फ्रान्समधून भारतात दाखल झाली ३६ पैकी २४ राफेल

सात टप्प्यांमध्ये फ्रान्सकडून भारताला २४ राफेलचा पुरवठा झाला. यापैकी सातव्या टप्प्यात आलेला तीन राफेल विमानांचा ताफा बुधवारी संध्याकाळी भारतात दाखल झाला.

Fresh batch of 3 Rafale fighter jets land in India after flying 7,000 km non-stop from France
फ्रान्समधून भारतात दाखल झाली ३६ पैकी २४ राफेल 

थोडं पण कामाचं

  • फ्रान्समधून भारतात दाखल झाली ३६ पैकी २४ राफेल
  • सात टप्प्यांमध्ये फ्रान्सकडून भारताला २४ राफेलचा पुरवठा
  • सातव्या टप्प्यात आलेला तीन राफेल विमानांचा ताफा बुधवारी संध्याकाळी भारतात दाखल

नवी दिल्ली: भारत आणि फ्रान्स यांच्यात झालेल्या करारांतर्गत ३६ पैकी २४ राफेल विमानं भारतात दाखल झाली. यापैकी १८ भारत-पाकिस्तान सीमेजवळच्या अंबाला एअरबेसवर आणि उर्वरित सहा चीन सीमेजवळच्या पश्चिम बंगालमधील हाशिमारा एअरबेसवर आहेत. लवकरच आणखी बारा राफेल हाशिमारा एअरबेसवर पोहोचतील. फ्रान्ससोबत केलेल्या करारानुसार भारताला ३६ राफेल विमानांचा ताफा मिळणार आहे. यापैकी ३० लढाऊ विमानांचा ताफा आहे. बाकीच्या सहा विमानांचा ताफा प्रशिक्षणासाठी वापरला जाईल. Fresh batch of 3 Rafale fighter jets land in India after flying 7,000 km non-stop from France

आतापर्यंत सात टप्प्यांमध्ये फ्रान्सकडून भारताला २४ राफेलचा पुरवठा झाला. यापैकी सातव्या टप्प्यात आलेला तीन राफेल विमानांचा ताफा बुधवारी संध्याकाळी भारतात दाखल झाला. फ्रान्समधून उड्डाण करुन कुठेही न थांबता या विमानांनी सात हजार किमी. पेक्षा जास्त अंतराचा प्रवास केला आणि भारतात दाखल झाली. तिन्ही राफेलमध्ये उड्डाणादरम्यान फक्त एकदा यूएईच्या आकाशात इंधन भरण्यात आले. यासाठी फ्रान्सच्या यूएईमधील तळावरुन इंधन भरणाऱ्या विमानाने उड्डाण केले होते. 

भारत आणि फ्रान्स यांच्यात २०१६ मध्ये राफेल संदर्भात करार झाला. या करारानुसार २०२१च्या अखेरपर्यंत सर्व राफेल भारतात दाखल होणार आहेत. भारत आणि चीन यांच्यातील तणाव कायम आहे. अशा परिस्थितीत राफेल विमानांमुळे भारतीय हवाई दलाच्या सामर्थ्यात वाढ झाली आहे. 

फ्रान्सने कोरोना संकटाच्या अडचणीतून मार्ग काढून राफेल पुरवठ्यात अडथळा येणार नाही याची खबरदारी घेतली आहे. यासाठी भारताचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी फ्रान्सचे आभार मानले आहेत. भारतीय हवाई दलाने राफेलची सातवी खेप भारतात पोहोचल्याचे ट्वीट करुन जाहीर केले, तसेच सहकार्यासाठी फ्रान्स आणि यूएईचे आभार मानले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी