चीनसाठी हेरगिरी, पत्रकाराला अटक

freelance journalist rajeev sharma arrested for Espionage दिल्ली पोलिसांनी गोपनीयता कायद्यांतर्गत मुक्त पत्रकार राजीव शर्माला अटक केली.

freelance journalist rajeev sharma arrested for Espionage
मुक्त पत्रकार राजीव शर्माला अटक 

थोडं पण कामाचं

  • चीनसाठी हेरगिरी, पत्रकाराला अटक
  • मुक्त पत्रकार राजीव शर्माला अटक
  • राजीवला सहा दिवसांची पोलीस कोठडी

नवी दिल्ली: दिल्ली पोलिसांनी गोपनीयता कायद्यांतर्गत एक पत्रकाराला अटक केली. मुक्त पत्रकार (freelance journalist) असलेल्या राजीव शर्मा (rajeev sharma) याला भारताच्या संरक्षणाशी संबंधित महत्त्वाच्या गोपनीय दस्तऐवजांसह अटक (arrested) करण्यात आली. दिल्लीच्या पीतमपुरा भागात १४ सप्टेंबर रोजी ही कारवाई केल्याचे पोलिसांनी सांगितले. राजीवला दुसऱ्य़ा दिवशी मॅजिस्ट्रेटसमोर हजर करण्यात आले आणि चौकशीसाठी त्याला सहा दिवसांकरिता पोलीस कोठडी देण्यात आली. (freelance journalist rajeev sharma arrested for Espionage)

चीनसाठी भारतात हेरगिरी केल्याप्रकरणी मुक्त पत्रकार राजीव शर्माला अटक

मुक्त पत्रकार (freelance journalist) असलेल्या राजीव शर्मा (rajeev sharma) याला चीनसाठी भारतात हेरगिरी केल्याप्रकरणी अटक केल्याचे दिल्ली पोलिसांनी सांगितले. राजीवसह एका चिनी महिलेला तसेच एका नेपाळी व्यक्तीला अट करण्यात आली आहे. अटक केलेले तिघेजण एका बनावट कंपनीच्या नावाने बँक खाते चालवत होते. या खात्यामार्फत नियमितपणे मोठ्या प्रमाणावर आर्थिक व्यवहार सुरू होते. या व्यवहारांची तसेच तिन्ही आरोपींची चौकशी सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. राजीव भारताची महत्त्वाची गोपनीय माहिती चीनच्या गुप्तहेरांना पुरतवत होता, असाही आरोप होत आहे. या प्रकरणाचा तपास सुरू आहे. (passing sensitive information to Chinese intelligence)

राजीव शर्माने भारत-चीन तणावाचे केले होते कव्हरेज

राजीव शर्मा याने एक मुक्त पत्रकार म्हणून यूएनआय (United News of India - UNI), द ट्रिब्युन (The Tribune), सकाळ टाइम्स (Sakal Times) यांच्यासाठी काम केले आहे. तसेच राजीव किष्किन्धा या नावाने एक यू ट्युब चॅनल चालवले आहे. या चॅनलचे १२ हजारपेक्षा जास्त सबस्क्रायबर आहेत. या चॅनलवर १२ व्हिडीओ आहेत. यापैकी निवडक व्हिडीओ ताज्या भारत आणि चीन यांच्यातील तणावाशी संबंधित आहेत. 

'ग्लोबल टाइम्स'साठी राजीव शर्माने लिहिला होता लेख

राजीव शर्मा याने अलिकडेच चीनच्या कम्युनिस्ट सरकारचे मुखपत्र असलेल्या 'ग्लोबल टाइम्स'साठी एक लेख लिहिला होता. या लेखात ५ मे २०२० पासून भारत आणि चीन यांच्यातील तणाव वाढत आहे, दोन्ही देशांच्या राजकीय हितसंबंधांमध्ये बाधा आली आहे आणि परिस्थिती सातत्याने चिघळत आहे; अशा स्वरुपाचा उल्लेख आहे. याआधी २९ ऑक्टोबर २०१९ रोजी व्हॉट्सअॅपवर भारतीय वेळेनुसार रात्री ९.३६ वाजता एक संदेश आला आणि फोन हाय रिस्क मध्ये असल्यामुळे बदलण्याचा सल्ला देण्यात आल्याचे राजीव शर्मा याने सांगितले होते. व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून इस्रायलची पेगासस नावाची कंपनी भारतासह जगभर अनेकांची हेरगिरी करत होती; अशा स्वरुपाचे एक वृत्त आले होते. याच वृत्ताआधारे आपली हेरगिरी सुरू असल्याचे राजीव शर्माने सांगितले होते. मात्र ताज्या घटनेत राजीवला गोपनीय दस्तऐवजांसह रंगेहात पकडण्यात आल्याची माहिती दिल्ली पोलिसांनी दिली.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी