पाकिस्तानचे माजी PM इमरान खान गोळीबारात जखमी

Former Pakistan PM Imran Khan injured in gun attack near Wazirabad : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इमरान खान यांच्यावर गोळीबार झाला. इमरान खान यांच्या पायाला गोळी लागली.

Former Pakistan PM Imran Khan injured in gun attack near Wazirabad
पाकिस्तानचे माजी PM इमरान खान गोळीबारात जखमी  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • पाकिस्तानचे माजी PM इमरान खान गोळीबारात जखमी
  • इमरान खान यांच्या पायाला लागली गोळी
  • इमरान खान यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केले

Former Pakistan PM Imran Khan injured in gun attack near Wazirabad : वझिराबाद : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इमरान खान यांच्यावर गोळीबार झाला. इमरान खान यांच्या पायाला गोळी लागली. जखमी इमरान खान यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. गोळीबार प्रकरणी हल्लेखोराला अटक करण्यात आली आहे. एआरवाय न्यूजच्या वृत्तानुसार इमरान खान यांची प्रकृती स्थिर असून ते सुरक्षित आहेत. उपचारांना प्रतिसाद देत आहेत. 

एका रॅली दरम्यान इमरान यांच्या दिशेने गोळीबार झाला. या गोळीबारात इमरान खान आणि इतर 3 जण जखमी झाले. इमरान खान हे पाकिस्तानचे माजी पंतप्रधान तसेच तेहरिक-ए-इन्साफ पार्टीचे अध्यक्ष आहेत. मागील काही दिवसांपासून इमरान खान शहबाझ शरिफ सरकार विरोधात देशभर आंदोलनं करत आहेत. या मोहिमेंतर्गत वझिराबाद येथे एक रॅली सुरू होती. या रॅली दरम्यान गोळीबार झाला. 

19 उप जिल्हाधिकाऱ्यांना अपर जिल्हाधिकारी पदोन्नती 

सर्वसामान्यांच्या पोटाचा आधार असणाऱ्या वडापावचा भाव वाढला

गोळीबार होताच रॅलीत घबराट पसरली आणि पळापळ सुरू झाली. पण पोलीस आणि सुरक्षा रक्षक तातडीने सक्रीय झाले. इमरान खान यांना लगेच हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. हल्ला झाला आणि थोड्याच वेळात हल्लेखोराला अटक करण्यात आली. सध्या हल्लेखोराची चौकशी सुरू आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी