गाझियाबादमध्ये ATM सेंटरवर भेटू शकतात बोगस बँकर, फेविक्विक ट्रिक वापरून करतात कार्ड घोटाळा

gang using feviquick and become fake banker to do atm fraud : भारतात उत्तरप्रदेशमधील गाझियाबादमध्ये मोठा फ्रॉड सुरू आहे. काही बदमाश एटीएम सेंटरवर गडबड करून नागरिकांची फसवणूक करत आहेत.

gang using feviquick and become fake banker to do atm fraud
गाझियाबादमध्ये ATM सेंटरवर भेटू शकतात बोगस बँकर  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • गाझियाबादमध्ये ATM सेंटरवर भेटू शकतात बोगस बँकर
  • फेविक्विक ट्रिक वापरून करतात कार्ड घोटाळा
  • फ्रॉडपासून सुरक्षित राहण्यासाठी सोपे उपाय

gang using feviquick and become fake banker to do atm fraud : भारतात उत्तरप्रदेशमधील गाझियाबादमध्ये मोठा फ्रॉड सुरू आहे. काही बदमाश एटीएम सेंटरवर गडबड करून नागरिकांची फसवणूक करत आहेत. बदमाशांनी मोठी आर्थिक फसवणूक केल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पोलिसांनी आणि बँकांनी नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन केले आहे. पोलीस तपास सुरू आहे.

असा सुरू आहे गाझियाबादमध्ये ATM सेंटरवर फ्रॉड

गाझियाबादच्या निवडक एटीएम सेंटर बदमाशांनी हेरून ठेवली आहेत. या सेंटरमधील एटीएममध्ये ज्या ठिकाणी कार्ड टाकतात त्याच ठिकाणी बदमाशांनी थोडे फेविक्विक लावले आहे. दररोज ठराविक वेळाने येऊन बदमाश एटीएममध्ये फेविक्विक लावून जात आहेत. या फेविक्विकमुळे कार्ड मशिनमध्ये टाकताच चिकटते आणि बाहेर काढणे कठीण होते. बदमाशांनी एटीएम सेंटरमध्ये बँकेच्या कागदपत्रांवर स्वतः तयार केलेले बनावट स्टिकर चिकटवले आहेत. या स्टिकरवर एटीएम सेंटरमध्ये अडचण आल्यास संपर्क करण्यासाठी आपत्कालीन नंबर दिला आहे. हा बदमाशांचाच मोबाइल नंबर आहे. कार्ड चिकटताच नागरिक या नंबरवर फोन करतात. बदमाश बोगस बँकर बनून एटीएम सेंटरवर येतात. कार्ड मशिनमधून काढून स्वच्छ करण्याच्या निमित्ताने हातचलाखी करून बदलतात. बँक ग्राहकाला बनावट कार्ड देतात. हे सर्व करत असताना गप्पा मारत आणि बँकेची प्रक्रिया म्हणून माहिती घेत असल्याचे सांगत बदमाश हुशारीने ग्राहकाचा पिन नंबर जाणून घेतात. कार्ड आणि पिन नंबर हाती येताच बदमाशांचे पुढचे काम सोपे होते. ग्राहक एटीएम सेंटरमधून निघून गेल्यावर थोड्याच वेळात त्याच्या खात्यातून मोठी रक्कम काढून बदमाश पळून जातात. जर कार्ड बदलणे जमले नाही तर ग्राहकाकडून घेतलेल्या माहितीचा वापर करून डिजिटल बँकिंगचे पर्याय वापरून पैसे काढून घेतले जातात. 

200 पोलीस कर्मचाऱ्यांकडून 75 तास तपासणी अन् 1.50 कोटींसाठी अपहरण केलेल्या चिमुकल्याची झाली सुखरूप सुटका

किल्ले प्रतापगड येथे अफजल खानचा कोथळा बाहेर काढण्याचा देखावा उभारणार, गडावरील अतिक्रमण हटवल्यावर सरकारचा मोठा निर्णय

फ्रॉडपासून सुरक्षित राहण्यासाठी काय कराल?

शक्यतो कमी वर्दळीच्या ठिकाणचे एटीएम सेंटर वापरू नका. जर एटीएम सेंटरमध्ये कार्ड अडकले तर बँकेच्या अधिकृत हेल्पलाइनवर फोन करा. मदतीसाठी कोणीही आले तरी ते आपल्याकडून पिन नंबर जाणून घेत नाहीत. आपला पिन नंबर कधीही कोणालाही सांगू नका. आपल्या खात्यातून आर्थिक व्यवहार झाला आणि तो आपण केला नसेल, तर लगेच बँकेच्या अधिकृत नंबरवर कॉल करून तक्रार नोंदवा. बँकेतील फ्रॉडची तक्रार लगेच नोंदवली गेली तर ग्राहकाने गमावलेले पैसे बँकेकडून परत दिले जातात. ग्राहकाचे नुकसान टळते.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी