Domestic Navigation System : विमानांना आकाशात 'GAGAN' दाखवणार दिशा, 'इंडिगो' ठरली लॅंडिंग करणारी पहिली एअरलाइन

'गगन' (GAGAN) म्हणजेच जीपीएस (GPS) सहाय्यित GEO ऑगमेंटेड नेव्हिगेशन नावाच्या भारताच्या स्वतःच्या उपग्रहावर आधारित ऑगमेंटेशन सिस्टमद्वारे प्रथमच विमानाचे लॅंडिंग यशस्वी झाले आहे

Indigo becomes first airline to land with 'GAGAN'
आशियातून भारताकडेच आहे नेव्हिगेशन एअरक्राफ्ट ऑपरेशन सिस्टीम   |  फोटो सौजन्य: Indiatimes

GPS-aided GEO augmented navigation : नवी दिल्ली : 'गगन' (GAGAN) म्हणजेच जीपीएस (GPS) सहाय्यित GEO ऑगमेंटेड नेव्हिगेशन नावाच्या भारताच्या स्वतःच्या उपग्रहावर आधारित ऑगमेंटेशन सिस्टमद्वारे प्रथमच विमानाचे लॅंडिंग यशस्वी झाले आहे. या यशस्वी लँडिगमुळे भारत ही सिस्टीम असलेला आशियातील पहिला देश बनला आहे. भारत आशियातील पहिला देश बनला आहे, ज्याकडे स्वत:ची स्वदेशी नेव्हिगेशन एअरक्राफ्ट ऑपरेशन सिस्टीम आहे.

 दरम्यान, राजस्थानमधील अजमेरजवळील छोट्या विमानतळावर या स्वदेशी नेव्हिगेशन सिस्टीमची चाचणी झाली असून ही चाचणीत यश हाती आले आहे. यामुळे भारत आता यूएस, जपान आणि युरोप या गटात सामील झाला आहे. स्वदेशी नेव्हिगेशन एअरक्राफ्ट ऑपरेशन सिस्टीम 'गगन' वापरून विमान उतरवणारी 'इंडिगो' ही देशातील पहिली एअरलाइन बनली आहे. 

इंडिगोने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, राजस्थानमधील किशनगड विमानतळावर बुधवारी सकाळी ATR-72 विमान GPS-सहाय्यित जिओ-ऑगमेंटेड नेव्हिगेशन (GAGAN) वापरून उतरवण्यात आलं. केंद्राच्या विमानतळ प्राधिकरणाने (AAI) आणि भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) यांनी संयुक्तपणे ही नेव्हिगेशन प्रणाली विकसित केली आहे.

विमानाच्या लँडिंगसाठी धावपट्टीजवळ येत असताना मार्गदर्शनासाठी 'गगन' प्रणाली वापरली जाते. त्याची अचूकता विशेषतः इन्स्ट्रुमेंट लँडिंग सिस्टम (ILS) स्थापन नसलेल्या लहान विमानतळांसाठी उपयुक्त आहे. गगन भारताच्या नागरी विमान वाहतूक क्षेत्राचे आधुनिकीकरण करेल, उड्डाणाला होणार विलंबही कमी करेल. यासह इंधन वाचवेल, असे निवेदनात सांगण्यात आलं आहे.


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी