France Elections 2022: इमॅन्युअल मॅक्रोन सलग दुसऱ्यांदा बनले फ्रान्सचे राष्ट्रपती , कट्टर विरोधक मरीन ले पेनचा पराभव

French Presidency Election 2022 : फ्रान्सच्या (France) राष्ट्रपदीपदाच्या निवडणुकीत अखेर पुन्हा एकदा इमॅन्युअल मॅक्रोन (Emmanuel Macron) यांनी बाजी मारली आहे. फ्रान्सच्या राष्ट्रपतीपदाच्या (presidency) निवडणुकीत (Election) त्यांनी 54.2 टक्के मत घेत विजयावर शिक्कामोर्तब केलं.

Emmanuel Macron becomes President of France
इमॅन्युअल मॅक्रोन सलग दुसऱ्यांदा बनले फ्रान्सचे राष्ट्रपती  |  फोटो सौजन्य: Google Play
थोडं पण कामाचं
  • भारताप्रमाणेच फ्रान्समध्येही 18 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे नागरिक मतदान करतात.
  • इमॅन्युअल मॅक्रोन यांनी नॅशनल रॅली पार्टीच्या नेत्या मारिन ले पेन यांचा पराभव केला,
  • फ्रान्समध्ये मतदान नेहमीच रविवारी होते, जेणेकरून अधिकाधिक लोक मतदान करू शकतील.

French Election 2022 : मुंबई :  फ्रान्सच्या (France) राष्ट्रपदीपदाच्या निवडणुकीत अखेर पुन्हा एकदा इमॅन्युअल मॅक्रोन (Emmanuel Macron) यांनी बाजी मारली आहे. फ्रान्सच्या राष्ट्रपतीपदाच्या (presidency) निवडणुकीत (Election) त्यांनी 54.2 टक्के मत घेत विजयावर शिक्कामोर्तब केलं. ते सलग दुसऱ्यांदा राष्ट्रपदीपदावर विराजमान होतील. इमॅन्युअल मॅक्रोन यांनी नॅशनल रॅली पार्टीच्या नेत्या मारिन ले पेन यांचा पराभव केला, दुसऱ्या आणि शेवटच्या फेरीत मॅक्रॉन यांना 58.2% आणि ले पेन यांना 41.8% मते मिळाली. 2017 च्या तुलनेत मॅक्रॉनचे विजयाचे अंतर खूपच कमी होते. मॅक्रॉन हे फ्रान्सचे पहिले विद्यमान अध्यक्ष आहेत जे 20 वर्षात दुसऱ्यांदा निवडून आले आहेत.

रविवारी झाले मतदान

हा विजय मॅक्रॉनसाठी देखील खास आहे, कारण त्यांनी त्यांच्या आयुष्यात फक्त 2 निवडणुका लढल्या आणि दोन्हीमध्ये ते जिंकले. भारताप्रमाणेच फ्रान्समध्येही 18 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे नागरिक मतदान करतात. मात्र, येथे मतदानासाठी बॅलेट पेपरचा वापर केला जात नाही, तर ईव्हीएम मशीनचा वापर केला जातो. विशेष म्हणजे, फ्रान्समध्ये मतदान नेहमीच रविवारी होते, जेणेकरून अधिकाधिक लोक मतदान करू शकतील. 

जागतिक नेत्यांनी केलं अभिनंदन 

मरीन ले पेन यांनी पराभव स्वीकार केला आहे. त्यांनी  इमॅन्युअल मॅक्रोन यांना विजयाबद्दल शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी म्हटलं आहे की, हा एक शानदार विजय आहे. पाच वर्षांपूर्वी देखील इमॅन्युअल मॅक्रोन यांनी  मरीन ली पेन यांना मात देत पहिल्यांदा राष्ट्रपती पदाची खुर्ची मिळवली होती. त्यावेळी त्यांचं वय 39 वर्षांचं होतं. सर्वात युवा राष्ट्रपती होण्याचा मान त्यांनी त्यावेळी मिळवला होता.  

पंतप्रधान मोदींनीही मॅक्रॉन यांचे ट्विट करत अभिनंदन केले आहे. "भारत-फ्रान्स धोरणात्मक भागीदारी अधिक दृढ करण्यासाठी मी एकत्र काम करत राहण्यास उत्सुक आहे." असल्याचं ट्विट मोदींनी केलं आहे.  युरोपियन कौन्सिलचे अध्यक्ष चार्ल्स मिशेल म्हणाले, “आम्ही फ्रान्सवर आणखी पाच वर्षे विश्वास ठेवू शकतो.

जर्मनीचे चांसलर ओलाफ स्कोल्झ यांनी मॅक्रॉनसोबतचा एक फोटो ट्विटरवर शेअर केला आणि म्हटले: 'आम्ही आमचे चांगले सहकार्य सुरू ठेवू याचा मला आनंद आहे. 'ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी फ्रान्सच्या इमॅन्युअल मॅक्रोन यांचा   सर्वात जवळचे आणि सर्वात महत्वाचे सहयोगी असे वर्णन करत म्हटले की, "फ्रान्सच्या अध्यक्षपदी तुमची पुन्हा निवड झाल्याबद्दल मॅक्रॉन यांचे अभिनंदन." 'फ्रान्स हा आपला सर्वात जवळचा आणि महत्त्वाचा मित्र देश आहे. आपल्या देशांसाठी आणि जगासाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या मुद्द्यांवर एकत्र काम करत राहण्यास मी उत्सुक आहे'.

कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो म्हणाले, 'कॅनडा आणि फ्रान्समधील लोकांसाठी सर्वात महत्त्वाच्या मुद्द्यांवर आमचे कार्य सुरू ठेवण्यास उत्सुक आहोत.' स्पेनचे पंतप्रधान पेड्रो सांचेझ म्हणाले की, 'मुक्त, मजबूत आणि निष्पक्ष युरोपियन युनियन'साठी नागरिकांनी फ्रान्सची निवड केली आहे, 
पाच वर्षांपूर्वीही पेनचा पराभव

मॅक्रॉन  हे 20 वर्षात सलग दुसऱ्यांदा कार्यभार सांभाळणारे पहिले फ्रेंच राष्ट्राध्यक्ष ठरले आहेत. रविवारी मतदान संपल्यानंतर, विविध मतदान संस्थांनी अंदाज वर्तवला की मॅक्रॉन त्यांच्या जवळच्या प्रतिस्पर्ध्यावर मोठी आघाडी घेत असल्याचे दिसत आहे.  अनेक फ्रेंच नागरिकांनी ओपिनियन पोलमध्ये अध्यक्ष म्हणून त्यांचे कौतुक केले. COVID-19 साथीचा रोग आणि युक्रेन संघर्ष यांसारख्या मोठ्या जागतिक संकटांना तोंड देताना ते या पदासाठी योग्य मानले जात होते. पाच वर्षांपूर्वी, वयाच्या 39 व्या वर्षी, मॅक्रॉन यांनी ले पेनचा पराभव करून फ्रान्सचे सर्वात तरुण राष्ट्राध्यक्ष बनले होते.


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी