हुबळी : देशभरात गणेशोत्सव (Ganeshotsav) उत्साहात साजरा केला जात आहे. मोठं-मोठे गणेश मंडळ बाप्पाची मिरवणूक काढत त्यांची स्थापना करत आहेत. आनंदाचा आणि मंगलमयी समयी कर्नाटकात (Karnataka) गणरायावरुन मात्र टेन्शन सुरू झालं होतं. उच्च न्यायालयाच्या (High Courts) हस्तक्षेपानंतर येथील वाद मिटला असून ईदगाह मैदानावर (Eidgah Maidan ) गणरायाच्या आगमनाची तयारी सुरू झाली आहे. मंगळवारी रात्री उशिरा उच्च न्यायालयाने ईदगाह मैदानात गणेश चतुर्थी साजरी करण्यास परवानगी दिली. (Ganapati Bappa stayed at Eidgah Maidan for three days; Preparations for Ganaraya )
उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर ईदगाह मैदानावर आता गणेशोत्सवाची जय्यत तयारी सुरू झाली आहे. तयारीबाबत राणी चेन्नम्मा मैदान गजानन उत्सव महामंडळाचे निमंत्रक के गोवर्धन राव म्हणाले की, राणी चेन्नम्मा मैदान हे महापालिकेचे आहे, त्यामुळे या गणपती उत्सवाला येथे परवानगी देण्याची विनंती समिती महामंडळाच्या वतीने आम्ही केली होती.
Read Also : PM Kisan Yojanaच्या लाभार्थ्यांसाठी आजचा दिवस आहे महत्त्वाचा
आम्ही अर्ध्या तासात गणपतीची मूर्ती बसवू. पूजेबाबत राव म्हणाले- "पूजा पारंपारिक पद्धतीने होणार असून महापालिकेच्या सूचनेनुसार आम्ही हा उत्सव ३ दिवस साजरा करणार आहोत. दिलेल्या सर्व सूचनांचे पालन करणार आहोत." हायकोर्टाने बुधवार 31 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर दुपारी 2 वाजेपर्यंत पूजेला परवानगी दिली आहे. न्यायालयाने सात पंडालची उंचीही निश्चित केली आहे. कोर्टाच्या म्हणण्यानुसार 30/30 फुटांपेक्षा उंच पंडाल बांधता येणार नाहीये.
आदल्या दिवशी, कर्नाटकच्या हुबली-धारवाड महानगरपालिकेने (HDMC) ईदगाह मैदानावर तीन दिवस गणेश मूर्ती बसवण्याची परवानगी दिली होती. हुबळी-धारवाडचे नगराध्यक्ष इरेश अचंतगेरी यांनी तसेच निवडून आलेले लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांच्या दीर्घ बैठकीनंतर सोमवारी रात्री उशिरा हा निर्णय जाहीर केला. महापौर म्हणाले होते- "कायदेशीर तज्ञांशी सल्लामसलत केल्यानंतर सभागृहाच्या समितीने गणेशोत्सवाला परवानगी देण्याची शिफारस केली होती. दरम्यान, उत्सवाला परवानगी देण्याच्या बाजूने 28 तर विरोधात 11 निवेदने प्राप्त झाली होती."
Read Also : पुण्यातील मानाच्या पाच गणपतींची कधी होणार प्राणप्रतिष्ठा
यानंतर सर्वोच्च न्यायालयाने पूजेवर बंदी घातली. यादरम्यान त्यांनी या प्रकरणातील पक्षकारांना वाद मिटवण्यासाठी कर्नाटक उच्च न्यायालयात जाण्यास सांगितले होते. सर्वोच्च न्यायालयातील प्रदीर्घ चर्चेदरम्यान, वक्फ बोर्डाने असा युक्तिवाद केला की, जमिनीवर इतर कोणत्याही समुदायाचा कोणताही धार्मिक समारंभ झाला नाही कारण ती वक्फ मालमत्ता म्हणून घोषित करण्यात आली आहे. अचानक 2022 मध्ये, ते म्हणतात की ही विवादित जमीन आहे आणि त्यांना गणेश चतुर्थी उत्सव येथे आयोजित करायचा आहे. यानंतर हुबळीच्या अंजुमन-ए-इस्लाम संस्थेने उच्च न्यायालयात धाव घेतली. यानंतर हायकोर्टाने सुनावणी करताना ही जमीन वादग्रस्त मानण्यास नकार दिला, मात्र पूजेला परवानगी दिली.