धक्कादायक, गेमिंगच्या व्यसनाने बनवले अपराधी, किशोरवयीन मुलाने फोन आणि प्रिमियम पॅकसाठी चोरले लाख

चेन्नईमध्ये गेमिंगचे व्यसन जडलेल्या एका १७ वर्षीय मुलाने एका वयस्कर डॉक्टरांच्या बँकखात्यातून ७.५ लाख रुपये चोरले आहेत. एका ऑनलाईन व्यवहारात मदत करत असताना या मुलाने त्यांच्या डेबिट कार्डाचे तपशील मिळवले होते.

Gaming addiction
गेमिंगच्या व्यसनाने बनवले अपराधी, किशोरवयीन मुलाने फोन आणि प्रिमियम पॅकसाठी चोरले लाख  |  फोटो सौजन्य: Times of India

थोडं पण कामाचं

  • पीडित डॉक्टरांच्या घरच्या मोलकरणीच्या मुलाचे कृत्य
  • गेमिंगसाठी खरेदी केला प्रीमियम पॅक
  • डॉक्टरांनी मागे घेतली तक्रार

चेन्नई: चेन्नईमध्ये (Chennai) गेमिंगचे व्यसन (gaming addiction) जडलेल्या एका १७ वर्षीय मुलाने (teenager) एका वयस्कर डॉक्टरांच्या (aged doctor) बँकखात्यातून (bank account) ७.५ लाख रुपये चोरले आहेत. एका ऑनलाईन व्यवहारात (online transaction) मदत (assistance) करत असताना या मुलाने त्यांच्या डेबिट कार्डाचे तपशील (credit card details) मिळवले होते. नंतर याचा वापर करत त्याने त्यांच्या खात्यातून ७.५ लाख रुपये काढले. पीडित डॉक्टरने (victim doctor) या किशोरवयीन मुलाविरोधात तक्रार दाखल करण्यात रस दाखवलेला (no interest in filing complaint) नाही, त्यामुळे पोलिसांनी (police) त्याला समज देऊन (released after warning) सोडून दिले.

पीडित डॉक्टरांच्या घरच्या मोलकरणीच्या मुलाचे कृत्य

पोलिसांनी सांगितले की पीडित ७६ डॉक्टर हे अन्नानगरचे रहिवासी आहेत. त्यांची दोन मुले परदेशात राहतात, त्यामुळे ते घरी एकटेच राहतात. त्यांच्यासोबत त्यांची मोलकरीण आणि तिचा मुलगा सात वर्षांपेक्षाही अधिक काळापासून त्यांच्या घराच्या गच्चीवर राहत होते. हा मुलगा एका खासगी शाळेत शिकतो. या वयस्कर डॉक्टरांना त्यांची गॅजेट्स वापरण्यात हा मुलगा अनेकदा मदत करत असे. अशीच एकदा ऑनलाईन व्यवहारात मदत करताना त्याने डॉक्टरांच्या डेबिट कार्डाचे तपशील मिळवले होते.

गेमिंगसाठी खरेदी केला प्रीमियम पॅक

लॉकडाऊनदरम्यान आरोपी किशोर याला गेमिंगचे व्यसन जडले होते. त्या गेमचा प्रीमियम पॅक खरेदी करण्यासाठी डॉक्टरांच्या खात्यातून ७.५ लाख रुपये लंपास केले. यानंतर त्याने डॉक्टरांच्या फोनमधून पैसे काढल्याचा मेसेजही डिलीट केला. त्याने गेमिंगमध्ये आपल्या मित्रांनाही सामील करून घेण्यासाठी ३० हजार रुपये खर्च करून फोन खरेदी करून दिला. याशिवाय आपल्या मित्रांसाठीही त्याने गेमचा प्रीमियम पॅक खरेदी केला.

डॉक्टरांनी मागे घेतली तक्रार

नंतर या डॉक्टरांनी आपल्या बँक स्टेटमेंटची तपासणी केली तेव्हा त्यांना आपल्या खात्यातून एका वर्षात ७.५ लाख रुपये काढले गेले असल्याचे आढळून आले. त्यांनी अन्नानगर सायबर सेलशी संपर्क साधला. सायबर पोलिसांनी जेव्हा या प्रकरणाचा तपास केला तेव्हा किशोरनेच हे कृत्य केल्याचे आढळून आले. चौकशीदरम्यान त्याने सर्व गोष्टींची कबूली दिली. पण डॉक्टरांनी आरोपीविरोधातील तक्रार मागे घेतली. मुलाच्या आईने पीडित डॉक्टरांना वचन दिले आहे की ती तिच्या मुलाने त्यांच्या पैशातून जे सामान खरेदी केले आहे ते सर्व ती परत करेल.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी