Constitution Day 2021 in India : भारतीय संविधानावर आधारलेला विनामूल्य ऑनलाइन अभ्यासक्रम

Free Online Course On Indian Constitution भारत सरकारचा विधी व न्याय विभाग आणि हैदराबादच्या नालसर विद्यापीठाच्या विधी व न्याय विभागाने संयुक्तपणे संविधान दिनाच्या पूर्वसंध्येला भारतीय संविधानावर आधारलेला असा विनामूल्य ऑनलाइन अभ्यासक्रम सुरू केला

Free Online Course On Indian Constitution
भारतीय संविधानावर आधारलेला विनामूल्य ऑनलाइन अभ्यासक्रम 
थोडं पण कामाचं
  • भारतीय संविधानावर आधारलेला विनामूल्य ऑनलाइन अभ्यासक्रम
  • कोणीही नोंदणी करुन हा अभ्यासक्रम ऑनलाइन पद्धतीने पूर्ण करू शकते.
  • अभ्यासक्रम पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र हवे असल्यास १०० शुल्क आहे.

Free Online Course On Indian Constitution नवी दिल्ली: भारत सरकारचा विधी व न्याय विभाग आणि हैदराबादच्या नालसर विद्यापीठाच्या विधी व न्याय विभागाने संयुक्तपणे संविधान दिनाच्या पूर्वसंध्येला भारतीय संविधानावर आधारलेला असा विनामूल्य ऑनलाइन अभ्यासक्रम सुरू केला आहे. कोणीही नोंदणी करुन हा अभ्यासक्रम ऑनलाइन पद्धतीने पूर्ण करू शकते. अभ्यासक्रम पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र हवे असल्यास १०० शुल्क आहे. हे शुल्क भरणाऱ्यास अभ्यासक्रम पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र दिले जाईल. अभ्यासक्रम http://legalaffairs.nalsar.ac.in/ या लिंकवर उपलब्ध आहे.

भारतात दरवर्षी २६ नोव्हेंबर रोजी संविधान दिन साजरा करण्याची परंपरा फार जुनी नाही, परंतु हा दिवस राष्ट्रीय कायदा दिवस म्हणून ओळखल्याचा इतिहास आहे. खरे तर या दिवसाचे महत्त्व असे आहे की या दिवशी भारतीय राज्यघटना स्वीकारण्यात आली. होय, 26 जानेवारी 1950 रोजी भारतीय राज्यघटना अंमलात आली, पण त्याच्या दोन महिने आधी म्हणजे 26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान सभेने अनेक चर्चा आणि दुरुस्त्या करून अखेर संविधान स्वीकारले.

आज 26 नोव्हेंबर हा पहिला कायदा दिवस म्हणून साजरा करण्यात आला. आणि त्यामागील कथा अशी आहे की १९३० मध्ये काँग्रेसच्या लाहोर अधिवेशनात पूर्ण स्वराज्याची प्रतिज्ञा पारित करण्यात आली होती, या घटनेच्या स्मरणार्थ कायदा दिन साजरा करण्यात आला. आता संविधान दिनाचा इतिहासही जाणून घेऊया.

संविधान दिन का साजरा केला जातो?

देशाच्या संविधानाबाबत नागरिकांमध्ये जागृती व्हावी आणि संविधानिक मूल्यांचा प्रचार व्हावा यासाठी संविधान दिन साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. या दिवशी भारताने आपली राज्यघटना स्वीकारली होती, त्यामुळे सामाजिक न्याय मंत्रालयाने 19 नोव्हेंबर 2015 रोजी निर्णय घेतला होता की भारत सरकार 26 नोव्हेंबर हा संविधान दिन म्हणून साजरा करण्याची परंपरा सुरू करेल.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी