Serial Woman Burglar : विमानाने जाऊन करायची चोऱ्या, 100 गुन्हे केल्यावर भरला पापांचा घडा

चोरीसाठी विमानाने प्रवास करणारी, मोलकरीण म्हणून विश्वास संपादन करून दागदागिने लुटणारी एक महिला अखेर पोलिसांना सापडली आहे. तिची चोऱ्या करण्याची पद्धत पाहून पोलिसांनाही आश्चर्य वाटत आहे.

Serial Woman Burglar
विमानाने जाऊन चोरी करणारी महिला गजाआड  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • मोलकरीण बनून करायची चोऱ्या
  • शंभरहून अधिक कुटुंबांना लुटले
  • चोरीसाठी विमानाने करायची प्रवास

Serial Woman Burglar : आतापर्यंत शंभरपेक्षा जास्त घरांमध्ये चोऱ्या (More than 100 thefts) करून लाखो रुपयांची संपत्ती गोळा केलेल्या सराईत चोरट्या महिलेला (Burglar woman) गाझियाबाद पोलिसांनी (Gaziabad Police) अटक (Arrested) केली आहे. आपल्या हटके पद्धतीच्या चोरीसाठी ही महिला कुप्रसिद्ध होती. श्रीमंत कुटुंबं पाहून त्यांच्याकडे कामवाली बाई म्हणून ही महिला जात असे. काही दिवस काम केल्यावर मालकांचा विश्वास संपादन करणे आणि संधीचा फायदा घेत घरातील दागदागिने लुटून पोबारा करणे असा तिचा चोरी करण्याचा प्रकार होता. मात्र नुकत्याच केलेल्या चोरीनंतर पोलिसांना तिचे धागेदोरे मिळाले आणि तिला अटक करण्यात आली. महिलेनं आजवर चोरी केलेली संपत्ती आणि त्यातील काही संपत्तीतून विकत घेतलेली मालमत्ताही जप्त होणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. 

विमानाने प्रवास

या महिलेचं नाव पूनम शाह ऊर्फ काजल आहे. दिल्ली एनसीआर भागात तिने बहुतांश चोऱ्या केल्या आहेत. दिल्लीबाहेरही काही शहरांत तिने चोऱ्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. जेव्हा जेव्हा दिल्लीबाहेर जाण्याचा प्रसंग येई, तेव्हा महिला विमानाने प्रवास करत असल्याची माहिती समोर आली आहे. चोरीसाठी जाताना आणि चोरी करून परत येताना तिने नेहमीच विमान प्रवासाचा मार्ग निवडला होता. मात्र नुकत्याच केलेल्या एका चोरीनंतर मात्र तिचं बिंग फुटलं. 

साथीदारासोबत केली चोरी

काजलनं तिचा साथीदार बंटी याच्यासोबत विपुल गोयल यांच्या घरी जबरी चोरी केल्याचं उघड झालं. विपुल गोयल यांच्याकडे काजल आणि बंटी हे घरगडी म्हणून काम करत होते. अगोदर काजल या नोकरीवर रुजू झाली आणि दुसऱ्या नोकराची गरज असल्याचं लक्षात येताच तिने बंटीची तिथं वर्णी लावली. घटनेच्या दिवशी गोयल यांची पत्नी एकटीच घरी होती. ही संधी साधत काजलने त्यांना बोलण्यात गुंतवलं आणि बंटीने बेडरुममध्ये कचरा काढण्याच्या बहाण्याने चोरी केली. कपाटातील लॉकरमध्ये असणारे लाखो रुपये किंमतीचे दागिने त्याने लंपास केले. त्यानंतर  दोघांनी हे दागिने अर्धेअर्धे वाटून घेतले होते. 

अधिक वाचा - Bihar Politics: बिहारमध्ये सरकारी बैठकीत ‘मेहुण्याचा’ मानपान, तेजप्रताप यांच्यासोबत मीसा भारतींचे पती

सीसीटीव्ही फूटेजमुळे पकडली चोरी

गोयल यांनी आपल्या घरी चोरी झाल्याची तक्रार नोंदवली होती. चोरीच्या घटनेपासून काजल आणि बंटी यांनी कामाकडे पाठ फिरवल्याचंही पोलिसांना सांगितलं होतं. त्यामुळे पोलिसांना काजल आणि बंटीवरच प्राथमिक संशय होता. गोयल यांच्या घराच्या परिसरातील सीसीटीव्ही फूटेज पोलिसांना सापडलं आणि त्यात काजल आणि बंटी चोरी कऱत असल्याचे पुरावे त्यांना मिळाले. त्या आधारावर पोलिसांनी काजलला अटक केली.

अधिक वाचा - दिल्लीचे उपमुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे नेते मनीष सिसोदिया यांच्या घरावर CBIची धाड

दिल्लीत घेतला प्लॉट

चोरीच्या पैशातून या महिलेने दिल्लीत एक प्लॉट खरेदी केला होता. त्यावर एक अलिशान घरही तिने बांधलं होतं. चोरीच्या पैशातून ही महिला ऐशोआरामात राहत होती. मात्र आता ही सर्व संपत्ती जप्त होणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. साथीदार बंटी आणि इतर आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी