माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना कोरोनाची लागण

Pranab Mukherjee tests positive for coronavirus: माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळले आहे. त्यांनी स्वत: याबद्दल माहिती दिली आहे. मुखर्जी यांनी आपल्या संपर्कात आलेल्यांना कोरोना चाचण

pranab mukherjee
माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना कोरोनाची लागण  |  फोटो सौजन्य: PTI

थोडं पण कामाचं

  • माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना कोरोनाची लागण
  • माजी राष्ट्रपतींनी ट्विटरद्वारे कोरोनाची लागण झाली असल्याची दिली माहिती
  • केजरीवाल यांच्यासह अनेक नेत्यांनी प्रणव मुखर्जी यांना लवकरात लवकर बरे व्हावे अशी केली प्रार्थना

नवी दिल्ली: माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचा कोविड-१९ चा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. स्वत: प्रणव मुखर्जींनी आपल्या ट्वीटर हँडलवरून त्यांना कोरोना संसर्ग झाल्याची माहिती दिली आहे. मुखर्जींनी अलीकडे त्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांना आपली चाचणी करुन घेण्याची विनंती केली आहे. आपल्या ट्वीटमध्ये ते म्हणाले की, 'मी इतर काही चाचण्यांसाठी हॉस्पिटलमध्ये गेलो होतो. पण आज माझी कोविड-१९ चाचणीत पॉझिटिव्ह आढळून आलो. गेल्या आठवड्यापासून माझ्या संपर्कात आलेल्यांना मी विनंती करतो की त्यांनी स्वत:ला आयसोलेट करावं आणि त्यांनी कोविड-१९ चाचणी करुन घ्यावी.' 

अलिकडच्या काळात अनेक हाय प्रोफाइल नेत्यांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. गृहमंत्री अमित शहा आणि केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान हे देखील कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले होते. सध्या दोन्ही नेत्यांवर गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

प्रणव मुखर्जींसाठी अनेकांनी केल्या प्रार्थना

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी जेव्हा ट्विटरवरुन माहिती दिली की, त्यांना कोरोनाची लागण झाली आहे त्यानंतर अनेकांनी ते लवकर बरे व्हावेत अशी प्रार्थना केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील प्रणव मुखर्जी यांनी लवकरात लवकर बरे व्हावे अशी प्रार्थना केली आहे. तसंच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणाले की, 'सर, तुम्ही स्वतःची काळजी घ्या. आपण लवकरात लवकर बरे व्हावेत अशी प्रार्थना करतो.'

२०१२ ते २०१७ या काळात देशाचे राष्ट्रपती होते प्रणव मुखर्जी

देशातील कोरोनाचा धोका पाहता माजी राष्ट्रपतींनी गेल्या काही महिन्यांपासून आपले सर्व नियोजित कार्यक्रम रद्द केले होते. कोरोनाचा उद्रेक लक्षात घेता सरकारने ६५ वर्षांवरील लोकांनी घराबाहेर पडू नये असं म्हटलं होतं. प्रणव मुखर्जी हे २०१२ ते २०१७ या काळात देशाचे राष्ट्रपती होते. माजी राष्ट्रपती आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रणव मुखर्जी यांना राजकारणातील उल्लेखनीय योगदानाबद्दल देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार 'भारतरत्न'नेही गौरविण्यात आले आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी