मुंबई: Free Corona Booster Dose: गेल्या दोन ते अडीच वर्षांपासून संपूर्ण जग कोरोनाच्या (Corona Virus) सावटाखाली जगतेय. जगातले सर्व नागरिक कोरोना व्हायरससारख्या महामारीशी लढा देत आहे. अद्यापही कोरोनाचा प्रार्दुभाव कमी झालेला दिसत नाही आहे. गेल्या काही दिवसांपासून पुन्हा एकदा कोरोनाचा वाढता आलेख पाहायला मिळतोय. कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्याकरिता केंद्र सरकारनं (Central Government) कोरोनाच्या लसीकरणाबाबत मोठा निर्णय घेतला आहे. देशातील 18 वर्षांवरील नागरिकांसाठी बूस्टर डोस (Booster Dose) मोफत देण्याची घोषणा केली आहे. केंद्र सरकारकडून देशात 75 दिवसांसाठी कोविड लस अमृत महोत्सव ही मोहिम राबवण्यात येत आहे.
केंद्र सरकारचं कोविड लस अमृत महोत्सव
भारतीय स्वातंत्र्याचे अमृत महोत्सव आणि केंद्र सरकारच्या निर्देशानुसार देशात 75 दिवसांसाठी 'कोविड लस अमृत महोत्सव' राबविण्यात येत आहे. या मोहिमेच्या पार्श्वभूमीवर आजपासून मुंबईमध्ये सुद्धा हा महोत्सव सर्व शासकीय आणि महानगरपालिका लसीकरण केंद्रांवर (Covid Booster Dose) राबविला जात आहे. या मोहिमे अंतर्गत देशात 75 दिवसांसाठी 18 वर्षांवरील सर्व नागरिकांना मोफत बूस्टर डोस दिला जाणार आहे.
अधिक वाचा- आज राज्यातल्या राजकारणात घडणार मोठी घडामोड, 'या' दोन नेत्यांची होणार भेट; राजकीय चर्चांना उधाण
हा बूस्टर डोस कोणाकोणाला घेता येणार?
सध्या आरोग्य मंत्रालयानं कोरोनाच दुसरा डोस आणि बूस्टर डोस यांच्यातील अंतर 9 महिन्यांवरून 6 महिन्यांवर आणलं आहे. प्रत्येकानं तसंच जास्तीत जास्त लोकांनी बूस्टर डोस घ्यावा, यासाठी आरोग्य मंत्रालयानं हे अंतर कमी केलं आहे. त्यामुळे 18 वर्षांवरील पात्र असलेल्या लाभार्थ्यांना कोविड- 19 लसीचा दुसरा डोस घेऊन 6 महिने किंवा 26 आठवडे पूर्ण झाले आहेत, अशा लाभार्थ्यांना बूस्टर डोस विनामूल्य घेता येणार आहे.
मुंबई पालिकेचं आवाहन
कोविड लस अमृत महोत्सवाचा लाभ घेऊन संबंधित पात्र मुंबईकर नागरिकांनी कोविड लसीचा हा डोस घ्यावा, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.
मुंबई एकूण 229 कोविड लसीकरण केंद्र अॅक्टिव्ह
सद्यस्थितीत मुंबईत महानगरपालिका आणि शासकीय रुग्णालयात 104 तर खासगी रुग्णालयात 125 अशी एकूण 229 कोविड-19 लसीकरण केंद्रं सध्या कार्यान्वित आहेत. मुंबईत आतापर्यंत वय वर्षे 18 वरील 1 कोटी 03 लाख 15 हजार नागरिकांना कोविड लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे. तर 93 लाख 56 हजार 541 लाभार्थ्यांना दुसरा डोस दिला आहे.
अधिक वाचा- Donald Trump यांची पहिली पत्नी Ivana यांचे 73 व्या वर्षी निधन, मुलगी इव्हांकाची Emotional Post
खासगी रुग्णालयात मोजावे लागणार पैसे
कोरोनाचा बूस्टर डोस केवळ सरकारी रूग्णालयामध्येच मोफत मिळणार आहे. खासगी रुग्णालयात कोणी बूस्टर डोस घेतल्यास त्यासाठी त्यांना पैसे भरावे लागणार आहेत. खासगी केंद्रांवर, कोविशील्ड आणि कोव्हॅक्सीनच्या बूस्टर डोससाठी 225 रुपये शुल्क भरावं लागेल. याशिवाय रुग्णालय स्वतंत्रपणे सेवा शुल्क सुद्धा आकारण्याची शक्यता आहे.