एम्स रुग्णालयातील डॉक्टरांचं एक पथक लक्ष ठेवून आहे. जेटली गेल्या काही दिवसांपासून आजारी आहे. यामुळे त्यांनी लोकसभा निवडणूक देखील लढवली नाही आणि निवडणूक प्रचारापासूनही दूर राहिले. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांची स्थिती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.  जेटली यांची प्रकृती चिंताजनक आहे आणि तज्ज्ञ डॉक्टरांची टीम त्यांच्यावर सतत उपचार करत आहे. ते सध्या आयसीयूमध्ये दाखल असून त्यांना व्हेटिंलेटरवर ठेवण्यात आलं आहे. जेटली पहिल्यापासून डायबिटीजचे रूग्ण आहेत. त्याचे किडनी ट्रान्सप्लांटही झाले आहे. काही दिवसांपूर्वी त्यांना सॉफ्ट टिशू कॅन्सरही असल्याचे निष्पन्न झाले होते. जेटली यांनी लठ्ठपणापासून सुटकेसाठी बॅरिएट्रीक सर्जरीही केली होती. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जेटली यांच्या लंग्समध्ये पाणी जमा होत आहे. त्यामुळे त्यांना श्वास घेण्यास अडचण निर्माण होत आहे. त्यामुळे त्यांना डॉक्टरांनी व्हेंटिलटरवर ठेवलं. तसेच त्यांच्या लंग्समधून पाणीही काढण्यात येत आहे. पण पुन्हा त्यांच्या लंग्समध्ये पाणी जमा होत आहे. त्यामुळे त्यांच्यावरील धोका अजून टळलेला नाही आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी