कोरोना लसीकरण: चार दिवसांच्या लस उत्सवाला आजपासून प्रारंभ, जाणून घ्या याबाबतच्या महत्वाच्या गोष्टी

लोकल ते ग्लोबल
Updated Apr 11, 2021 | 14:41 IST | टाइम्स नाऊ मराठी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणातून काही दिवसांपूर्वी लस महोत्सवाचे आवाहन केले होते. हा उत्सव 11 ते 14 एप्रिलदरम्यान साजरा केला जाणार आहे. जास्तीत जास्त पात्र लोकांना लस देण्याचा याचा उद्देश आहे.

Corona vaccine
चार दिवसांच्या लस उत्सवाला आजपासून प्रारंभ, जाणून घ्या याबाबतच्या महत्वाच्या गोष्टी  |  फोटो सौजन्य: BCCL

थोडं पण कामाचं

  • उत्सवादरम्यान शून्य अपव्ययावर भर देण्याची पंतप्रधानानांची सूचना
  • विरोधी पक्षांनी केली टीका
  • लसींची कमतरता देशभरातील महत्वाचा मुद्दा

नवी दिल्ली - कोविड-19च्या (Covid-19) संकटाविरोधातला लढा वेगवान करण्यासाठी देशात चार दिवसांचा लस उत्सव (Vaccine Utsav) साजरा केला जात आहे. हा उत्सव आज म्हणजेच रविवारपासून सुरू होईल आणि 14 एप्रिलपर्यंत सुरू राहील. याचा उद्देश कोरोनाच्या घातक आजारापासून बचावासाठीची लस (vaccine) जास्तीत जास्त पात्र लोकांना देण्याचा आहे. याचे आवाहन पंतप्रधानांनी (Prime Minister) राज्यांच्या आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्यमंत्र्यांसोबतच्या (Chief Ministers) बैठकीत (meeting) केले होते. या बैठकीत देशातील कोव्हिडच्या परिस्थितीवरही (covid condition) चर्चा करण्यात आली होती.

उत्सवादरम्यान शून्य अपव्ययावर भर देण्याची पंतप्रधानानांची सूचना

या बैठकीत पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘कधीकधी हे वातावरण बदलण्यास मदत करते. ज्योतिबा फुलेंची जयंती 11 एप्रिल रोजी तर 14 एप्रिल रोजी बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे. आपण यादरम्यान लस उत्सवाचे आयोजन करून याचे वातावरण तयार करू शकतो का? या विशेष अभियानाद्वारे जास्तीत जास्त पात्र लोकांचे लसीकरण करावे आणि यादरम्यान शून्य अपव्यय करण्याचा आपला प्रयत्न असावा. जर लस उत्सवाच्या चार दिवसांदरम्यान शून्य अपव्यय झाला तर आपली लसीकरणाची क्षमता आणखी वाढेल.’

विरोधी पक्षांनी केली टीका

एकीकडे जिथे पंतप्रधानांच्या आवाहनानंतर उत्तर प्रदेश आणि बिहारसारख्या राज्यांनी लस उत्सवाला पूर्ण समर्थन दिले आहे आणि सर्व लाभार्थ्यांना या चार दिवसांत लस घेण्याचे आवाहन केले आहे तर विरोधी पक्षाच्या नेत्यांनी यावर टीका केली आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी शुक्रवारी म्हटले होते की देशात लसींची कमतरता हा गंभीर मुद्दा आहे, कोणता सण नाही.

लसींची कमतरता देशभरातील महत्वाचा मुद्दा

लक्ष देण्याची गोष्ट अशी आहे की देशात हा लस उत्सव साजरा केला जात असतानाच लसीची कमतरता असल्याची तक्रार अनेक राज्यांमधून येत आहे. महाराष्ट्र, छत्तीसगढ आणि झारखंडसह अनेक राज्यांनी म्हटले आहे की त्यांना लसींच्या कमतरतेमुळे लसीकरण अभियान सुरू ठेवण्यात सक्षम नाहीत. मात्र केंद्राने हे दावे फेटाळून लावत सर्व राज्यांना पुरेसे लसीचे डोस दिले जात असल्याचे आणि येत्या दिवसात जास्त लसी देण्यात येणार असल्याचे म्हटले आहे.

85 दिवसांमध्ये 100 मिलियन मात्रा देण्यात भारत सर्वात पुढे

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने शनिवारी केलेल्या दाव्यानुसार भारत 85 दिवसांमध्ये 100 मिलियन मात्रा देणाऱ्या देशांमध्ये सर्वात पुढे आहे. शनिवारी संध्याकाळपर्यंत देशातील प्रशासित कोव्हिड-19च्या लसींच्या मात्रांची संचयी संख्या 10 कोटी 84 लाख 282 आहे. मंत्रालयाने मंगळवारी म्हटले होते की जागतिक स्तरावर दैनंदिन मात्रांच्या संख्येबाबत भारत सरासरी 38 लाख 93 हजार 288 मात्रांसह सर्वोच्च स्थानी आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार कोव्हिड-19च्या लसींच्या 10 कोटी मात्रा देण्यास अमेरिकेला 89 तर चीनला 102 दिवस लागले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी