Crime News: मित्राच्या बर्थडे पार्टीला गेलेल्या तरूणीसोबत घडला घृणास्पद प्रकार, ऐकून अंगावर येईल काटा

लोकल ते ग्लोबल
Pooja Vichare
Updated Aug 17, 2022 | 10:36 IST

Ghaziabad News: पार्टीच्या वेळी तीन मुलांनी मिळून पीडितेसोबत ही घृणास्पद घटना घडवल्याचे पोलिसांनी सांगितलं आहे. पीडित तरूणी एका खासगी कंपनीत काम करते.

Rape Case
तरूणीवर सामूहिक बलात्कार 
थोडं पण कामाचं
  • ही तरूणी तिच्या मित्राच्या बर्थडे पार्टीला (Birthday Party) गेली होती.
  • पार्टीच्या वेळी तीन मुलांनी मिळून पीडितेसोबत ही घृणास्पद घटना घडवल्याचे पोलिसांनी सांगितलं आहे.
  • पीडित तरूणी एका खासगी कंपनीत काम करते.

गाझियाबाद:  Ghaziabad Crime News: गाझियाबादमध्ये (Ghaziabad) 19 वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार  (Gang Raped) झाल्याची घटना समोर आली आहे. ही तरूणी तिच्या मित्राच्या बर्थडे पार्टीला (Birthday Party) गेली होती. त्यावेळी ही घटना घडल्याचं सांगितले जात आहे. पार्टीच्या वेळी तीन मुलांनी मिळून पीडितेसोबत ही घृणास्पद घटना घडवल्याचे पोलिसांनी सांगितलं आहे. पीडित तरूणी एका खासगी कंपनीत काम करते. गेल्या रविवारी पीडिता बथर्ड पार्टीला गेली होती. याठिकाणी  तरुणीच्या ड्रिंकमध्ये नशेची पदार्थ मिसळला होता.

गाझियाबाद शहरातील मोदीनगर भागात ही घटना घडली आहे. ही तरूणी एका खासगी कंपनीत काम करते, असे पोलिसांनी सांगितलं आहे. रविवारी ती बर्थडे पार्टीला आली होती आणि पार्टीदरम्यान कोणीतरी तिच्या ड्रिंकमध्ये नशा मिसळलं. तरूणी बेशुद्ध पडल्यावर एका तरूणानं तिला खोलीत नेले आणि नंतर मित्रांना बोलावलं. आरोपींनी एका खोलीत पीडितेवर बलात्कार केला. तरूणी शुद्धीवर आल्यानंतर तिने विरोध केला.

अधिक वाचा- 'या' चार राशींसाठी पुढचे 140 दिवस सुखाचा काळ, होईल कल्याण

आरोपीकडून तरूणीला मारहाण

बलात्कारादरम्यान तरूणी शुद्धीवर येऊ लागली तेव्हा तिने आरोपीशी भांडण करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर आरोपीने तिला मारहाण केली आणि याबाबत दुसऱ्या कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. तरूणीवर बलात्कार केल्यानंतर सर्व आरोपी तेथून पळून गेल्याचं पोलिसांनी सांगितलं.

घटनेनंतर तरूणीनं घरी पोहोचून घरच्यांना हा घडलेला सर्व प्रकार सांगितला. दुसऱ्या दिवशी सोमवारी तरुणीने तिच्या कुटुंबीयांसह मोदी नगर पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली.

मेडिकल तपासणी

पोलिसांनी पीडित महिलेची मेडिकल तपासणी केली. ज्यामध्ये तिच्यावर बलात्कार झाल्याची पुष्टी झाली. पोलिसांनी तिन्ही आरोपींना अटक केली आहे. एसपी (ग्रामीण), इराज राजा यांनी वृत्तसंस्था पीटीआयला सांगितलं की शेखर, कृष्णा आणि अर्जुन अशी तीन आरोपींची ओळख पटली आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी