गुलाम नबी आझाद यांनी जम्मू-काश्मीर काँग्रेसच्या प्रचार समितीच्या अध्यक्षपदाचा दिला राजीनामा, होते G23 गटाचे प्रमुख सदस्य

गुलाम नबी आझाद (Ghulam Nabi Azad ) यांनी जम्मू-काश्मीर (ammu and Kashmir ) काँग्रेसच्या प्रचार समितीच्या (Congress campaign committee) अध्यक्षपदाचा (chairman ) राजीनामा (resign) दिला आहे. त्यांची आजच या पदावर नियुक्ती करण्यात आली होती. जम्मू-काश्मीरमधील पक्षाच्या राजकीय व्यवहार समितीच्या सदस्यत्वाचाही त्यांनी राजीनामा दिला आहे. गुलाम नबी आझाद यांच्या राजीनाम्याच्या देण्याबाबत स्पष्टपणे काहीही सांगण्यात आलेले नाही.

Ghulam Nabi Azad resigns
गुलाम नबी आझाद यांनी काँग्रेस पक्षानं दिलेली जबाबदारी सोडली  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • सोनियांनी गुलाम अहमद मीर यांचा प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा स्वीकारला आणि त्यांच्या जागी रसूल वानी यांची अध्यक्षपदी नियुक्ती केली.
  • आझाद हे काँग्रेसच्या G23 गटाचे प्रमुख सदस्य आहेत.
  • या नव्या नियुक्त्यांमुळे काँग्रेस हायकमांड आणि आझाद यांच्यातील संबंध सुधारल्याचे मानले जात होते.

नवी दिल्ली: गुलाम नबी आझाद (Ghulam Nabi Azad ) यांनी जम्मू-काश्मीर (ammu and Kashmir ) काँग्रेसच्या प्रचार समितीच्या (Congress campaign committee) अध्यक्षपदाचा (chairman ) राजीनामा (resign) दिला आहे. त्यांची आजच या पदावर नियुक्ती करण्यात आली होती. जम्मू-काश्मीरमधील पक्षाच्या राजकीय व्यवहार समितीच्या सदस्यत्वाचाही त्यांनी राजीनामा दिला आहे. गुलाम नबी आझाद यांच्या राजीनाम्याच्या देण्याबाबत स्पष्टपणे काहीही सांगण्यात आलेले नाही. विशेष म्हणजे, काँग्रेसने मंगळवारी गुलाम नबी आझाद यांचे निकटवर्तीय मानले जाणारे वकार रसूल वानी यांची जम्मू-काश्मीर युनिटचे नवे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. 

पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांनी ही महत्त्वाची जबाबदारी ४७ वर्षीय वानी आणि ७३ वर्षीय ज्येष्ठ नेते आझाद यांना निवडणूक प्रचार समितीचे प्रमुख म्हणून दिली होती. काँग्रेसचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांनी जारी केलेल्या प्रसिद्धीनुसार, सोनिया गांधी यांनी जम्मू आणि काश्मीर काँग्रेस समितीसाठी निवडणूक प्रचार समिती आणि राजकीय व्यवहार समिती (पीएसी) यासह सात समित्याही स्थापन केल्या होत्या.वेणुगोपाल म्हणाले होते की, सोनियांनी गुलाम अहमद मीर यांचा प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा स्वीकारला आणि त्यांच्या जागी रसूल वानी यांची अध्यक्षपदी नियुक्ती केली.

Read Also : Monsoon Session : अधिवेशनात शिंदे सरकारला विरोधक रडवणार

आझाद यांच्या जवळचे मानले जाणारे, वानी हे राज्य काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत आणि बनिहालचे आमदार आहेत.आझाद हे काँग्रेसच्या G23 गटाचे प्रमुख सदस्य आहेत. या नव्या नियुक्त्यांमुळे काँग्रेस हायकमांड आणि आझाद यांच्यातील संबंध सुधारल्याचे मानले जात होते.  आझाद यांनी 15 ऑगस्ट रोजी राहुल गांधींसोबत "आझादी गौरव यात्रेत" देखील भाग घेतला होता, परंतु त्याच दरम्यान त्यांच्या राजीनाम्याच्या वृत्ताने सर्वांनाच धक्का बसला आहे.

Read Also : लक्ष्मी माताला प्रसन्न करायचे असेल तर करा हे उपाय

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी