१५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर हॉटेलमध्ये तीन तरूणांचा बलात्कार

लोकल ते ग्लोबल
Updated Feb 22, 2021 | 19:21 IST | टाइम्स नाऊ मराठी

तीन्ही आरोपींची ओळख सूरज साव, कृष्ण कुमार आणि श्रवण गोस्वामी अशी झाली आहे. या तिघांनी एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला.

gangrape
१५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर हॉटेलमध्ये तीन तरूणांचा बलात्कार 

थोडं पण कामाचं

  • पाटणामध्ये १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर हॉटेलमध्ये बलात्कार
  • आईच्या ओरडण्याने नाराज होऊन घराबाहेर पडली होती मुलगी
  • महिला पोलीस ठाण्यात केस झाली दाखल

पाटणा: राजधानी पाटणा(patna) येथे एका अल्पवयीन मुलीवर हॉटेलच्या रूममध्ये एका गँगरेप(gangrape) झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पीडित मुलीने तीन मुलांनी हॉटेलच्या रूममध्ये सामूहिक बलात्कार केल्याचा आरोप केला आहे. ही धक्कादायक घटना राजधानीच्या दीघा ठाणे परिसरातील आहे. पीडितेच्या तक्रारीनुसार महिला पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर पोलिसांनी तपासाला सुरूवात केली आहे. 

आईच्या ओरडण्याने नाराज झाली होती पिडीत मुलगी

महिला ठाणेच्या एसएचओ आरती कुमारी जायसवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलीला शनिवारी तिची आई ओरडली होती. त्यानंतर तिने रागात घर सोडले.यातच तीन  तरूणांनी तिला एकटीला पाहिले आणि तिला आपल्यासोबत येण्यास सांगितले. यानंतर हे तीनही तरूण त्या अल्पवयीन मुलीला घेऊन एका हॉटेलमध्ये घेऊन गेले आणि तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. 

पोलिसांकडून तिघांविरोधात एफआयआर दाखल

महिला एचएसओ यांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलीच्या ओरडण्याने हॉटेलचे कर्मचारी अलर्ट झाली. यानंतर तेथून आरोपी लगेचच फरार झाले, तीनही आरोपींची ओळख सूरज साव,कृष्ण कुमार आणि श्रवण गोस्वामी अशी आहे. आरोपी सूरज आणि कृष्ण हे दोघे भाऊ आहेत. तर श्रवण त्यांचा मित्र आहे. 

पोलिसांकडून आरोपींचा तपास सुरू

या दरम्यान पीडित मुलगी आपल्या घरी परतली. महिला एचएसओने सांगितले की अल्पवयीन मुलीला मेडिकल तपासणीसाठी बोलावले आहे. त्यांनी सांगितले की न्यायिक मॅजिस्ट्रेटसमोर मुलीचे विधान घेतले जाईल. 


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी