धक्कादायक... ११वीच्या विद्यार्थीनीवर चालत्या कारमध्ये सामूहिक बलात्कार 

Girl gang-raped in moving car: ११वीच्या विद्यार्थीनीचं अपहरण करुन तिच्यावर चालत्या कारमध्ये सामूहिक बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. आरोपींनी पीडित मुलीला आधी दारू पाजून बेशुद्ध केलं होतं. 

girl gang raped moving car haryana crime news marathi
प्रातिनिधीक फोटो  |  फोटो सौजन्य: Representative Image

नवी दिल्ली: हरियाणातील पानीपत येथे एका अल्पवयीन मुलीचं अपहरण करुन तिच्यावर चालत्या कारमध्ये सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शुक्रवारी ही घटना घडली आहे. दोन जणांनी मिळून पीडित विद्यार्थीनीचं अपहरण केलं आणि त्यानंतर चालत्या कारमध्ये तिच्यावर सामूहिक बलात्कार करुन बेशुद्धावस्थेत अज्ञातस्थळी सोडून पळ काढला.

पीडित मुलगी ही ११वीची विद्यार्थीनी आहे. ही मुलगी ट्यूशनसाठी गेली होती आणि संध्याकाळी सहा वाजता ट्यूशन संपल्यावर घरी न पोहोचल्याने घरातील सदस्यांनी तिचा शोध सुरु केला. बराचवेळ शोध घेतल्यानंतरही मुलगी न सापडल्याने तिच्या कुटुंबियांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. 

पोलिसांत तक्रार केल्यानंतर काही वेळाने कुटुंबियांना माहिती मिळाली की त्यांची मुलगी एका ठिकाणी बेशुद्धावस्थेत आढळली. या प्रकरणी पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे. तसेच त्यांची कारही जप्त करण्यात आली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, एका आरोपीने पीडित मुलीला कॉल करुन पार्कमध्ये बोलवलं होतं. हा आरोपी पार्कमध्ये बसून आपल्या दुसऱ्या मित्रासोबत दारू पित होता. ज्यावेळी ही मुलगी पार्कमध्ये पोहोचली तेव्हा आरोपींनी तिला दारू ऑफर केली. यानंतर आरोपींनी तिला दारू पाजली आणि त्यानंतर ती बेशुद्ध झाली. याचाच फायदा आरोपींनी घेतला. 

आरोपींनी तिला आपल्यासोबत कारमध्ये नेलं आणि तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. यानंतर आरोपींनी तिला पार्किंग परिसरात सोडलं ज्या ठिकाणी तिची स्कूटी होती. या घटनेप्रकरणी पानीपत पोलिसांनी पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला असून दोन्ही आरोपींना अटक केली आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी