वृद्ध शेजाऱ्याचा कुऱ्हाडीने कापला गळा; कापलेलं मुंडकं हातात घेऊन भररस्त्यात फिरू लागला मारेकरी

उत्तर प्रदेशातील गाझियाबादमध्ये अंगात थरकाप भरवणारी  घटना घडली आहे. येथील एका 35 वर्षीय व्यक्तीने जादूटोणा करणारा मांत्रिक  असल्याच्या संशयातून  एका 65 वर्षाच्या वृद्ध व्यक्तीचा गळा कापत खून केला.

Man axes elderly neighbor to death
वृद्ध शेजाऱ्याचा कुऱ्हाडीने कापला गळा  |  फोटो सौजन्य: Times Now

थोडं पण कामाचं

  • मांत्रिक असल्याच्या संशयातून वृद्ध व्यक्तीचा कापला गळा
  • एका 35 वर्षीय व्यक्तीने जादूटोणा करणारा मांत्रिक असल्याच्या संशयाने एका 65 वर्षाच्या वृद्ध व्यक्तीचा खून केला.
  • हातात कापलेलं मुंडकं घेऊन फिरत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

गाझियाबाद : उत्तर प्रदेशातील गाझियाबादमध्ये अंगात थरकाप भरवणारी  घटना घडली आहे. येथील एका 35 वर्षीय व्यक्तीने जादूटोणा करणारा मांत्रिक असल्याच्या संशयातून  एका 65 वर्षाच्या वृद्ध व्यक्तीचा गळा कापत खून केला. वृद्ध व्यक्ती 35 वर्षीय आरोपीच्या घराशेजारी राहत होती, आरोपीने 65 वर्षाच्या वृद्ध व्यक्तीचा कुऱ्हाडीने गळा कापला आणि ते कापलेलं मुंडकं हातात घेऊन आरोपी भररस्त्यात फिरू लागला. यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण पसरलेलं आहे. 

विकृत मारेकरी कापलेलं मुंडकं हातात घेऊन रस्त्यावर फिरण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.  या व्हायरल व्हिडिओच्या आधारे पोलिसांनी विकृत मारेकऱ्याला अटक केली आहे. पोलिसांनी दिेलेल्या माहितीनुसार, मारेकऱ्याचे नाव माधव गोंड असून माधव हा छऊरा गावातील रहिवाशी आहे. माधव गोंडचे त्याच्या शेजारी राहणारे 65 वर्षीय करण सिंह यांच्याशी नेहमी वाद होत असायचे. करण सिंह हे जादूटोणा करणारे असल्याचा संशय माधव गोंडला  होता. माधवने आरोप केला आहे की, ''सिंह हे हेतूपूर्वक आपल्या शेतात जनावरे आणि डुकरे पीक उद्धवस्त करण्यासाठी सोडत. डुकरे अस्पृश्य मानले जात असल्याने  आरोपी  माधवने सर्व परिसर स्वच्छ केला. यामुळे दोघांमध्ये वाद झाला होता,'' असं वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने दिले आहे.  

सोमवारी सांयकाळी परत तशीच घटना घडल्याने गोंड यांनी रागाच्या भरात  कुऱ्हाडीने सिंह यांच्यावर हल्ला केला. त्यानंतर हातात कापलेलं मुंडकं घेऊन तो भररस्त्यात फिरू लागला, यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरलं आहे. या भयाण घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर पसरल्यानंतर पोलिसांनी गोंड यांच्यावर अटकेची कारवाई केली. पोलिसांनी गोंड यांच्याविरुद्धात कलम IPC Section 302नुसार हत्याचा गुन्हा नोंदवला आहे.

कर्नाटकात 26 वर्षीय महिलेची हत्या

दरम्यान कर्नाटकातील बंगळुरूमध्ये एका युवतीचा खून झाल्याची घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 40 वर्षीय महिला आणि 37 वर्षाच्या प्रियकराने आपल्या शेजारील एका 26 वर्षीय महिलेचा खून केला. दोघांनी  या हत्येला आत्महत्येचं रुप देण्याचा प्रयत्न केला, परंतु ते दोघे यात अपयशी ठरले. 40 वर्षीय महिला आणि 37 वर्षाचा प्रियकर आपल्यावरील कर्ज फेडण्यासाठी सोन्याची साखळी चोरण्याचा प्रयत्न करत होते. दरम्यान पोलिसांनी मृत महिलेची ओळख पटवली असून तिचं नाव रंजिता आहे. 
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी