छोटा राजन आणि रवी पुजारीसोबत काम केलेल्या गँगस्टर सुरेश पुजारीला फिलिपीन्सहून भारतात आणले

Gangster Suresh Pujari deported to India from Philippines, Mumbai Police to get custody soon गँगस्टर सुरेश पुजारी याला फिलिपीन्सहून भारतात आणले आहे. सुरेश पुजारीला ऑक्टोबर २०२१ मध्ये फिलिपीन्समध्ये अटक झाली होती. भारताच्या मागणीनंतर फिलिपीन्समधून सुरेश पुजारीला हस्तांतरित करण्यात आले. 

Gangster Suresh Pujari deported to India from Philippines, Mumbai Police to get custody soon
गँगस्टर सुरेश पुजारीला फिलिपीन्सहून भारतात आणले 
थोडं पण कामाचं
  • गँगस्टर सुरेश पुजारीला फिलिपीन्सहून भारतात आणले
  • सुरेश पुजारीला ऑक्टोबर २०२१ मध्ये फिलिपीन्समध्ये अटक झाली होती
  • भारताच्या मागणीनंतर फिलिपीन्समधून सुरेश पुजारीला हस्तांतरित करण्यात आले

Gangster Suresh Pujari deported to India from Philippines, Mumbai Police to get custody soon नवी दिल्ली: गँगस्टर सुरेश पुजारी याला फिलिपीन्सहून भारतात आणले आहे. सुरेश पुजारीला ऑक्टोबर २०२१ मध्ये फिलिपीन्समध्ये अटक झाली होती. भारताच्या मागणीनंतर फिलिपीन्समधून सुरेश पुजारीला हस्तांतरित करण्यात आले. 

मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवलीमध्ये सुरेश पुजारी विरोधात अनेक गुन्हे दाखल आहेत. खंडणी प्रकरणात तो महाराष्ट्रात तसेच कर्नाटकमध्ये वाँटेड आहे. आयबी आणि सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी संयुक्तपणे दिल्ली विमानतळावर सुरेश पुजारीचा ताबा घेतला. केंद्रीय संस्थांची चौकशी पूर्ण झाल्यानंतर सुरेश पुजारीचा ताबा मुंबई पोलिसांना दिला जाणार आहे. सुरेश पुजारीचा ताबा घेण्यासाठी मुंबई पोलिसांची टीम दिल्लीत दाखल झाली आहे. 

खंडणीच्या प्रकरणांमध्ये मुंबई आणि ठाणे पोलिसांनी राज्याच्या गृह खात्यामार्फत केंद्रीय गृह खात्याशी संपर्क साधला होता. सुरेश पुजारी विरोधात २०१७ आणि २०१८ मधील खंडणीच्या प्रकरणात नोटीस काढण्याची मागणी पोलिसांनी केली. केंद्रीय गृह खात्याने इंटरपोलशी समन्वय साधून सुरेश पुजारी विरोधात रेड कॉर्नर नोटीस काढली होती. 

सुरेश पुजारी मागील १५ वर्षांपासून फरार होता. तो त्याच्या हस्तकांकरवी खंडणी वसुलीचे उद्योग करत होता. आवश्यकता भासल्यास फोन करुन धमकावण्याचे उद्योग करत होता. ऑक्टोबर २०२१ मध्ये फिलिपीन्समध्ये सुरेश पुजारीला अटक झाली. अटक झाली त्यावेळी ठाणे पोलिसांकडे सुरेश पुजारी विरोधात जबरदस्ती वसुली केल्याप्रकरणी २३ गुन्हे दाखल झाले होते. 

सुरेश पुजारी हा डॉन रवी पुजारी याचा नातलग आहे. रवी पुजारीपासून सुरेश २००७ मध्ये  वेगळा झाला आणि स्वतंत्रपणे त्याची गँग चालवू लागला. परदेशात राहून महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या निवडक भागांमध्ये हस्तकांकरवी खंडणी वसुली करत होता. काही काळ सुरेश पुजारीने छोटा राजन गँगसाठी काम केले होते.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी