Haldwani: उत्तराखंडच्या माजी मंत्र्याने केली आत्महत्या; सुनेने नातीच्या लैंगिक शोषणाचा केला होता आरोप 

लोकल ते ग्लोबल
Updated May 28, 2022 | 10:53 IST | टाइम्स नाऊ मराठी

Rajendra Bahuguna । उत्तराखंडचे कॉंग्रेस पक्षाचे माजी मंत्री राजेंद्र बहुगुणा यांनी आत्महत्या केली आहे. बहुगुणा यांच्यावर त्यांच्या सुनेने त्यांच्या नातीचा विनयभंग केल्याचा आरोप केला होता, त्यामुळे व्यथित झाल्याने त्यांनी पाण्याच्या टाकीवर चढून स्वत:वर गोळी झाडली.

Former Uttarakhand minister Rajendra Bahuguna has committed suicide
उत्तराखंडच्या माजी मंत्र्याने केली आत्महत्या  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • उत्तराखंडचे माजी मंत्री राजेंद्र बहुगुणा यांनी आत्महत्या केली आहे.
  • बहुगुणा यांच्यावर त्यांच्या सुनेने त्यांच्या नातीचा विनयभंग केल्याचा आरोप केला होता.
  • सुनेव्यतिरिक्त शेजाऱ्यांनीही केली होती तक्रार.  

Rajendra Bahuguna । नवी दिल्ली : उत्तराखंडचे कॉंग्रेस पक्षाचे माजी मंत्री राजेंद्र बहुगुणा (Rajendra Bahuguna) यांनी आत्महत्या केली आहे. बहुगुणा यांच्यावर त्यांच्या सुनेने त्यांच्या नातीचा विनयभंग केल्याचा आरोप केला होता, त्यामुळे व्यथित झाल्याने त्यांनी पाण्याच्या टाकीवर चढून स्वत:वर गोळी झाडली. बहुगुणा यांच्या सुनेने नातीचा विनयभंग केल्याचा आरोप केल्यानंतर त्यांच्यावर लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण (POCSO) या कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला, असे हल्द्वानीचे मंडळ अधिकारी (CO) भूपिंदर सिंग धोनी यांनी सांगितले. (Former Uttarakhand minister Rajendra Bahuguna has committed suicide).

अधिक वाचा : महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख केईएममध्ये दाखल

सुनेव्यतिरिक्त शेजाऱ्यांनीही केली होती तक्रार 

धोनी यांनी सांगितले की, "शेजारी सविता नावाच्या महिलेच्या तक्रारीवरून त्यांच्याविरुद्ध आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला होता, ज्यामध्ये सविता या महिलेने आरोप केला आहे की जेव्हा ती तिच्या सासूसोबत फिरायला जाते तेव्हा आरोपी माजी मंत्री तिला शिवीगाळ आणि धमक्या देण्यासोबतच तिच्यावर हल्ला करतात." आत्महत्या करण्यापूर्वी बहुगुणा यांनी ११२ क्रमांकावर पोलिसांना फोन केला होता, त्यानंतर बंदुकीने गोळ्या झाडत पाण्याच्या टाकीवर चढून आत्महत्या केली. दरम्यान बहुगुणा यांच्या आत्महत्येनंतर पोलिसांनी सुनेविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

पाण्याच्या टाकीवर चढून केली आत्महत्या

धोनी यांनी आणखी म्हटले की, "एक पोलिसांची टीम घटनास्थळी पोहचली आणि मोठ्या चर्चेनंतर बहुगुणा यांनी टाकीवरून खाली उतरण्यास नकार दिला. त्यानंतर त्यांनी अचानक बंदूक काढली आणि स्वतःच्या छातीत गोळी झाडली. यानंतर त्यांना रुग्णालयात नेण्यात आले आणि त्यांचे प्राण वाचवण्याचे अनेक प्रयत्न करण्यात आले मात्र त्यांचा मृत्यू झाला. आत्महत्येचे संभाव्य कारण विचारले असता सीओ म्हणाले की, कारण अद्याप स्पष्ट झाले नाही परंतु वादग्रस्त प्रकरण आणि गंभीर आरोपांमुळे ते अस्वस्थ झाले होते.

राजेंद्र अवगुणा हे पहिल्यापासूनच काँग्रेसशी संबंधित होते, त्यांनी रोडवेज असोसिएशनसह इतर अनेक संघटनांमध्येही उच्च पदांवर काम केले होते. उत्तराखंड रोडवेज कर्मचारी बहुगुणा यांना २००२ मध्ये राज्याच्या पहिल्या निवडून आलेल्या सरकारमध्ये राज्यमंत्रिपदाचा दर्जा देण्यात आला होता.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी