आधी मैत्री नंतर शारीरिक संबध; तरुणीने केली तब्बल ४० लाखांची मागणी 

लोकल ते ग्लोबल
Updated Sep 15, 2019 | 09:40 IST | टाइम्स नाऊ मराठी

Crime: उत्तरप्रदेशमधील एका तरुणीला गुरुग्राम पोलिसांनी हनी ट्रॅप प्रकरणात अटक केली आहे. आरोपी युवतीने एका वर्कशॉप मालकाशी मैत्री करुन त्याच्यासोबत संबंध प्रस्थापित करत त्याला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला.

honeytrap
प्रातिनिधिक फोटो 

थोडं पण कामाचं

  • आरोपी तरुणीने सर्वात आधी वर्कशॉप मालकाशी मैत्री केली आणि नंतर शारीरिक संबंध ठेवले 
  • यानंतर तरुणीने वर्कशॉप मालकाकडे थेट ४० लाख रुपयांची मागणी केली
  • आरोपी तरुणी गुरुग्राममध्ये पेइंग गेस्ट (पीजी) हाऊस चालविते

गुरुग्राम: हनी ट्रॅप प्रकरणी गुरुग्राम पोलिसांनी एका २४ वर्षीय तरुणीला अटक केली आहे. पोलिसांनी याबाबत अशी माहिती दिली आहे की, उत्तर प्रदेशमध्ये राहणारी एक तरुणी एका ऑटोमोबाइल वर्कशॉपच्या मालकाला ४० लाख रुपयांसाठी ब्लॅकमेल करत होती. आरोपी तरुणी ही गुरुग्राममध्ये एक पेइंग गेस्ट (पीजी) हाऊस चालविते. या पीजी हाऊसजवळच पीडित व्यक्तीचं वर्कशॉप आहे. 

याचविषयी अधिक माहिती देताना पोलिसांनी असं सांगितलं की, आरोपी तरुणीने सुरुवातीला वर्कशॉप मालकाशी मैत्री केली आणि त्यानंतर त्याच्याशी शारीरिक संबंध ठेवले. याच वेळी आरोपी तरुणीने वर्कशॉप मालकाशी शारीरिक संबंध ठेवत असताना त्याचे फोटो आणि व्हिडिओ देखील शूट केलं. यानंतर तरुणीने वर्कशॉप मालकाला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न सुरु केला. तिने त्याच्याकडे तब्बल ४० लाख रुपयांची मागणी केली. जर तू हे पैसे दिले नाहीस तर हे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करेन अशी धमकीही तरुणीने त्याला दिली. याशिवाय आपण पोलिसात जाऊन लैंगिक अत्याचार केल्याची तक्रार दाखल करु. अशी धमकीही तिने वर्कशॉप मालकाला दिली. 

वर्कशॉप मालकाने आपण एकाच वेळी ४० लाख रुपये देऊ शकत नसल्याचं तरुणीला सांगितलं. त्यावेळी तिने त्याला असं सांगितलं की, सुरुवातीला तू १० लाख रुपये दे आणि नंतर उरलेले ३० लाख रुपये दे. यानंतर वर्कशॉप मालकाने या तरुणीविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी तरुणीला रंगेहाथ पकडण्यासाठी एक विशेष टीम तयार केली. यावेळी पोलिसांनी पीडित व्यक्तीला असं सांगितलं की, आपण तरुणीला देण्यासाठी फक्त १ लाख रुपयांची व्यवस्था करा. 

एक लाख रुपयांची व्यवस्था केल्यानंतर वर्कशॉप मालकाने तरुणीला संपर्क केला. त्यानंतर त्यांनी सेक्टर १७ मध्ये भेटूयात असं ठरवलं. ठरल्या वेळेप्रमाणे पोलीस देखील तिथे हजर हजर होते. जेव्हा वर्कशॉपचा मालक तिथे पोहचला त्याच्या आधीच आरोपी तरुणी तिथे हजर होती. जसं वर्कशॉप मालकाने १ लाख रुपयांचं पाकिट तरुणीला दिलं त्याचवेळी पोलिसांनी तरुणीला अटक केली. तसंच हा संपूर्ण घटनाक्रम पोलिसांनी कॅमेऱ्यात कैदही केला आहे. कारण की, कोर्टात तरुणीविरोधात ठोस पुरावा सादर करता यावा. 

दरम्यान, पोलिसांनी तरुणीची कसून चौकशी केली. त्यावेळी तिने कबूल केलं की, तिने दोन महिन्याआधी वर्कशॉप मालकाशी मैत्री करुन त्याच्याशी शारीरिक संबंध ठेवले. तसंच यावरुनच तिने त्याला ब्लॅकमेल देखील केलं. आरोपी तरुणी ही उत्तरप्रदेशमधील फरुखाबाद येथील मूळ रहिवासी आहे. ती मागील चार ते पाच वर्षापासून गुरुग्रामध्येच राहत होती. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी