पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांची प्रकृती गंभीर

former pakistan president parvez musharraf family statement on his health update : पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ (७८) आजारी आहेत. त्यांच्यावर दुबईतील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

former pakistan president parvez musharraf family statement on his health update
पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांची प्रकृती गंभीर  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांची प्रकृती गंभीर
  • दुबईतील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू
  • मुशर्रफ यांची प्रकृती गंभीर, त्यांच्या निधनाच्या वृत्तात तथ्य नाही; घरच्यांनी दिली माहिती

former pakistan president parvez musharraf family statement on his health update : इस्लामाबाद : पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ (७८) आजारी आहेत. त्यांच्यावर दुबईतील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. मुशर्रफ यांची प्रकृती गंभीर आहे. पण त्यांच्या निधनाच्या वृत्तात तथ्य नाही; अशा शब्दात मुशर्रफ कुटुंबाने परवेझ मुशर्रफ यांच्या आजारपणाबाबतची माहिती मीडियाला दिली.

दिल्लीत ११ ऑगस्ट १९४३ रोजी परवेझ मुशर्रफ यांचा जन्म झाला. फाळणीनंतर परवेझ कुटुंबासोबत पाकिस्तानमध्ये गेले आणि तिथेच स्थायिक झाले. मुशर्रफ कुटुंब प्रचंड श्रीमंत होते. यामुळे परवेझ यांचे बालपण पाश्चात्य संस्कारात झाले. वयाच्या अठराव्या वर्षी परवेझ मुशर्रफ यांनी पाकिस्तानच्या सैन्याच्या अकादमीत प्रवेश केला. पुढे लष्कराच्या सेवेत अधिकारी म्हणून नियुक्त झालेले परवेझ मुशर्रफ वेगाने प्रगती करत गेले. नवाझ शरिफ यांनी पंतप्रधान असताना विश्वासातली व्यक्ती म्हणून परवेझ मुशर्रफ यांना ऑक्टोबर १९९८ मध्ये पाकिस्तानच्या लष्करप्रमुखपदी नियुक्त केले. लष्करप्रमुख झाल्यावर मुशर्रफ यांनी भारताविरुद्ध १९९९च्या कारगिल युद्धात पाकिस्तानचे नेतृत्व केले. कारगिलमध्ये पराभव झाल्यानंतर पंतप्रधान नवाझ शरिफ यांनी अपयशाचे खापर लष्कराच्या माथी फोडण्याच्या हालचाली सुरू केल्या. पण सावध असलेल्या परवेझ मुशर्रफ यांनी नवाझ शरिफ यांना अटक केले आणि पाकिस्तानमध्ये लष्करशाही सुरू करून सत्ता ताब्यात घेतली. ऑक्टोबर १९९९ पासून २००८ पर्यंत मुशर्रफ पाकिस्तानचे सर्वेसर्वा होते. लष्करप्रुख, तिन्ही दलांचे प्रमुख, संरक्षण खात्याचे प्रमुख, पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अशी सर्व महत्त्वाची पदे मुशर्रफ यांनी स्वतःकडे ठेवली होती. पण वाढती राजकीय आणि आर्थिक आव्हाने, लष्करी अधिकाऱ्यांकडून होणारा विरोध या सर्वांना टक्कर देणे कठीण झाल्यावर मुशर्रफ यांनी सर्व पदे सोडून आणि पाकिस्तान सोडून परदेशी राहणे पसंत केले. मुशर्रफ यांच्यावर त्यांच्या विरोधकांनी भ्रष्टाचाराचे आणि देशद्रोहाचे आरोप केले. दोषी ठरल्यामुळे मुशर्रफ यांना शिक्षा जाहीर झाली. यानंतर मुशर्रफ पुन्हा कधीही पाकिस्तानमध्ये फिरकले नाही. यामुळे शिक्षेची अंमलबजावणी झाली नाही. 

मुशर्रफ राष्ट्राध्यक्ष असताना २००७ मध्ये पाकिस्तानच्या माजी पंतप्रधान बेनझीर भुत्तो यांची बॉम्ब हल्ल्यात हत्या झाली. मुशर्रफ यांच्या कार्यकाळात भारत आणि पाकिस्तान यांच्यात आग्रा येथे शिखर परिषद झाली. ही परिषद अयशस्वी झाली. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणावात मुशर्रफ यांच्या कार्यकाळात वारंवार चढउतार झाले. पण भारत-पाकिस्तानमधील प्रश्न सोडवू असा दावा करणाऱ्या मुशर्रफना हे प्रश्न सोडविणे जमले नाही. परवेझ मुशर्रफ २०१६ पासून दुबईत कायमचे स्थायिक झाले. सध्या मुशर्रफ आजारी आहेत. हृदयविकार तसेच इतर गंभीर आजारांमुळे त्यांची प्रकृती खालावली आहे. दुबईतील हॉस्पिटलमध्ये मुशर्रफ यांच्यावर उपचार सुरू आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी