RVS Mani माजी आयपीएस अधिकाऱ्याला ठार मारण्याची धमकी

Former IPS officer RVS Mani threatened to kill in Delhi : माजी आयपीएस अधिकारी आणि 'हिंदू दहशतवाद : एक थोतांड' या पुस्तकाचे लेखक आर. व्ही. एस. मणी यांना ठार मारण्याची धमकी देण्यात आली. या प्रकरणी दिल्लीच्या उत्तर द्वारका पोलीस ठाण्यात मणी यांनी तक्रार नोंदविली आहे.

Former IPS officer RVS Mani threatened to kill in Delhi
माजी आयपीएस अधिकाऱ्याला ठार मारण्याची धमकी 
थोडं पण कामाचं
  • माजी आयपीएस अधिकाऱ्याला ठार मारण्याची धमकी
  • आर. व्ही. एस. मणी यांना ठार मारण्याची धमकी
  • दिल्लीच्या उत्तर द्वारका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

Former IPS officer RVS Mani threatened to kill in Delhi : नवी दिल्ली: माजी आयपीएस अधिकारी आणि 'हिंदू दहशतवाद : एक थोतांड' या पुस्तकाचे लेखक आर. व्ही. एस. मणी यांना ठार मारण्याची धमकी देण्यात आली. या प्रकरणी दिल्लीच्या उत्तर द्वारका पोलीस ठाण्यात मणी यांनी तक्रार नोंदविली आहे. 

मणी यांना आज (बुधवार २२ डिसेंबर २०२१) मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडले असताना धमकावण्यात आले. पांढऱ्या क्रिटा कारमधून आलेल्या दोघांनी मणी यांच्या जवळ जाऊन त्यांना ठार मारण्याची धमकी दिली. धमकावल्यानंतर कारमधून आलेले दोघेजण लगेच कारमध्ये बसून निघून गेले. 

मणी यांनी हिंदू दहशतवाद: एक थोतांड हे पुस्तक लिहून कशाप्रकारे यूपीए सरकारच्या काळात साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर आणि कर्नल पुरोहित यांना अडकवण्याचा प्रयत्न करण्यात आला हे जगजाहीर केले. तसेच त्यांनी २६/११ च्या दहशतवादी हल्ल्याच्या तपासातील अनेक त्रुटी पुस्तकातून मांडल्या आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी