'माझे वडील काही झूमधले प्राणी नाहीत',माजी PM मनमोहन सिंग यांच्या मुलीचा आरोग्य मंत्र्यांवर संताप

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग (Former Prime Minister Manmohan Singh) यांच्या प्रकृती पाहण्यासाठी एम्समध्ये पोहोचलेले केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मंडावा यांच्यावर टीका केली जात आहे.

PM Manmohan Singh
माजी PM मनमोहन सिंग यांच्या मुलीचा आरोग्य मंत्र्यांवर संताप  |  फोटो सौजन्य: Indiatimes
थोडं पण कामाचं
  • फोटोग्राफरला फोटो न काढण्यास सांगितल्यानंतरही फोटो घेतले.
  • माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या वैयक्तिक हक्काचा उल्लंघन - काँग्रेसची टीका
  • माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांना डेंग्यूची लागण झाली आहे.

नवी दिल्ली : माजी पंतप्रधान मनमोहन सिंग (Former Prime Minister Manmohan Singh) यांच्या प्रकृती पाहण्यासाठी एम्समध्ये पोहोचलेले केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मंडावा यांच्यावर टीका केली जात आहे. आरोग्य मंत्री मंडाविया आपल्या फोटोग्राफरसह रुग्णालयात दाखल असलेल्या माजी पंतप्रधानांना पाहायला गेले. यावेळी त्यांनी माजी पंतप्रधानांसोबत काही फोटो घेतले. यावर मनमोहन सिंग यांच्या मुलीने सांगितले की, माझ्या आईने अनेकदा फोटोग्राफरला खोलीच्या बाहेर जाण्यासाठी सांगितले होते. मात्र त्यांनी ऐकलं नाही. माझी आई डॉ. सिंग याचे फोटो घेतल्यामुळे खूप नाराज होती. आमचे कुटुंब सध्या वाईट परिस्थितीतून जात आहे. ते वयस्कर आहे, ते कोणा प्राणी संग्रहालयातील प्राणी नाहीत.

काँग्रेस पार्टीने मांडवियावर केली टीका

काँग्रेस पार्टीनेदेखील मंत्री मनसुख मांडविलावर टीका केली आहे. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या वैयक्तिक हक्काचा उल्लंघन केल्यामुळे माफी मागण्याची मागणी केली आहे. माजी पंतप्रधानांना पाहण्यासाठी ते एम्सला पोहोचले होते आणि त्याच्या कुटुंबीयांच्या सदस्याचा विरोध असताना फोटो काढले. पार्टीने सांगितले की, मनमोहन यांना भेटण्यासाठी ते सोबत फोटोग्राफरला घेऊन गेले होते. काँग्रेसने मांडावियाच्या या कृत्यावर टीका केली आणि त्याची ही भेट पीआर स्टंट असल्याचेही म्हटले.

मनमोहन सिंग यांना डेंग्यूची लागण

डॉ. सिंग यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांच्या टीमने सांगितले की, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांना डेंग्यूची लागण झाली असून सध्या ते धोक्याच्या बाहेर आहेत. डॉ. सिंग यांच्या प्लेट्सलेट्समध्ये वाढ होत आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी