Jodhpur News: जोधपूरच्या (JODHPUR) शेरगडमध्ये (Shergarh)लग्न सोहळ्यादरम्यान (wedding ceremony) मोठी दुर्घटना घडली. येथे गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याने 60 जण होरपळले आहेत. काही ग्रामस्थांच्या प्रयत्नाने आग आटोक्यात आणली आहे. ग्रामस्थांनी आगीत अडकलेल्या लोकांना बाहेर काढून रुग्णालयात दाखल केले. या दुर्घटनेत नवरदेवाचे आई-वडील आणि बहिण होरपळली आहे. नवरदेवाच्या बहिणीची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत असून 5 जणांचा भाजून मृत्यू झाला आहे. (Gas cylinder explosion during wedding ceremony, 60 people burned )
अधिक वाचा : बापरे, तिखट खाल्ल्यामुळे शिंक येऊन तुटल्या 4 बरगड्या
मिळालेल्या माहितीनुसार, जोधपूरच्या शेरगड विधानसभा मतदारसंघातील भुंगरा गावात एका लग्न समारंभाच्या आयोजनादरम्यान स्वंयपाकीजवळ असलेल्या गॅस सिलिंडरचा स्फोट झाला.या गॅस सिलिंडरचा स्फोटामुळे घरात उपस्थित असलेल्या 60 महिला, पुरुष आणि लहान मुले होरपळली.अचानक सिलिंडरचा स्फोट झाल्याने लग्नसमारंभात गोंधळ उडाला. आगीत होरपळलेल्या लोकांनी आरडाओरडा करून स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न सुरू केला. त्या लोकांचा आवाज ऐकून तेथील ग्रामस्थांनी आग आटोक्यात आणली. तसेच आगीत अडकलेल्या लोकांना बाहेर काढून रुग्णालयात नेण्यात आले.
अधिक वाचा : हत्येप्रकरणी नगरमधून 73 वर्षांच्या वृद्धाला अटक
या घटनेची माहिती मिळताच जिल्हाधिकारी हिमांशू गुप्ता आणि ग्रामीण एसपी अनिल कायल घटनास्थळी रवाना झाले. जोधपूरच्या महात्मा गांधी रुग्णालयाला अलर्ट मोडवर ठेवण्यात आले आहे. रुग्णवाहिका येण्यास कोणतीही अडचण येणार नाही यासाठी पोलिसांनी वाहतूक व्यवस्था सुरळीत केली.
जोधपूरचे जिल्हाधिकारी हिमांशू गुप्ता यांनी या घटनेविषयी विस्तृत माहिती दिली. त्यांनी सांगितले की, आज शेरगडच्या भुंगरा गावात तगतसिंगच्या मुलाच्या लग्नाच्या मिरवणुकीची तयारी सुरू होती, घरात पाहुणे उपस्थित होते.लग्नसमारंभात स्वयंपाक करण्यासाठी 20 गॅस सिलिंडर मागवून ते घरात ठेवल्याचे होते.
अधिक वाचा : दीपिका-रणवीर की केमिस्ट्री चाहत्यांना लागला करंट
यापैकी एक सिलिंडर हा एका स्वंयपाकीजवळ ठेवला होता. त्याचा आधी स्फोट झाला त्यानंतर इतर पाच सिलिंडरचा स्फोट झाला. या गॅस सिलिंडरचा अचानक स्फोट झाल्याने 60 जण या आगीत अडकले. गंभीररित्या भाजलेल्या 42 महिला, पुरुष आणि मुलांना जोधपूरच्या महात्मा गांधी रुग्णालयात आणण्यात आले. तेथे सज्ज असलेल्या वैद्यकीय पथकाने त्यांच्यावर उपचार सुरू केले आहेत.जिल्हाधिकार्यांनी सांगितले की, ही घटना अत्यंत दु:खद आणि वेदनादायी आहे. 8 ते 10 महिला, मुले आणि पुरुष 90 टक्के भाजले आहेत.त्याचबरोबर ३० महिला, पुरुष आणि मुले 50 ते 70 टक्के भाजली आहेत. शेरगड तहसीलच्या रुग्णालयात 18 जणांवर प्राथमिक उपचार करण्यात येत आहेत.
या दुर्घटनेत नवरदेव सुरेंद्र सिंग यांचे वडील तगत सिंग, आई दाखू कवर, आणि बहीण रसाल कंवर हे आगीत होरपळले आहेत. यांच्यासह इतर 60 जण या आगीत होरपळले आहेत. तसेच यात दोन मुलांचा मृत्यू झाला आहे. एपी सिंग वय वर्ष 5, आणि रतन सिंग वय वर्ष 7 अशी या मुलांची नावे आहेत.