Gama Pehalwan: गामा पेहलवान, जो जगातील एकही सामना हारला नाही...त्याच्या अगडबंब आहाराबद्दल माहित आहे का? व्हाल आश्चर्यचकित

The Great Gama Pehalwan : गामा पैलवान (Gama Pehalwan)... हे नाव तुम्ही ऐकलेच असेल. तुम्हीच काय ज्याला कुस्तीबद्दल माहित आहे किंवा कुस्तीबद्दल आवड आहे अशांना गामा पैलवान हे नाव माहित असतेच. किंबहुना जगाचा कुस्तीचा इतिहासच मूळी गामा पैलवानशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. द ग्रेट गामा रेसलर (The Great Gama Pehalwan) हा जगातील महान कुस्तीपटूंपैकी एक होता.

The Great Gama Pehalwan
द ग्रेट गामा पैलवान 
थोडं पण कामाचं
  • गामा पैलवान हा कुस्तीच्या दुनियेतील एक आख्यायिका
  • गामा पैलवानाचा व्यायाम आणि आहार हा तोंडात बोटे घालायला लावणारा
  • गामा पैलवान जगात एकही सामना हारला नाही

The Great Gama Pehalwan : नवी दिल्ली : गामा पैलवान (Gama Pehalwan)... हे नाव तुम्ही ऐकलेच असेल. तुम्हीच काय ज्याला कुस्तीबद्दल माहित आहे किंवा कुस्तीबद्दल आवड आहे अशांना गामा पैलवान हे नाव माहित असतेच. किंबहुना जगाचा कुस्तीचा इतिहासच मूळी गामा पैलवानशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. द ग्रेट गामा रेसलर (The Great Gama Pehalwan) हा जगातील महान कुस्तीपटूंपैकी एक होता. 22 मे 1878 रोजी अमृतसर येथे जन्मलेले गुलाम मुहम्मद हे गामा पैलवान कसे बनले याचीही जबरदस्त कहाणी आहे. गामा पैलवान यांनी जगातील सर्व नामवंत पैलवानांना धूळ चारली होती. कुस्तीच्या विश्वात गामा पैलवान हे एक आख्यायिका बनून राहिले आहे. त्यांची ताकद, कुस्तीचे कौशल्य, आहार, व्यायाम या सर्व गोष्टी थक्क करायला लावणाऱ्या आहेत. गामा पैलवान यांच्याबद्ल त्यांच्या हयातीत तर आकर्षण होतेच. मात्र ते कुतुहल आज इतक्या वर्षानंतरदेखील जरादेखील कमी झालेले नाही. (Gama Pehalwan who never lost the match, do you know his huge diet)

अधिक वाचा : महिलेने घरात पाळले ४०० विषारी कोळी

अगडबंब खुराक (Gama Pehalwan Diet)

गामा पैलवानांचा आहार ऐकूनच तुम्ही तोंटात बोटे घालाल. गामा पैलवान 10 लिटर दूध, अर्धा किलो तूप आणि बदाम आणि ज्यूस प्यायचा. एवढेच नाही तर तो रोज 6 किलो चिकन आणि 100 रोट्या खात असे. गामा पहेलवान यांना रुस्तम-ए-जमान या नावानेही ओळखले जात होते. त्यांना शेर-ए-पंजाब आणि द ग्रेट गामा म्हणूनही ओळखले जात होते.

गामा पहेलवान यांचा जन्म अमृतसर येथे झाला होता पण भारताच्या फाळणीनंतर ते पाकिस्तानात गेले. गामा पहेलवानचे वडील मुहम्मद अजीज हे देखील प्रसिद्ध कुस्तीपटू होते. यामुळेच गामा पहेलवान यांना लहानपणापासूनच कुस्तीची आवड होती.

अधिक वाचा : कुतुबमिनार का विष्णू स्तंभ: कुतुबमिनारच्या परिसरात कोणतेच होणार नाही उत्खनन- केंद्रीय सांस्कृतिक मंत्री

एकही सामना न गमावणारा पैलवान (Unbeatable Wrestler)

पंजाबमधील प्रसिद्ध कुस्तीपटू माधो सिंग यांच्याकडून त्यांनी कुस्तीचे डावपेच शिकले. दातियाचे महाराज भवानी सिंह यांनी त्यांना कुस्तीची सुविधा दिली होती. भारताच्या फाळणीपूर्वी गामा पहेलवान यांनी जगभर भारताचे नाव मोठे केले. काश्मिरी 'बट' कुटुंबाशी संबंधित असलेल्या गामाने भारताचे नाव जगभर मोठे केले. असे म्हटले जाते की ते जगातील एकमेव कुस्तीपटू होते ज्याने आयुष्यात कधीही सामना गमावला नाही.

महान पैलवान

गामा पहेलवानची उंची 5 फूट 7 इंच होती. त्या काळात त्याने जगातील जवळपास सर्वच कुस्तीपटूंना पराभूत केले. वयाच्या अवघ्या 19 व्या वर्षी गामा पहेलवानने रहिम बक्श सुलतानी वाला सारख्या प्रसिद्ध कुस्तीपटूला तारे दाखवले. रहिमबक्ष सुलतानीवाला पहेलवान यांना अप्रतिम सामर्थ्य आणि चपळाईने पराभूत केल्यानंतर गामा पहेलवान यांचे नाव देशातच नव्हे तर जगभर गाजले.

अधिक वाचा : Monkeypox Virus: 12 देशात मंकीपॉक्सचे रुग्ण; ट्रॅव्हल लिंकशिवाय मंकीपॉक्स आफ्रिकेबाहेर कसा पसरतो? WHO ने उत्तर दिले

द ग्रेट गामा

द ग्रेट गामा या नावाने प्रसिद्ध असलेला गामा रेसलर हा जगातील महान कुस्तीपटूंपैकी एक होता. सुमारे पाच दशकांच्या कुस्ती कारकिर्दीत तो अजिबात थांबला नाही.  तो एका दिवसात 5000 सिट-अप आणि 1000 हून अधिक पुश-अप्स करत असे. गामा पहेलवानने एका जड दगडाला डंबेल बनवले होते.

या प्रमुख पैलवानांना चारली धूळ

वर्ल्ड दंगलमध्ये गामा कुस्तीपटूने अमेरिकेचा कुस्तीपटू बेंजामिन रोलर आणि पोलंडचा विश्वविजेता कुस्तीपटू स्टेनली झिबिस्को यांचा पराभव केला.
स्टॅनली जिबिस्कोचे वजन गामा पहेलवानपेक्षा जास्त असल्याचे म्हटले जाते. असे असूनही त्याला गामा पहेलवानची भीती वाटत होती. असेही म्हटले जाते की एकदा स्टॅनली मैदान सोडून पळून गेला.


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी