फ्रान्समध्ये चाकू हल्ला, महिलेची गळा चिरून हत्या, आणखी तिघे दगावले 

मोहम्मद पैगंबरांच्या कार्टून वादाने आता हिंसक वळण घेतले असून फ्रान्समध्ये शिक्षकाचा गळा चिरून हत्येनंतर या सारख्याच आणखी एका  हत्येचा प्रकार समोर आल्याने खळबळ माजली आहे.

France knife attack: Man shouting
फ्रान्समध्ये दहशतवादी हल्ला, 

पॅरिस : मोहम्मद पैगंबरांच्या कार्टून वादाने आता हिंसक वळण घेतले असून फ्रान्समध्ये शिक्षकाचा गळा चिरून हत्येनंतर या सारख्याच आणखी एका  हत्येचा प्रकार समोर आल्याने खळबळ माजली आहे.  फ्रान्सच्या एका चर्चमध्ये हल्लेखोराने एका महिलेचा गळा चाकूने चिरला आहे.  तसेच अन्य दोन लोकांवर चाकूने वार करून हत्या केली आहे. ही घटना फ्रान्सच्या नाईस शहरात झाली आहे. शहराच्या महापौरांनी हा दहशतवादी हल्ला असल्याचे स्पष्ट केले आहे.

चाकूहल्ल्याची घटना शहरातील नोट्रे डॅम चर्चमध्ये झाली असल्याचे महापौर क्रिस्चियन इस्‍तोर्सी यांनी सांगितले. पोलिसांनी हल्लेखोराला अटक केली आहे. तसेच हल्लेखोराच्या हल्ल्यात तीन लोकांचा यामध्ये मृत्यू झाल्याचे सांगितले आहे. अन्य काही लोक जखमी झाले आहेत. महिलेचा गळा धारदार चाकूने चिरण्यात आल्याचे फ्रान्सच्या एका नेत्यानेही सांगितले आहे.

 या हल्ल्याच्या तपासाची जबाबदारी फ्रान्सच्या दहशतवाद विरोधी पथकाकडे देण्यात आली आहे. घटनास्थळाजवळ शस्त्रधारी सैनिकांनी चर्चला घेराव घातला आहे. अँम्बुलन्स आणि फायर सर्व्हिसच्या गाड्या घटनास्थळी आल्या आहेत. हा हल्ला जेव्हा झाला त्यापूर्वी काही  क्षणापूर्वी  एका शिक्षिकेची गळा चिरून हत्या करण्यात आली असल्याची माहिती फ्रान्सच्या दहशतवाद विरोधी पथकाने दिली आहे. 

सध्या हा चाकू हल्ला का झाला याचे कारण अद्याप समजू शकले नाही. पण फ्रान्समध्ये सध्या मोहम्मद पैंगबर यांच्या कार्टूनवरून वाद सुरु आहे. या हल्लामागे हाच वाद  कारणीभूत असल्याची शक्यता व्यक्त होत आहे. या दिशेने तपास सुरु करण्यात आला आहे. शिक्षिकेच्या हत्येनंतर फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमैनुअल मॅक्रो यांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि धर्माचा उपहास करण्याच्या अधिकाराचे जोरदार समर्थन केले होते. यानंतर ते मुस्लिम देशांच्या टीकेचे धनी झाले होते.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी