नवी दिल्ली: काँग्रेस पक्ष (Congress party) सोडल्यानंतर काँग्रेसचे (Congress) माजी नेते गुलाम नवी आझाद (Ghulam Navi Azad) यांनी राहुल गांधींवर (Rahul Gandhi) जोरदार हल्ला चढवला आहे. पंतप्रधान मोदींची (Prime Minister Modi) भेट घेतल्याने राहुल गांधी आणि पक्षातील इतर नेते गुलाम नवी आझाद यांच्यावर नाराज होते. या टिकेचा समाचार आझाद यांनी आज घेतलाय. ते म्हणाले की, जे लोक माझ्याशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीवरुन टीका करतात, ते लोकसभेत भाषण दिल्यानंतर त्यांचे नेते पंतप्रधानांना मिठी मारायला गेले होते हे ते विसरले आहेत. मी स्वतःकाँग्रेस सोडलेली नाही, पण मला घर सोडायला लावले, आरोप गुलाम नवी आझाद यांनी केलाय. (Ghulam Nabi Azad criticizes Rahul Gandhi after leaving Cogress party)
काँग्रेस सोडण्याच्या प्रश्नावर आझाद म्हणाले की, कोण स्वतः घर सोडतो. माझ्या कुटुंबीयांनी मला काँग्रेस सोडण्यास भाग पाडले. जेव्हा घरच्यांना वाटतं की हा माणूस नको आहे. इथे जर आपण परके मानले जात असेल तर इथून निघून जाणे हे घरात राहणाऱ्या माणसाचे काम आहे. सगळ्यात खेदाची गोष्ट म्हणजे खुशामत करणाऱ्या किंवा ट्विट करणाऱ्यांना पक्षात स्थान मिळाल्याची टीका देखील त्यांनी यावेळी केलीय.
आझाद म्हणाले की, जे लोक माझा डीएनए मोदी वाला असल्याचे म्हणतात, त्यांनी आधी बघावं. आझाद म्हणाले की, ज्या पंतप्रधान मोदींनी काँग्रेस मुक्त भारतचा अजेडा सुरू केलाय. त्यांचीच राहुल गांधींनी गळाभेट घेत काँग्रेस मुक्त भारत बनवण्यात मदत केली. राहुल यांची खिल्ली उडवत आझाद म्हणाले की, लोकसभेत काँग्रेसविरुद्धात बोलणाऱ्या मोदींनामिठी मारून राहुल गांधी सांगतात की आमच्या मनात तुमच्यासाठी काहीही नाही.
Read Also : Kidney Stoneआणि डिप्रेशनचा त्रास नको तर करा हे उपाय
यावेळी आझाद यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेही कौतुक केले. ते म्हणाले की, ज्यांना पीएम मोदींच्या राज्यसभेतील भाषण करताना दिसते ते योग्य नाही. कोणी इतका अशिक्षित आणि अडाणी असेल तर त्याने मोदींचे भाषण वाचावे. मोदी साहेबांचे लग्न झाले नाही, मुले झाली नाहीत.. मी त्यांना खूप क्रूर माणूस मानत होतो. पण त्याने माणुसकी दाखवली आहे.
Read Also : तिन्ही फॉर्मेटमध्ये 100सामने खेळणारा विराट पहिला भारतीय
काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी परदेशात असताना तुम्ही राजीनामा दिला असा प्रश्न आझाद यांना विचारला असता, आझाद म्हणाले, ईश्वराचे आभारी आहे की सोनियाजी चांगल्या आहेत. काल त्यांनी काँग्रेस कार्यकारिणीच्या (CWC) बैठकीचे अध्यक्षस्थान केले. देवाचे आभार मानतो की त्या बऱ्या आणि निरोगी आहेत.