धक्कादायक! महिलेवर सामूहिक बलात्कार करून, अॅसिड पिण्यासाठी केली बळजबरी

लोकल ते ग्लोबल
Updated Oct 11, 2019 | 18:07 IST | टाइम्स नाऊ हिंदी

महिलांवर होणारे अत्याचार काही थांबण्याचं नाव घेत नाहीये. रतलाम येथे एका महिलेवर सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. इतकंच नाही तर या महिलेला अॅसिड पिण्यासाठी बळजबरी केल्याचंही समोर आलं आहे.

gangrape madhya pradesh acid drink crime news
प्रातिनिधीक फोटो  |  फोटो सौजन्य: Getty Images

 इंदूर: मध्यप्रदेशातील रतलाम येथे एका महिलेवर सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिलेच्या पहिल्या पतीने त्याच्या नातेवाईकांसह हे घृणास्पद कृत्य केलं आहे. आरोपींनी सामूहिक बलात्कार केल्यानंतर पीडित महिलेला सिगारेटचे चटके दिले आणि अॅसिड पिण्यासाठी बळजबरी केली. ही घटना शुक्रवारी घडली असून या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेचं गांभीर्य लक्षात घेत पोलिसांनी तात्काळ कारवाई करुन आरोपींना अटक केली आहे.
 
महिलाने दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी सकाळी ही महिला आपल्या दोन वर्षाच्या मुलीसोबत टेलरकडे जात होती. त्याचवेळी आरोपींनी तिचे अपहरण केले. आरोपी दुसरं-तिसरं कोणी नसून तिचा पहिला पती, त्याची बहिण आणि दोन मुलं अशी एकूण पाच जणं असल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, महिलेचं वय २८ वर्षे आहे. घटनेच्या दिवशी आरोपी एका कारमधून आले होते. त्यांनी महिला आणि तिच्या दोन वर्षाच्या मुलीचे अपहरण केले. त्यानंतर, त्यांना एका शेतात घेऊन गेले आणि तिला मारझोड करून आरोपीच्या भाच्यांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. दुसऱ्या दिवशीही प्रचंड मारहाण केली आणि तिला सिगरेटचे चटके दिले. इतकंच नाही तर आरोपींनी महिलेला अॅसिड पिण्यास बळजबरी केली. या घटनेनंतर आरोपींनी पीडित महिलेला कारमधून रस्त्यावर फेकून दिले आणि आरोपी फरार झाले.
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या संपूर्ण घटनेनंतर पीडित महिला बेशुद्ध अवस्थेत होती. त्यानंतर तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. महिलेची चौकशी केली असता समोर आले की, या महिलेने आपल्या पहिल्या पतीसोबत ८ वर्षांपूर्वी लग्न केलं होतं. या महिलेला त्यावेळी दोन मुलं होती. मागील एक वर्षापूर्वीच या महिलेने तिने पहिल्या पतीला सोडलं आणि दुसरं लग्न केलं होतं. त्यामुळेच, रागाच्या भरात या आरोपीने हे कृत्य केल्याचं समोर आलं आहे. पीडित महिलेच्या चौकशीनंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत पाच आरोपींपैकी चार आरोपींना अटक केली आहे. तर एका फरार आरोपीचा शोध सुरु आहे.

 

 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी