वजनदार खासदारांला गडकरींनी घातली अट, 15 KG वजन कमी करून 15 हजार कोटींची केली कमाई

एका कार्यक्रमादरम्यान नितीन गडकरींनी खासदार अनिल फिरोजिया यांना सांगितले होते की, त्यांनी कमी केलेल्या प्रत्येक किलोमागे उज्जैनच्या विकासासाठी 1000 कोटी रुपये मिळतील. अनिल फिरोजिया यांनी हे आव्हान स्वीकारुन १५ किलो वजन कमी केले.

Gadkari put on heavy MPs, lost 15 kg and earned Rs 15,000 crore
वजनदार खासदारांला गडकरींनी घातली अट, 15 KG वजन कमी करून 15 हजार कोटींची केली कमाई ।   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी भाजप खासदार अनिल फिरोजिया यांना फिटनेस चॅलेंज दिले आहे.
  • फिरोझिया यांना आव्हान स्विकारुन १५ किलो वजन कमी केले
  • प्रत्येक किलोमागे 1000 कोटी रुपयांचा निधी मिळाले

मुंबई : उज्जैनचे भाजप खासदार अनिल फिरोजिया आजकाल आपले वजन कमी करण्यासाठी मेहनत घेत आहेत. त्यांच्या सकाळची सुरुवात त्याच्या घरातील छोट्या बागेत कसरत करून होते. बराच वेळ वजन कमी करण्याचा व्यायाम करतात आणि त्यानंतर सायकल चालवतात. ही मेहनत ते उगाचच करीत नाहीत तर त्यांना सांगण्यात आले होते की ते जितके जास्त किलो वजन कमी करेल, तितकेच त्यांना हजार कोटी विकासकामांसाठी निधी मिळेल.

अधिक वाचा : 

सहरनपूर ते रांची हिंसाचारात दोन ठार,144 लागू-इंटरनेट बॅन-शेकडोंची धरपकड

असे आश्वासन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी खासदाराला दिले आहे. ते म्हणाले की, जेवढे किलोग्रॅम वजन कमी होईल तेवढेच हजार कोटी रुपये परिसरातील रस्त्यांसाठी उपलब्ध होतील. या वर्षी फेब्रुवारीमध्ये केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी मध्य प्रदेशातील माळवा भागात 5,772 कोटी रुपये खर्चाच्या 11 रस्ते प्रकल्पांची पायाभरणी केली होती. या प्रकल्पांमधून एकूण 534 किमी लांबीचे रस्ते तयार केले जाणार आहेत. या कार्यक्रमादरम्यान खासदार त्यांच्या लोकसभा मतदारसंघात रस्तेबांधणीसाठी अधिक निधीची मागणी करत होते. अनिल फिरोजिया यांच्या मागणीनंतर गडकरींनी निधी देण्याचे आश्वासन दिले. पण त्यासाठी एक अट घातली. तुम्ही जितके किलो वजन कमी कराल, तेवढे हजार कोटी रुपये मी उज्जैनच्या विकासासाठी देईन.

अधिक वाचा : 

Aryan Khan on Drugs Case : माझी नाहक बदनामी करण्यात आली, आर्यन खानने पहिल्यांदाच बोलून दाखवली खंत

नितीन गडकरींचे आव्हान मिळाल्यानंतर खासदारांनी वजन कमी करण्याच्या मोहिमेला सुरुवात केली. फेब्रुवारीमध्ये त्याचे वजन 125 किलो होते. फिरोजिया वजन कमी करण्यासाठी डायट प्लान फॉलो करत आहे. तो दररोज दोन तास शारीरिक व्यायाम, सायकलिंग, पोहणे आणि योगासने करतो. तीन महिन्यांच्या मेहनतीनंतर अनिल फिरोजिया यांना 15 किलो वजन कमी करण्यात यश आले आहे. आता केंद्रीय मंत्र्यांच्या सूचनेनुसार ते १५ हजार कोटींचे हक्कदार झाले आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी