आलिशान क्रूझवर १५ वर्षाच्या मुलीला दारू पाजून सामूहिक बलात्कार

Gang raped on Cruise: एका आलिशन क्रूझवर १५ वर्षाच्या मुलीला दारु पाजून तिच्यावर तब्बल १२ जणांनी बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पण याप्रकरणी पीडित मुलीला अद्याप न्याय मिळू शकलेला नाही. 

rape_Thinkstock
आलिशान क्रूझवर १५ वर्षाच्या मुलीला दारू पाजून सामूहिक बलात्कार (प्रातिनिधिक फोटो)  |  फोटो सौजन्य: Thinkstock

थोडं पण कामाचं

  • क्रूझवर सुट्टी एन्जॉय करायला गेलेल्या १५ वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार
  • बलात्कार प्रकरणात क्रूझ कंपनीला मोठा धक्का बसण्याची शक्यता
  • पीडित तरुणाली अद्यापही न्याय मिळालेला नाही.

फ्लोरिडा: एका क्रूझवर १५ वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. खरं तर क्रूझ हे एखाद्या शहराप्रमाणेच असतात. ज्यामध्ये हजारो लोकं उपस्थित असतात. मीडिया रिपोर्टनुसार हे प्रकरण रॉयल कॅरेबियन कंपनीशी निगडीत असल्याचं समजतं आहे. कारण की, मुलीवर बलात्कार याच कंपनीच्या क्रूझवर झाला असल्याचं बोललं जात आहे. या क्रूझचं नाव 'ओसिस ऑफ सी' असं आहे. या प्रकरणामुळे क्रूझ कंपनीचे धाबे चांगलेच दणाणले आहेत. 

मिळालेल्या माहितीनुसार, जवळजवळ एका ग्रुपमधील १२ लोकांनी सुरुवातीला मुलीला दारु पाजली आणि त्यानंतर तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. मुलीने केलेल्या आरोपानुसार हे प्रकरण २०१५ सालातील आहे. एका आलिशान क्रूझवर मुलगी आपल्या कुटुंबीयांसह सुट्टी एन्जॉय करण्यासाठी गेली होती. एका रिपोर्टनुसार, मुलगी अमेरिकेतील फ्लोरिडातून क्रूझ टूरसाठी निघाली होती. दरम्यान, या मुलीने क्रूझ कंपनी आणि आरोपींविरोधात फ्लोरिडा कोर्टात केस दाखल केली आहे. 

२०१६ मध्ये देखील मुलीने याचिका दाखल केली होती. पण तेव्हा ही याचिका फेटाळण्यात आली होती. जर यावेळेस कोर्टाने कारवाईला परवानगी दिल्यास त्याचा सगळ्यात मोठा फटका हा क्रूझ कंपनीला बसणार आहे. मागील काही दिवसांपासून क्रूझवरील अशा अनेक घटना समोर येत आहेत. पीडित मुलीने असा दावा केला आहे की, क्रूझवरील क्रू आणि स्टाफ यांना या घटनेबाबत आधीच माहिती होतं. पण त्यानंतरही त्यांनी कोणतंही पाऊल उचललं नव्हतं. 

अशा प्रकरणातील जाणकार जिम वाकर यांचं म्हणणं आहे की, एका चालत्या-फिरत्या शहरवजा जहाजावर हजारो लोक एकाच वेळी राहत असतात. पण असं असून देखील या क्रूझवर कायदेशीरदृष्ट्या कोणतीही काळजी घेतलेली नसते. तसंच कोणत्याही प्रकारचे पोलीस यावर तैनात केलेले नसतात. अनेकदा ही मोठी जहाजं आंतरराष्ट्रीय समुद्र सीमेमध्ये देखील असतात. अशावेळी जर एखाद्या क्रूझवर अशाप्रकारचा गुन्हा घडल्यास आरोपींना शिक्षा देणं कठीण होऊन बसतं. दरम्यान, पीडित मुलीने रॉयल कॅरेबियन कंपनीवर आरोप केला आहे की, त्यांनी तिला सुरक्षा पुरवली नाही. 

दरम्यान, या संपूर्ण प्रकरणामुळे क्रूझ व्यवसायाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. कारण की, जवळपास चार वर्ष उलटून गेले असले तरीही पीडित मुलीला न्याय मिळून शकलेला नाही. अमेरिकेसारख्या देशात अशा पद्धतीने न्याय मिळण्यास उशीर होत असल्याने सगळीकडेच आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. काही जणांच्या मते, या प्रकरणात संपूर्ण व्यवस्थेचाच हलगर्जीपणा झाला आहे. त्यामुळे यापुढे तरुणीला न्याय हवा असेल तर तिला त्यासाठी प्रचंड संघर्षातून जावं लागणार आहे. दुसरीकडे क्रूज कंपनीने देखील हलगर्जीपणा केल्यामुळे त्यांच्यावर देखील मोठी कारवाई होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सध्या तरी याप्रकरणात नेमकं काय होणार याबाबत अद्याप फार काही समजू शकलेलं नाही. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
आलिशान क्रूझवर १५ वर्षाच्या मुलीला दारू पाजून सामूहिक बलात्कार Description: Gang raped on Cruise: एका आलिशन क्रूझवर १५ वर्षाच्या मुलीला दारु पाजून तिच्यावर तब्बल १२ जणांनी बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पण याप्रकरणी पीडित मुलीला अद्याप न्याय मिळू शकलेला नाही. 
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola
Recommended Articles
INX Media case: काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय अर्थमंत्री पी चिदंबरम यांना अटक
INX Media case: काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय अर्थमंत्री पी चिदंबरम यांना अटक
पाकिस्तानला मोठा झटका देण्यासाठी मोदी सरकारने केला 'हा' सर्वात मोठा प्लान
पाकिस्तानला मोठा झटका देण्यासाठी मोदी सरकारने केला 'हा' सर्वात मोठा प्लान
जीएसटीने केला घोळ; पार्ले कंपनी दहा हजार कामगारांना काढून टाकणार
जीएसटीने केला घोळ; पार्ले कंपनी दहा हजार कामगारांना काढून टाकणार
P Chidambaram INX Media case: चिदंबरम यांच्या अडचणींमध्ये वाढ; सर्वोच्च न्यायलयाकडूनही अद्याप दिलासा नाही
P Chidambaram INX Media case: चिदंबरम यांच्या अडचणींमध्ये वाढ; सर्वोच्च न्यायलयाकडूनही अद्याप दिलासा नाही
पंतप्रधान मोदींच्या न्यू यॉर्क भेटीत अडचण आणण्यासाठी हा प्लान करत आहे पाकिस्तान 
पंतप्रधान मोदींच्या न्यू यॉर्क भेटीत अडचण आणण्यासाठी हा प्लान करत आहे पाकिस्तान 
ज्या इमारतीचं उद्घाटन केलं तिथेच आरोपी म्हणून आले चिदंबरम! 
ज्या इमारतीचं उद्घाटन केलं तिथेच आरोपी म्हणून आले चिदंबरम! 
Donald Trump On Kashmir: काश्मीर प्रश्नावर डोनाल्ड ट्रम्प यांना चिंता; मध्यस्थीची तयारी
Donald Trump On Kashmir: काश्मीर प्रश्नावर डोनाल्ड ट्रम्प यांना चिंता; मध्यस्थीची तयारी
उत्तराखंड :  पूरग्रस्त भागात मदत सामुग्री घेऊन जाणाऱ्या हेलिकॉप्टरला अपघात, २ जण ठार 
उत्तराखंड :  पूरग्रस्त भागात मदत सामुग्री घेऊन जाणाऱ्या हेलिकॉप्टरला अपघात, २ जण ठार