Donald Trump in Porn Star Case: पॉर्न स्टार प्रकरणी माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना अटक करण्यात आली आहे. अमेरिकेच्या इतिहासात पहिल्यांदा एका माजी राष्ट्राध्यक्षाला गुन्हेगारी प्रकरणात अटक केल्याची घटना घडली आहे. (Former President Donald Trump arrested in Porn Star Case)
2016 मध्ये अध्यक्षीय निवडणुकीच्या प्रचारादरम्यान ट्रम्प यांच्या सांगण्यावरून पॉर्न फिल्म स्टार स्टॉर्मी डॅनियल्सला पैसे देण्यात आले होते. स्टॉर्मीने दावा केला होता की तिचे ट्रम्पसोबत अफेअर होते. खरं तर, स्टॉर्मीने मीडिया संस्थांशी संपर्क साधला की तिला 2006 मध्ये डोनाल्ड ट्रम्पसोबतच्या अफेअरची स्टोरी पैशाच्या बदल्यात विकायची होती. ट्रम्पच्या टीमला स्टॉर्मीच्या योजनेबद्दल माहिती मिळाली आणि त्याचे वकील मायकेल कोहेन यांनी स्टॉर्मीला शांत राहण्यासाठी US$130,000 दिले.
अधिक वाचा : Essential Medicines Prices : भारत सरकारचा निर्णय, 651 औषधांच्या किंमतीत केली कपात
न्यूयॉर्कमधील मॅनहॅटन कोर्टात पोहोचल्यानंतर त्याला औपचारिकपणे अटक करण्यात आली आणि पोलिस कोठडीत ठेवण्यात आले. मॅनहॅटन कोर्टात हजेरीदरम्यान अटक करण्यात आलेल्या ट्रम्प यांनी स्वतःला निर्दोष असल्याचे सांगितले. पण, युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने ट्रम्प यांना सुमारे $1.22 दशलक्ष दंड भरण्याचे आदेश दिले. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, ट्रम्प यांना आता 4 डिसेंबरला पुन्हा न्यायालयात हजर राहावे लागणार आहे.